शनिवार, १५ जून, २०१९


जीवनॠतू आनंदाचा


जिवनॠतू कधी आनंदाचा तर कधी वादळाचा •••••••तो असतो अनंत रेशमी भावनांचा ••••••अलगद पळत सुटणारा••••••काळजात साठवलेल्या आठवणींचा •••••••••तो आणतो आयुष्यात कधी बहर सुखाचा •••••••जणु कोवळ्या पालवींचा •••••••अंकुरलेली आयुष्याची वेल बहरत राहते आलेच कधी वादळ तर झोकुन पडते आणि पुन्हा तन्मयतेने जगण्यास तत्पर होते•खरंच असच काहीच असत या जगण्याच 'कधी वाटत भरभरून जगाव •••••••पण जगता -जगता कधी ही ओंजळ खालीच होवून जाते •••••••मग खरंच रित होऊन जातं  का जिवन? ••••••   तर नव्हे क्षितिजाच्या पलीकडचे जगणे जगायला शिकले पाहीजे ••••••••उगाचं दुःखाच्या वेळी का होऊन जावे हतबल या आयुष्याला? त्याला हलकेच पेलत पुढे गेले पाहीजे; बरिच माणसे जीवनाला कंटाळलेली असतात 'त्यांच्या जीवनात जणु काहीच उरले नाही असे त्यांना वाटतं आलेली संकट तर असतातच त्यांच्या जीवनात पन त्यांच्या खालावलेला आत्मविश्वास आणखीच संकटांना ओढवून घेतो;त्या संकटातून वाट काढण्याऐवजी ते तिथेच खिळून पडतात त्यामुळे गारठलेल त्यांच आयुष्य तिथेच कायमच गारठुन जातं; मुळातच ही माणसाची भुमिका फार चुकीची आहे•
        आयुष्याची वाट कठीण
         असली तरी चालत राहीले पाहीजे
          संकटाच्या काटयांना दुर सावरले पाहीजे
          थकले जरी चालता- चालता
          तरी तिथेच खिळून बसु नका
            आणखी दोन  पाऊल चालून
             शिखर गाठले पाहिजे

उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते. कसल्याच मानवनिर्मित बंधनात न राहता. जिवन हा शब्द  निरागसपणाला आशा , थकलेल्या ऊर्जा व सुकलेल्या अबोल  चेहर्‍यावर आनंदाचे स्मित हास्य देते .
हाच जीवन हा शब्द  वेगवेगळ्या  टप्प्यावर बदलत राहते जीवन कठीण  आहे  पण सुंदर आहे.  हि सुंदरता केवळ शब्दापुरतीच मर्यादित न राहता
जगण्यात ही असली पाहिजे. जीवनॠतुच विभिन्न रूप  प्रत्येकालाच  पाहायला  मिळते  . जशी  निसर्गाची  हिरवळ जीवास भावते तसे हिरवेपण आयुष्यात बहरले पाहिजे  . फुलांची कोमलता  अफाट  असली तरी  त्यांच्या  असण्यातही त्यागाच प्रतिबिंब  आहे  .छोट्याश्या  आयुष्याला ही इतरांसाठी  वाहुन  देतात  .

जगावे  जणू  असे आयुष्य
पाकळी होऊन फुलांचे
दयावा सर्वास आनंद
अश्रू पुसुन तयांचे
जगणे  आपले का येते  नेहमी  हे
हृदयी फुलवु दयावे गीत  ममतेचे


आयुष्याचा काळ हा मर्यादीत असला तरी अनेक  रुपांनी त्याला अमर करता येते  आयुष्यात  इतरांकरिता जगले की जीवन समृद्ध होईल व इतर अनेक प्रश्न सुटतील • आपल्याकडे काहीच नाही इतरांप्रमाणेच आपण  आनंदी नाही 'असा नकारात्मक विचार करू नये•नकारात्मक विचार केला तर तो  आपल्या आयुष्यात किळ लावुन  जातो. मनाच्या  गाभाऱ्यात  सदैव आनंदाचे मोती  वेचावे.  त्यामुळे अलगदपणे  आनंदाची माळ तयार होईल. आनंद  हा चंदनाप्रमाणे सुगंधी  असतो .तो इतरांना दिला की त्याचा स्पर्शाने   आपल्याही हाताला सुंदर सुगंध येतो.  आनंदाची बाब तशीच आहे  ,ती एकट्याने सावरून न घेता सर्वांना देत जावी  त्यामुळे आनंद  वाढत  जातो. तो कधीच  संपत नाही. धकाधकीच्या जीवनात माणूस  ऐवढा व्यस्त झाला की त्याला  इतरांकरिता वेळ नाही. सदैव मनावर कसला न् कसला तान घेऊन आनंदने जगने माणूस हरवून बसतो. मानवी  मनावर वाढणारा ताण कमी केला पाहिजे. कारण हे  जीवन खूप  अनमोल आहे. हे पुन्हा येणार नाही.मानवी मन फार चंचल  असते .ते कधि या तटावर तर कधी त्या  तटावर सैरभैर होऊन धावत असते.  कधी आनंदी होऊन जल्लोष करते तर कधी दुःखाच्या सागरात पार डुबुन  जाते.असच असत आयुष्य कधी ओंजळीत सुखाची फुले टाकते ,तर कधी आसवांचा पुर ,अन् यातच आयुष्याच्या पाऊलवाटी आपण चालत राहतो.जीवन ऋतू हा फारच विलक्षण आहे. ज्यांना याचे वेध कळले तो युगंधर होऊन जातो. कारण तो आयुष्याचे गीत गात राहतो .त्याला जणु काही मर्म कळला असावा आयुष्याचा. क्षण येतात क्षण जातात पण आठवणी मात्र सदैव स्मरणात राहुन  जातात. जीवनात नेहमी एक बाब लक्षात ठेवा आपण कीती जगलो हे महत्वाचे नसते तर आपण कसे जगलो हे महत्वाचे आहे. उगाच मोठे आयुष्य मागण्यापेक्षा  जेवढे आयुष्य आहे तेवढेच चांगले जगा .       त्यामुळे जीवनातील प्रत्येक वेळेला आनंदाचा ऋतू माना . हा ऋतू सदैव हिरव्यागार अशीम शांततेचा ठेवून आनंदाचे उधाण करा तेव्हा  पसरवा पंख आपुले ,घ्या उंच उंच  भरारी  या जीवन ॠतुमध्ये.


अॅड.  विशाखा समाधान बोरकर













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा