शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या



कधी तरी बाबाच्या मनाच्या कोपर्यात जाऊन पहा
त्या थककलेल्या चेहर्यावर प्रश्न दिसतील दहा
त्या थकलेल्या चेहर्याचे उत्तर तुम्ही शोधून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते वरुन वरुन दिसणारे रागीट बाबा
रागीट नसतात मुळीच!
ते शिकवत असतात जीवनाचे अनुभव
त्यांचे वात्सल्य म्हणजे अमृताची गोळीच!
ती गोळी वात्सल्याची कधी तरी चाखून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

पटकन रागावणारे बाबा दिसतात हो सर्वांना
कधी पाहिले का कोणी बाबांना रडतांना
त्यांच्या ओरडल्यावर कधी तरी हसुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

त्या घरात कोण त्यांना समजत बरं
ज्याला त्याला आपलाच वाटत खरं
ते अनुभवाचे पुस्तक कधी तरी वाचुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते सावली प्रेमाची,किती गार गार वारा
त्या चेहर्यावर एकांती असती आसवांच्या धारा
एकांती रडणार्या मनाला,आयुष्याचा धीर दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

कधी तरी ते उदास मन घेतले का जाणून
कधी तरी पहावं त्यांच्यासाठी जगुन
हळूच कवटाळून त्यांना कुशित तुमच्या रडू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते न रडणारे मन रडून जाईल
आयुष्यभरच्या वेदनेवर शब्दांची फुंकर होईल
ती शब्दांची फुंकर कधी तरी मारुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते असतात तोवर असते घराचे घरपण
त्यांच्या नसण्याने हरवते हिरवे बालपण
त्या हिरव्या सावलीत मुक्तपणे खेळुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


बाबा कळणे तसही नाही हो सोप!
आपल्या भाकरीसाठी त्या डोळ्याला न झोप!
उचलुन थोडं भार त्या डोळ्यांना झोप दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

आपल्या शब्दांचा नका करू किधीही प्रहार
थकलेल्या काळजावर असतो चिंतेचा भार
त्या चिंतेच्या भाराला कधितरी उतरवून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


थकले म्हणून काय झालं,लाज कसली त्यांची
लहानपणी ही बापमाऊली प्रेमाने घास भरवयाची
असेल जरी थकेल अभिमानाने त्यांची ओळख दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


मित्राच्या बाबाच्या कारीची का रे तुम्हा ओढ
पायी वहाण नसलेला बाप नाकारतात पोरं
त्या अनवाणी पायाची लाहिलाही कधी पाहून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


त्या अनवाणी पायाने तुला वहाण दिली
त्या उपकाराची ना कोणी किंमत केली
आयुष्य वेचनार्या बाबांला थोड आनंदच हसू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

काळी माती रडू लागली





पाहता ते घाव हाताचे
काळी माती रडू लागली
ओरबडलेल्या काट्याने
रक्ताने ती नाहुण गेली

त्या अनवाणी पायाला
ती वहाण मायेची झाली 
बळीराजा तो लेक तिचा
कशी उपवासाची वेळ आली

न पावतो तो सावकार
न पावतो तो बाजार
मातीमोल मिळे भाव 
कष्टाची ना किंमत केली

काळी माती म्हणे तयाला
नको सोडू धीर तू राजा
येईल दिवस तूझ्याच रे
सपना त्याला दाखवू लागली

लेक होता निजलेला 
ती हळूच त्याला कुरवाळी 
लांबच झोप कशी राज्याला
ती चिंतेने ती पाहू लागली
हाक मारे ती लेकाला 
साद ना मिळाली तिला
घेतले तिने पांघरुन मायेने
काळी माती रडू लागली...

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

थोडं देऊन जा




द्यायचेच कोणाला तर 
 थोडं स्मित देऊन जा  
उपाशी पोटाला दोन
गोड घास घेऊन जा  
जगणे इथे, मरणे इथे
हा खेळ नाही नवा!  
तुझ्या असण्याचे
 तू गीत देऊन जा  


सुकलेल्या झाडाला 
थोडं पाणी देऊन जा 
 दारी आलेला चिमणीला
 काही दाणे  देऊन जा
 दिसला कोणी दुःखी 
कर त्याचे ओझे कमी  
दोन शब्द प्रेमाचे बोलून
 ओझे कमी करून जा  

रस्त्याने चालता चालता 
दिसतील तुला काटे  
हळूच तू ते वेचत
वाट फुलवत जा
जन्म भेटला कर मोल याचे
करता येईल तुला 
ते तू करत जा  

त्या अंधारलेल्या झोपडीत
प्रकाशाचे दिप होवुन  जा  
नसेल वात तया
 तू वात होऊन जा  
चंदनाचा घे वसा
 झिजत राहा नेहमी  
माणूस कसा जगावा
 ते तू सगळ्यांना सांगून जा!

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

आयुष्याला आणखी काय मागणे...?



आयुष्यात आणखी काय मागणे असायला हवे... आपण सदैव हे ना ते मागतच राहत असतो. आयुष्याकडे मिळालेल्या संधी सारखे बघितले तर प्रत्येक संधीचं सोनं करण्याच काम हे आपलं असतं. मनात असलेला मीपणा जर सोडला आणि सगळं आपले म्हणून चाललं तर सगळं जग आपलं असतं; पण काही लोकांना मीपणा म्हणून जगण्याची सवय असते आणि त्यामुळे नाती, माणसे सगळे जण दुरावतात आणि अशी माणसे एकाएकी एकटीच पडतात. नदी सगळं काही आपल्या पोटात घेऊन निरामय झुळझुळ संथ तिच्या मार्गाने धावत वाहत राहते. सूर्य दररोज त्याच्यात वेळेवर उगवतो आणि त्याच्याच वेळेवर मावळतो.निसर्गातील प्रत्येक घटक त्याचे काम अगदी वेळोवेळी कुठलाही कंटाळा न करता पार पाडते.आपणही हा बोध, हेच तत्व, आपल्या मानवी आयुष्यामध्ये स्वीकारून आपल्या आयुष्याला योग्य ते वळण देऊन शकतो. उगाच कुणाचा हेवा तरी कश्याला...?केवळ आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची तक्रार करत बसण्यापेक्षा आहेत या गोष्टींमधून आपण काय चांगले करू शकतो याची धडपड कधीही केलेली चांगली! दोन हात, दोन पाय, सगळं काही व्यवस्थित असताना पण आपण काही नसल्याची उणीव व्यक्त करीत असाल तर ती सगळ्यात मोठी चुक आहे. कारण जगामध्ये असे लोक आहे त्यांच्याकडे या गोष्टी नसतानाही त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी होतात. हातपाय नसणारे एव्हरेस्ट सर करतात.मग आपण हातपाय असणाऱ्याने नुसतं हातावर हात ठेवून बसण्यात काय अर्थ! "We can do everything",हे वाक्य सदैव मनात ठेवून आयुष्याला जिंकलं पाहिजे. तेव्हा आयुष्य रुपी या अनमोल मोत्याला हळूच ओंजळीत जपून सगळ्यांना आनंदाने सोबत घेऊन जगण्याचा प्रयत्न करुया! आपल्या जगण्यातून,वागण्यातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट घडत असते याचा विसर कधीही होता कामा नये!आयुष्यामध्ये देणाऱ्याची भूमिका पार पाडावी त्यामुळे आपल्या आयुष्याला खरा अर्थ उरतो.शेवटी आयुष्यातील कोणत्याही प्रश्नांमध्ये गुंतल्यापेक्षा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करावा. जेव्हा विचार कराल तेव्हा प्रश्न पडतील, आणि जेव्हा प्रश्न पडतील तेव्हा उत्तरासाठी आपण स्वतःहून धडपड कराल, आणि जेव्हा स्वतःहून धडपड करीत असतो तेव्हा उत्तरेही लवकर भेटतात आणि त्याचे समाधान ही मात्र फार वेगळे असते. जेव्हा प्रश्नांची उत्तरे मिळतात तेव्हा आयुष्यातला खरा आनंद मिळतो.आपण नेहमी आयुष्याची तक्रार करत काही ना काही मागत राहतो आयुष्याला ,तेव्हा आपण आयुष्याचे रसिक कमी आणि भिकारी जास्त होऊ जातो. तेव्हा रसिकाची भूमिका घेऊन आयुष्य चांगल्या रीतीने जगूया,कारण येणारी प्रत्येक समस्या, प्रश्न ही माणसासाठी असतात माणूस सगळ्यासाठी नसतो. पण माणुस हेच सगळं विसरून समस्येला आयुष्य समजून जातो हे सुद्धा तितकेच खरं! या विळख्यातून बाहेर पडून पहा,तुम्हाला कळेल या जगाला पण तुमची गरज आहे.स्व:ताला कमी न लेखत आहे त्यात समाधान मानुन जगणे कधीही बरे!

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

बा भीम

बा भीमा,
तुझ्या मताचे पाच लोक
आजही भेटलेच नाही
स्वार्था पलिकडे त्यांना
आजही समाज दिसला नाही
गिळत आहे लाचारीचे
ते दोन तुकडे फक्त
चळवळ विकणार्या या शहाण्यांना
आज चळवळीचेही भान नाही

बा भीमा,
रात्रंदिवस जागून
उभारलेली ती लेखणीची चळवळ आता
मतभेदात विखुरली केव्हाचीच
तू म्हट्ले शिका, संघटीत व्हा,संघर्ष करा
पण आम्ही शिकलो,
संघटीत व्हायचे विसरून
आम्ही आपसात संघर्ष करु लागलो
आज ही गावात आमच्या
महारवाडाच म्हणतात आपल्या वस्तीला
केली जातात अत्याचार आयबहिणीवर
अन घडवून आणले जाते
खैर्लाँजलीसारखे कांड

बा भीमा,
निवडणूका आल्या की दिले जाते
पोरांच्या हाती व्यसनाचे अवजारे
दोन पैश्यासाठी आपलीच माणसे देतात
आपल्याच माणसाविरुद्ध वाईट नारे
वैरवाचे संबंध छान पार पडतात हे
वेळ येताच करतात
एकमेकांवर दगडाचे ही मारे

बा भिमा,
तू म्हटले
शासनकर्ती जमात व्हा
पण पार वाट यांनी लावली
या अनमोल शब्दाची
आपला व्यक्ती राहिला उभा
की त्याला खेचणारे मिळतील
आपलेच क्षनोक्षणी पावलोपावली
काळजी वाटते फार
आपल्या समाजाची
खुप भोडा समाज आहे आपला
जय भिम म्हटले कोणी
कीं अभिमान वाटतो
तूझे लेकरे असण्याची

बा भिमा,
इतकेच वाटते की,
हे झोपलेली जागी माणसे व्हावे
आपसातील मतभेद विसरावे
पुन्हा विखुरलेले क्रांतीचे सुर जुळावे
अन्यायवीरुद्ध सर्वानी पेटून उठावे

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

स्त्री आजही मानसिक गुलामगिरीतच!

लहानपासून परक्याचे धन आहे असं म्हणून परकेपणा दाखवणारे माहेर, लग्न झाल्यानंतर केव्हाही घटस्फोट देवून , वा कौटुंबिक हिंसाचार करून घराच्या बाहेर काढणारे सासर,या दोन चौकटीमध्ये तिचं आयुष्य गुदमरून जातं. कोणीही तिला आपुलकीने आपलं म्हणून घेत नाही असंच दिसत नेहमी! कित्येक युगायुगांपासून महिलाप्रती समाजाने काही बंधने; काही अलिखित चौकटी निर्माण केलेल्या आहेत आणि काही मानसिक विचारधारणा निर्माण केल्यामुळे तिला सतत दुय्यम स्थान देण्यात आले.ती जन्माला येते तेव्हा पासून कायदा तिला सुरक्षा बहाल करते, ती जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत क्षणोक्षणी पावलोपावली कायद्या तिचे संरक्षण करित असते. एकिकडे आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असतो, आणि या संस्कृतीच्या देशांमध्ये आपल्याला मुलगी जन्माला येण्यासाठी कायदे निर्माण करावे लागतात ही शोकांतिकाच म्हणावी ! कित्येक मुली शिक्षणामध्ये अत्यंत हुशार असतानाही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते आणि लवकर एक जबाबदारी म्हणून लग्न करून कर्तव्य पार पाडले जाते. आजही कित्येक ठिकाणी मुलींचे बाल विवाह होताना दिसतात.हा एक शिक्षणाचा अभाव अस म्हणावे लागेल. लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीचे कितीतरी हाल होतात .कधी लग्नाच्या हुंड्यासाठी तिचा छळ होतो तर कधी मुलगी जन्माला आली तर वंशाचा दिव्यासाठी , अश्या कितीतरी नानाप्रकारचे शारीरिक, मानसिक हिंसाचार तिच्यावर केला जातात. आई वडील गरीब असतात किंवा कधी असतात कधी नसतात. माहेरच्या लोकांचा फायदा घेऊन सासरकडील मंडळी तिचा इतका छळ करतात की घराच्या बाहेर पडेल तर कुठे पडेल? या परिस्थितीचा फायदा घेऊन तिला त्रास दिला जातो.
आजच्या एकविसाव्या शतकातही क्षणाक्षणाला एका स्त्रीवर अत्याचार होत असतो. कायद्याने स्त्रीला क्षणोक्षणी बळ दिलं आणि पावलोपावली तिला सुरक्षाही बहाल केलेली आहे.पण कधीकधी रक्षण करणारेच भक्षण करतात अशीही परिस्थिती स्त्रीयांवर येत असते तेव्हा त्यांनी न्याय कुठे मागावा अशाही दयनीय अवस्थेत मधून त्या प्रवास करत असतात आणि अशा कितीतरी महिला - मुली आजही न्यायापासून वंचित आहेत
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महिलांसाठी महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने , घरगुती हिंसा कायद्यानुसार सुनेला पतीच्या आई-वडील म्हणजेच सासू सासऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आर सुभाष रेड्डी,एम आर शाह या न्यायाधीशांच्या बेंचने तरुणा बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे.  तरुणा बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या बेंचने सांगितले होते की, कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यीय बेंचने तरुण बत्रा प्रकरणातील निर्णय बदलत सहा-सात प्रश्नांचे उत्तर दिले आहे. न्यायालयाने सांगितले की, पतीच्या वेगवेगळ्या मालमत्तेतच नाही तर सामायिक घरात  देखील हक्क आहे.या निर्णयाने कित्येक स्त्रियांना धीर दिला आहे.पण आजही अशी परिस्थिती आहे की,आपल्यावर होणार्या अन्यायवर आवाज उचलण्याचे धाडस तिच्यात नाही.
शासन महिलांच्या - मुलीच्या विकासासाठी कटिबद्ध असते. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असते. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येतआहे.महिलांच्या सुरक्षे अनेक कायदे आहेत जसे की,हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा,लिंग निदान प्रतिबंधक कायदा,देवदासी प्रतिबंधक कायदा,
विशाखा गाईड लाईन्स - कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून ‘विशाखा गाईड लाईन्स’ ची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. यासाठी राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली असून महिला, मुली आणि बालकांचा अवैध मानवी व्यापार रोखण्यासाठी ‘राज्य कृतिदलाची’ स्थापना करण्यात आली आहे.कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा - या कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. ‘राज्य महिला आयोगा’ मार्फतही महिलांच्या हक्क आणि अधिकारांची जपणूक केली जात आहे;पण हे सर्व असतानाही आजही कित्येक ठिकाणी महिला- मुलींना आपल्या शैक्षणिक बाबतीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, महिलांना घरगुती बाबतीत बोलण्याचा स्वतंत्र नाही, धार्मिक ठिकाणी आजही कित्येक ठिकाणी त्यांना प्रवेशास बंदी आहे.एकीकडे आपण "मातृ देव भवं" असं म्हणतो आणि त्या ठिकाणी आपण क्षणोक्षणी त्या स्त्रीची कधी अवहेलना, कधी अपमान, कधी विटंबना नानाप्रकारच्या अत्याचारातून केली जाते. वर्तमानपत्रामध्ये रोज वाचण्यात येणारे शब्द कौटुंबिक अत्याचार ,बलात्कार, विनयभंग, ऍसिड अटॅक हे आपल्या नेहमी वाचनात येणारे शब्द. वाचुन मन सुन्न करून जाते पण आपण ते वाचल्या नंतर पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतून जातो; पण पिडीता ती मात्र आपला आयुष्य संपवून टाकते, किंवा तीच आयुष्य मानसिकरित्या संपलेलं असतं, तो मनावर लागलेला घाव आयुष्यभर असतो त्यामुळे नाही जगू शकत नाही पुन्हा उठून बसण्याचे धाडस तिच्यात असते. या होणाऱ्या सगळ्यागोष्टीचा केंद्रबिंदू तर पाहिला तर मानसिकताच आहे,जी बदलने आवश्यक आहे. आजही स्त्री मानसिक गुलामगिरी मध्ये आहे आणि सर्वांची मानसिकता अशी आहे,की ती दुय्यम आहे, ती अबला आहे, हीच मानसिकता बदलली तर आजही आपल्या समाजामध्ये स्त्री सुरक्षित राहून तिच्या हक्कासाठी न्यायासाठी लढवू शकते.कायदा तिच्यावर होणाऱ्या अत्याचारावर न्याय देतो,तिला सुरक्षा बहाल करतो; पण समाजाचे नैतिक कर्तव्य आहे की, स्त्रिया- मुली यांना समान दर्जा देऊन त्यांच्या पंखामध्ये बळ देऊन त्यांना सामाजिक मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे आवश्यक आहे.समाजातील प्रत्येक स्तराने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.तिचे लढाई ती तर लढतच आहे ; पण ह्या जाचक रूढी परंपरा या अलिखित चौकटी या पुसणे महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक स्तरावरील स्त्रीचा विकास जेव्हा होईल,प्रत्येक गोष्ट करण्याचे,निर्णय घेण्याचे खरे स्वातंत्र्य तिला मिळेल, तेव्हाच खर्या अर्थाने आपण प्रगती केली,विकास केला असे म्हणने योग्य ठरेल अन्यथा,तिच्या विकासाशिवाय ह्या गोष्टी निर्थकच आहेत.
✍अॅड विशाखा समाधान बोरकर
रा. पातुर जि. अकोला
19/10/2020


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

उचला ते शस्त्र लेखणीचे ....



श्वास नी श्वास रोखला जातोय 
परिस्थिती आजची पाहता 
मन स्तब्ध होतंय, नजर खिळून जाते
शब्द अबोल होऊन जातात 
ही प्रदूषित झालेली माणसाची मने पाहून 
मनच आक्रोश करतेय फार 
ती जातीयतेची बिजे
नव्या जोमाने वाढायला लागली 
पुन्हा करू पहाताहेत 
खैरलांजली सम रक्ताचा थरथराट...
उन्नाव,खैरलांजली,हाथरस रोज घडतेय इथे
रात्रीलाच जाळल्या जाते तिला
न्याय मिळताच जीव जातो अंधारात 
वाटली असेल भिती
त्या मेलेल्या निष्पाप देहाची
म्हणूनच केली तिची राखरांगोळी रातोरात 
तो जातीच्या नावाखाली दबलेला आवाज उचला
ती कोणत्या जातीची मुलगी आता तरी विसरा,
ती फक्त मुलगी हाच विचार करा
ते जातीची गोळी घेऊन
निजलेल्या रक्ताला पेटून उठू दया थोड 
धर्म, पंथ, जात का येतेय अन्यायाच्या प्रश्नात 
हा पेटलेला आक्रोश पाहूनही तुम्ही 
असाल शांत तर समजा व्यवस्थेचा 
तुम्ही खरा गुलाम झालात...
तो खिशाला लटकवलेला पेन
फॅशनसाठी ठेवू नका खिशामध्ये 
उचला ते शस्त्र लेखणीचे 
अन लढा लढाई अन्यायाच्या विरोधात
नाही तर वेळ भयान येत राहील 
कधी होतील या ना त्या मार्गाने आघात..
आज गोठलेले तुमचे शब्द 
उद्या खेचल्या जातील जिव्हा
फ़ेका ते विष जातीयतेचे आता
नाहीतर उदया पुन्हा पडेल महागात...

✍अॅड.विशाखा समाधान बोरकर
🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️🔷️

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

येथील व्यवस्थेला आता तु पण बळी ठरलीस...

#हाथरस
#Hathras
येथील व्यवस्थेला आता तु पण बळी ठरलीस ....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
येथील व्यवस्थेला आता तू पण बळी.. किती वेदनेने तळमळत असेल त्या आई वडिलांचं मन !काही दिवसांपूर्वीच डोळ्यांसमोर हसत खेळत असणारी त्यांची मुलगी आज नकळत वेदनेच्या आक्रोशात त्यांच्यापासून दूर गेली, कधीच न परतण्यासाठी...
तिच्यावर अत्याचार होऊन इतके दिवस होऊनही न्याय देणारे हात कमी उठले आणि त्या अन्यायाला दाबणारे हात जास्त मिळाले. आधी ही अफवा आहे म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार हे काही केल्या कमी होत नाही आहेत.त्याचे एक उदाहरण कारण ती जर दलित मुलगी नसती आणि श्रीमंत घरातील असती तर ही गोष्ट वाऱ्यासारखी जिकडेतिकडे पसरली असती. जेव्हा हे अत्याचाराचे प्रकरण घडलं तेव्हा आमचा मिडिया बॉलीवूडमध्ये चालेल्या अनावश्यक गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करून होता. नेमकं हेच नेहमी होतं आणि या वेळीसुद्धा हेच झाले. कुठल्या दलितांवर झालेला अत्याचार असो किंवा कुठल्या गरिब स्त्रीवर झालेला अत्याचार असो,तो आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिक केला जातो, त्यातील हाथरस हे प्रकरण सुद्धा सुरुवातीला दाबण्याचे प्रयत्न झाले.आजही मोठ्या प्रमाणात ही प्रकरणे दाबली जातात त्यातील काहीच मुलींना न्याय मिळतो बाकी याच व्यवस्थेला बळी पडून अन्यायाच्या आक्रोशामध्ये शेवटचा श्वास घेतात. देशातील समाज व्यवस्था मानसिकदृष्ट्या आजही स्त्रियाप्रती बदललेली नाही. दिवसेंदिवस त्यांच्यावर होणारे अत्याचार हे वाढतच चालले आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 14 सप्टेंबर 2020 ला गावातील 4 लोकांनी 19 वर्षीय मागासवर्गीय मुलीवर सामूहिक बलात्कार व मारहाण केली त्यामुळे तिचा दिनांक 29 सप्टेंबर 2020 ला दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पीडित मुलगी आई सोबत शेतात गेली असता तिला आरोपींनी शेतातून उचलून नेले व जातीयवाद्यांनी अत्याचार केला. प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले आहेत.अत्याचाराला बळी ठरलेल्या पीडित मुलीच्याआई-वडिलांवर ती गेल्यामुळे दु:खाचा पहाड पडला अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकारही आई-वडिलांना दिला जात नाही ही कुठली व्यवस्था आहे...? आणखीन किती दिवस हे अत्याचाराचे सत्र चालू राहणार...? आणखी किती मुली बळी ठरतील...?आम्ही निमूटपणे पाहण्याचे काम करणार का...?कधी बदलणार येथील समाजातील मानसिकता...? काही दिवसापूर्वीच खैरलांजी प्रकरणाला २९ सप्टेंबर २०२० रोजी १४ वर्षे पूर्ण झाली.हा मनावर केलेला आघात सावरता सावरत नाही तर, पुन्हा या तरुण मुलीवर अत्याचार होऊन तिला आपला जीव गमवावा लागला.ती बोलू शकू नये, म्हणून तिची जीभ कापण्यात आली आणि तिला चालता येऊ नये म्हणून तिची हाडे तोडण्यात आली.आज हाथरस येथिल पीडिता अत्याचाराशी लढता-लढता या जगातून निघून गेली. पण तिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे. त्या चार नराधमाला फाशी झालीच पाहिजे.पीडितेचा आवाज होऊन आज प्रत्येक भारतीयांनी आवाज उचलून हाथरस येथिल पीडिते सारख्या आणखी कुणाचा बळी न जाण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. पीडितेवर झालेल्या अत्याचारासाठी या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तेव्हा कुठे समाजातील असे कृत्य करून आणखी कुठल्या निष्पाप मुलीचा जीव घेण्यासाठी कोणताच हात उचलण्याचे धाडस होणार नाही.
येथे रोज घडते हाथसर 
काहींना मिळतो न्याय
काहींचा होतो विसर 
गुन्हाच ठरतो येथे
ती स्त्री असण्याचा 
ती आक्रोश करते एकटी 
आम्ही मात्र बेफिकर 
तिची जात कोणती आहे
ठरवू नका आता तरी 
कारण तुमची ही मुलगी चालत असते
रस्त्याने एकटीच भरभर 
कित्येक दाबली प्रकरणे अशी 
कित्येक हरवल्या पीडिता 
द्या सुरक्षा आणि द्या बळ लढण्याचे 
समाजकंटक जगतील आनंदाने
आणि पीडिता हरवत राहतील नाहीतर.

#हाथरस
#Hathras
©️अॅड.विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला 
01/10/2020
********************************************
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛

रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

तुला खरा बुद्ध कळणार आहे....



तुझ्या क्रूरतेचा कळसच मानवा
इतका चढतो आहे
जीव घेऊनी कोणाचा
तो महल बांधतो आहे
तुझ्या हृदयातील सांग
गेली कुठे ती मानवता
अहिंसेचा बुद्ध तुला
कधी कळणार आहे .........?

नश्वर इथले विश्व हे सारे
मृगजळामागे तु धावतो आहे
जरी श्रीमंत त्या वैभवाचा
समाधान कुठे तुझ्या मनात आहे.....?
घालता अलंकार मोत्या सोन्याचे
का अहंकारते मन तुझे......?
त्या सोन्याच्या वैभवाला त्यागणारा
सिद्धार्थ तुला कधी कळणार आहे......?

का अधिराज्य गाजवायचे लोकावर
कधी मनावर राज्य करू पहा
कळेल तुला मोल मनाचे
शिंपल्यातील मोत्यापेक्षा जास्त आहे
दिसता रोगी तुला रे किडस
गरीबही तुला वाटते तुच्छ
त्या रोग्यांची सेवा करणारा
बुद्ध तुला कधी कळणार आहे......?

बुद्ध म्हणजे जात धर्म नव्हे
ना कुठला चमत्कार आहे
तो माणूस म्हणून जगण्याचा
एक जीवन मार्ग आहे
तू वाच एकदा अष्टांगिक मार्ग
येईल जाग तुला
ते आत्मसात केल्याशिवाय तुला
कसा बुद्ध कळणार आहे.....?

तो वैभवाचा महल
तो अमृताचा घास
तुला तुझाच राहू दे
कधी भाकरीच्या स्वरूपात जा
त्यावर रस्त्यावरच्या भिकाऱ्या जवळ
त्याच्या भुकेची केलेली शांत तृष्णा
त्याचे एक स्मित हास्य
सर्वात अनमोल भेट आहे
तुला बुद्ध समजून घेण्यासाठी
नाही करावा लागेल त्याग कुठला
प्रज्ञा शील करुणा
बुद्धाचा सोपा सरळ मार्ग आहे

जेव्हा मनात तुझ्या
येईल वादळ
हृदयी काहूर अशांत आहे
त्या वादळातून वाचवणारा
एकमेव बुद्ध मार्ग आहे
तू बनवलेले अणूचे शस्त्रे
फार विघातक नाहीत रे
तुझ्या शब्दाच्या धावा पेक्षा
तू जाणून घे ती सम्यक वाणी
तुला खरा बुद्ध कळणार आहे

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

विस्तवाचा निखारा


का आयुष्यी त्याच्या
विस्तवाच निखारा
रक्ताघामाने भिजते धरणी
पदरी नापिकीचा पसारा
रात दिस डोळे त्याचे
पिकाकडे बघती
राखता पिक अनवाणी
पाया माय मातीचा सहारा


कधी फाटक्या वहनातून
फन लागे पायाला
भळभळ रक्त वाहे
नयनी आसवांच्या धारा
ते आभाळाचं लेकरू
झोक्यामध्ये रडत राही
माय वेचता फन वावरातले
लेकरा देई पहारा

उभ्या वावरात त्याच्या
रक्ताघामाच शिंपण
लेकरावाणी जपतो पिक
उनवार झेलत सारा
जपण्या पिक रात्रीला तो
जागल जाई रानी
पहाटी पहाटी डोईवर त्याच्या
इंधनाचा भारा


दिसा माग दिस जाती
घरी येई पिक
स्वागत होई पिकाचे
मनी स्वप्नांचा पसारा
लेकरा बाळा कपडेलत्ते
वही-पेन घेईन
जाताना बाजारी क्षणात
होई स्वप्नांचा चुराडा

मातीमोल भाव लागे
ढसाढसा तो रडतो
बाहेर कर्जाचा डोंगर
मन घेईल फाशी चा सहारा
पिकाचे मोती माती मोल देऊन
घरी रडत रडत येई
स्वप्नांना नाही अर्थ
आयुष्या जणू विस्तवाचा निखारा

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

खेड्यातील मुल म्हणजे मातीतील मोती........



थोडे उनाड वाटणारे........., आपल्याच तंद्रीत आनंदाने जगणारे....... कसलाच भय त्यांच्या हृदयात नसणारे ही आमची गावाकडची मुल, असतो केवळ चेहऱ्यावर आनंद आणि घ्यायचं असतं क्षितिजाला कवेत एवढे धाडस मनगटामध्ये असतं.पायाला लागलेल्या मातीचा त्यांना विट्टाळ वाटत नाही,मातीला अंगाखांद्यावर घेणारे, त्यावर खेळणारे, आयुष्य जगणारे, ते मातीतील मोती असतात. त्यांच्यासाठी ती माती नसतेच कधीही! त्यांच्यासाठी त्यांची ती आई असते, आपली मातृभूमी जिच्यावर ते जीवापार प्रेम करतात. सौंदर्यप्रसाधने वापरून त्यांना आपलं सौंदर्य फुलवायचं नसतं, ते तर सूर्याच्या प्रकाशात आणखीन प्रकाशणारे सूर्याची मुलच असतात! नाले, ओढे नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आपल्याच आनंदात जगणारे निसर्गाचे मित्रच ते ,त्यांचे ते एक अतूट नातं. त्यांना देखाव्याच्या वैभवामध्ये कसलं मन रमत नाही. त्यांना त्यांची झोपडी व त्याच्यात खाल्लेली अर्धी भाकर त्यातच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी झळकत असत. नाही जमत त्यांना ती स्टॅंडर्ड इंग्लिश बोली; पण त्यांच्या त्या आपल्या बोलीभाषेमध्ये जिव्हाळ्याची आपुलकी असते. ही उनाड वाटणारी मातीतील मोती मात्र मातीच का राहून जातात .......??????त्यांच्या स्वप्नांना का पूर्ण होण्याआधी कुस्करल जातं.......????शिक्षणाच्या वयात हातात खुर्पे घ्यावे लागते याला जबाबदार कोण????गरिबीला लढत मोठे होणारे खुप अधिकारी आहेत;पण शिक्षणातुन मन गेल्यावर पुन्हा हाती पुस्तक घेणारे हात जबादारीणे पार खचून जातात,कधी गणिताची भिती,कधी ती नकोशी वाटणारी इंग्रजी,जिचा a फोर apple इतकीच पुढे आमच्या मुलांची गाडी पोहचलेली असते.आणि ती पुन्हा त्यांना कधीच पुढे जाऊ देतच नाही.कधी पेन -पेन्सिल ,वह्या- पुस्तक याला पैसे नसतात,तर कधी बाहेर गावाला शिक्षणासाठी पैसे नसतात,कितितरी प्रश्ने आहेत या निरागस मुलांची,जी अजुनही सुटता सुटत नाही.पुढे अल्पभुधारक शेतकरी जगणे समोर असते,तर तेही नसले तर रोजीरोटीसाठी मजुर होवुन जाते ते उद्याचे भविष्य! जर ही मूल चांगल्या श्रीमंत घरी जन्माला आले असते तर हा प्रश्न कधीच आला नसता.
पाचवीला पुजलेलं त्यांच दारिद्र हे त्यांच्या अपयशाचे कारणे होत तर नाहीत; पण त्यांच्या यशाच्या मार्गाच्या आड येणारे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जे मुलं आपल्या आई-वडिलांना लहानपणापासून निसर्गाच्या केलेल्या प्रत्येक घावावर प्रत्यक्षपणे तोंड देऊन जिंकायच पाहतात.ज्या मुलांना प्रत्येक संघर्षाला तोंड देऊन जगण्याचं बळ मिळतं, ते मुल अचानकपणे शिक्षणाच्या बाबतीत का मागे राहतात.......????? ती होतकरू हुशार असून त्यांना परिस्थितीनुसार जगून जबाबदारी मध्ये अडकून आपल्या शिक्षणाच्या पेनाच्या जागी नांगर वखरंच का हाती धरावा लागतो.........?????? कुठे मोठे शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही यांच्याकडे नोकरी लागण्यासाठी पैसे नसतात मग सुशिक्षित बेरोजगारीचा ठप्पा माथी लावुन आयुष्य जगावं लागतं. हे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांची आहे. या स्पर्धेच्या काळामध्ये शंभर जागेसाठी हजारोनी फॉर्म जमा होतात. त्यापैकी शंभर निवडतात बाकीच्यांचे काय होते हे त्यांनाच माहिती. जर का या मातीतील हिऱ्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणारे शिक्षण उपलब्ध करून दिले किंवा त्यांच्या चांगल्या गुणांचा वापर व्यावसायिक या उपक्रमांमध्ये जर केला तर त्यांचा विकास होऊ शकतो.का ग्रामीण भागातील मुलांना, माणसांना छोट्या-छोट्या मजुरीवर शहरी भागामध्ये व्यवसायासाठी पडावे लागते ?जर का या व्यवसायाच्या गोष्टी आपल्या गावात मध्ये निर्माण झाल्या तर त्यांना तिथे जाऊन आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार नाही. रानमळयात वाढणारी ही निसर्गाची मूल,आभाळाच्या मोठ्या संघर्षाला तोंड देण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये आहे. मातीतील मोत्यांची किंमत कळायला हवी.दिवसेंदिवस होत जाणार शिक्षणाचे बाजारीकरण जर असच चालत राहिल तर या मुलांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं हा मोठा प्रश्न. आजचे शिक्षण म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्यामध्ये बाहेरील क्लासेस लावायचे सामर्थ्य आहे, त्यांचंच झाल आणि ही सत्य परिस्थिती आहे. पण ग्रामीण भागातील मुलांची होणारी हालअपेष्टा याचं मात्र कोणाला तीळमात्रही फरक पडत नाही. उलट त्यांच्या बोलीभाषेतून, कपड्यालत्त्यातून राहणीमानातून त्यांना हिणवलं जातं.यातील काहीच मोजकेच मुलं आपल्या आयुष्यात चांगल्या रीतीने जगू शकतात आणि चांगल्या रीतीने मोठ्या पोस्टवर अधिकारी बनू शकतात; पण बाकीच्यांचे काय हा प्रश्न तोपर्यंत सुटणार नाही ;जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न योग्यरित्या सोडवल्या जात नाही, कारण शिक्षणाचे होणारे बाजारीकरण आणि शिक्षण दरबारामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळातल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. आयुष्याच्या येणाऱ्या नवीन नवीन वळणावर मग यांच्या हातातून वही पुस्तक दूर होऊन जबाबदारीचे ओझे पाठीवर येते.ग्रामीण भागातील हे प्रामुख्याने मजुरांची आणि शेतकऱ्यांची असतात त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच येते. नंतर काही दिवसातच त्या मातीतील मोत्यांची माती घेऊन जाते. त्यामुळे या मोत्यांची किंमत झाल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

तेच खरं आयुष्याचं नाव असतं




ब्रँडेड ज्वेलरी, ब्रँडेड कपडे
म्हणजेच आयुष्य नसतं
त्या झोपडीतील भाकरीत
सुख लपलेलं असतं

नको भडिमार त्या सुखाचा
नको तो कागदाचा पैसा
दु:ख वाटून घेण्यासाठी कोणी
जवळ असावं लागत असतं

ती उडणारी पाखरे ,अंगणातील फुले
क्षितिजापल्याडच त्यांच जगणे असत
नाही ती स्पर्धा कुठल्या लोभाची
नव्या उमेदीचे पंखात बळ असतं

आपणच माणसे बिघडलोय सारी
म्रुगजळाच्या मागे आपलं धावण असतं
वैभवाचे वारे आणि प्रशस्त बंगला
यातच आमचं सुख लपलेलं असतं

सुखाच्या व्याख्येने आभासी जग व्यापलं
पाषाणाचे हृदय म्हणजे ह्रदय नसतं
प्रत्येकाच्या सुखाचा विचार मनी यावा
तेच खरं आयुष्याचं नाव असतं

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

पोरके आज मी बाबा


हरवल्या दाही दिशा त्या
 हरवला तो सहारा 
बंद झाली दारे अचानक 
पाखरू सोडून गेला पिंजरा

 आर्त मनाचा आता
 कंठ दाटून येतो
 आलं वादळ जीवनी
 हरवला मी तो किनारा 

 नजर वादळात त्या
 शोधून पाहे बाबांना 
दिसेल का पुन्हा मला
  ती हरवलेली हास्य मुद्रा

 स्मित हरवले मी
 त्या काळाच्या वादळात
पोरके आज मी बाबा
 नयनी आसवाचा धारा

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

पुन्हा नव्याने जगुया आयुष्य.........


काही काळ कोरोणामुळे अचानकच बंद झालेल्या आयुष्यात पुन्हा नव्याने बाहेर जावेसे वाटते,
भन्नाट नेहमीसारखी शॉपिंग करावीशी वाटते.... आपल्या घराच्या परिसरात निवांतपणे फिरावस वाटतं.... कालपर्यंत या पायाला दम नसायचा;पण आज पाय अचानक घराच्या चार कोपऱ्यात बंदिस्त होऊन गेले . मनाच्या डोहात अलगत उठणाऱ्या भावनांना वाटव की पुन्हा उडत जाव या मंदमंद वाऱ्याबरोबर, अन् बेभान होऊन जावं या निसर्गाच्या सानिध्यात. पक्ष्यांच्या थव्यात उडत जावं..... फुलांच्या रंगात स्वतःला हरवून जावं..... निसर्गाच्या झुळझुळ वाहणाऱ्या झर्यामध्ये स्वतःला विसरून जावं. जणु हेवा वाटावा या पाखरांचा, आपल्यापेक्षा आज या विहंगाला जास्त स्वातंत्र्य आहे. किती निर्भीडपणे ते उडतात आकाशी. ना कुठले बंधने ती माणसाने निर्माण केलेली. नाही ते विषारी प्रदूषित हवा. या झाडावरून त्या झाडावर उडतांना या पाखरांना तितकाच आनंद होत असेल आणि त्यांना आनंदी पाहून त्या झाडांना ही खुप आनंद होत असेल कारण या सगळ्या गर्दीमध्ये आज झाडेही वाचलेली आहेत माणसाच्या वृक्षतोडीपासून.किती बरं हे विचित्र आश्चर्य आहे ना कालपर्यंत मुक्याजीवाची तोंड बांधणारा माणूस आज स्वतःच्या तोंडावर मास्क बांधुन फिरतो आहे.प्रत्येकाला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा भोगावी लागते जणू निसर्गाने ही माणसाला दिलेली शिक्षाच आहे असं मनाला अलगत वाटून जाव. आज पुन्हा नव्या तन्मयतेने ते निरागस हरवलेल आयुष्य प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य शोधतो आहे.... रस्ते शांत झाली, पण वने मात्र बोलती झाली आहे त्या पाखरांच्या किलबिल किलबिल आवाजाने, माणसांची गर्दी येतास दूर पळणार्‍या खारुताई आज रस्त्यावर आनंदाने खेळताना दिसतात.
सकाळचे वेळी बाहेर पडले की आज आठवतो आहे तो पारिजातकाच्या फुलांचा सडा,त्याचा सुगंध घेऊन वाहणारा वारा, आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये रस्त्याने चालता चालता मन प्रसन्न करून जायचा. रस्त्यावरची गर्दी माणसाची, ती सर्वांना झालेली धावपळ, प्रत्येक जन आपल्या धुंदीमध्ये जगणारे माणसे, शाळकरी मुलांची धावपळ,ही मुले जणू सुट्टिची वाट पहायाचे. पण आज कित्येक दिवस झाले शाळा चालू झाल्यावर शाळेची घंटा वाजली नाही ,मनाला वाटणारी ती ओढ नेहमीच याने खालीपण वाटत आहे. आज लहान मुलांची दप्तराचे ओझे नसून हातामध्ये मोबाईल असून ऑनलाईन क्लासेस पाहण्यात मग्न झाले किती कंटाळा आलाय नाही का.....?नेहमीच निमित्त शोधून शाळेला दांडी मारणाऱ्या मुलांनाही आता शाळेमध्ये पळत सुटत जावसं वाटत आहे आणि आपल्या शाळेच्या मोकळ्या मैदानामध्ये बेधुंदपणे खेळावेसे वाटत आहे. वर्गामध्ये शिक्षकांनी शिकताना एखादेवेळी गृहपाठ केला नाही तर ती आता शिक्षाही आपलीशी वाटत आहे. ग्रामीण भागातील मुलांना मात्र या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे, कारण महागडे फोन घेऊन ऑनलाइन क्लासेस करणे गरिबांच्या हातच्या बाहेरची बाब असते. त्यामुळे याची पण शोकांतिकाच म्हणावी लागेल .आज आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण आपले बिझी आयुष्य शोधतो आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले, नाना प्रकारचे प्रश्न उभे झालेले आहेत; पण या सगळ्यांना तोंड देत सामोरे जावे लागत आहे हे सगळं काही माणसाला एक नवा अध्याय शिकून गेला. पण हे सर्व असताना. काल पर्यंत रोजच्या भाकरीसाठी रस्त्याने धावत पळत सर्वांना जाव लागायच त्यांना कधी वेळ मिळाला नाही आपल्या लोकांसाठी; पण या सर्व काळामध्ये आपल्या कुटुंबियांना वेळ मिळू शकला ही मात्र एक सकारात्मकता आपण नक्की बघावी. बर्याच महिन्यापासून सतत घरात असताना आज घरामध्ये कुणालाच रहावसं वाटत नाहीये; सगळ्यांनाच बाहेर जाऊन मोकळा श्वास घ्यावासा वाटतो आहे.काळ थांबत नाही तर सतत बदलत असतो, त्यामुळे आज आपण इतक्या दिवसानंतर काहीतरी नवीन नव्याने शिकला पाहिजे. आयुष्यामध्ये घराच्या बाहेर पडताना आता या सुंदर असा निसर्गाला असं जतन करून आपण त्याच्या मध्ये आणखीन भर टाकूया आपण माणूस म्हणून जगत आहोत पण जगताना इतर प्राणी सृष्टीला पण आनंदाने जगू द्यावं.
या संपूर्ण काळामध्ये माणसाच अचानक बंद झालेलं आयुष्य नंतर बाहेर पडताना जणु माणसाला पुन्हा नव्याने जन्म झाला असता वाटव. या अचानक झालेल्या गोष्टी माणसाला सहन करणं आणि त्यामध्ये जगणे ही खरोखर एक मोठी कसोटी असते आणि ही माणसाने पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडली आणि पाडतो आहे त्यामुळे सकारात्मकता ठेवून पुन्हा नव्याने जगण्याचे अंतरीचे कवळसे आपण जपूया.तेव्हा उघडा बंद मनाची द्वारे आणि येऊ दया प्रकाशाची किरणे......वार्‍याच्या मंद मंद झुळूकीवर पुन्हा स्वार होऊ द्या स्वप्नांना.....आयुष्याची कोवळी किरणे अलगदच प्रकाशमय करून जातील जग, अन् प्रसन्न होऊन जाईल प्रत्येक मन.तेव्हा जगुया पुन्हा नव्याने आयुष्य......

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

ज्ञानसूर्याच्या लेकरांनो...

 

ज्ञानसूर्याच्या लेकरांनो 

आज बेभान का रे झालात

माझ्या भिमबा ला

वाटले का रे गटागटात .......


गावातलं लेकरू आमचं

पुढारी झालय फार मोठं 

शिक्षणाचा झाला झीरो 

नेतागिरीची येते वरात.........


वादळाचे रे वंशज तुम्ही 

का भटकत चालले अंधारात

मृगजळाचा भास करुनी

खेचले जातयं तुम्हाला खड्यात........


क्रांतीचे वादळ अवघे

समावून घ्या लेखणीत

समाज चालला रे आपला

पुन्हा अज्ञानाच्या तिमिरात......


विषमतेची विषारी बंधने 

टाकित आहेत पुन्हा कात 

जाळुन घ्या हात तुमचा

जपण्या समतेची वात.....

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे........



जन्माला आलेल्या बाळाला दिले जाते इंजेक्शन जातीचं....... तर कधी म्हट्ले जाते हा मुलगा वंशाचा दिवा, तरी मुलगी परक्याचे धन....... मग कधी त्या बाळाच्या वर्णनावरून ही केल्या जात गोष्टी आणि सुरू होतो भेदभाव काळ्या- गोरेपणाचा....... माणूस म्हणून जन्म तर घेतो आपण पण गुंतल्या जातो येथील सामाजिक व्यवस्थेमध्ये........ कधीकधी खूप प्रेमळ आपुलकीचा वाटतो हा समाज, पण कधी कधी त्यातीलच काही गोष्टी मनाला न समजणार्या आरपार करून जातात. काही प्रथा, काही रूढी- परंपरा नकोशा का बर वाटतात........? आपल्यास माणसावर आपल्या समाजावर आपले नकारात्मक प्रश्न उठतात.... मुद्दे सर्वांची सारखीच असतात. पण बोलत मात्र कोणीच नाही. आपल्या भावनाला कोंडून गुदमरून जगतोय का आजचा माणूस.......? शाळेला जाणारा पोर परीक्षार्थी आहे की विद्यार्थी आहे, सुजान नागरिक बनवण्या ऐवजी त्याला स्पर्धक बनवून टाकलाय का पालकांनी.....? मुखवट्याचे आयुष्य जगणं चाललय सगळ्यांचे, स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतोय आपण असं वाटतंय आता. सुखाचा झरा शोधता-शोधता आपण एकमेकांशी तुलना करत चाललो आहे आणि आपल्या मनाचे समाधान मात्र हरवत बसलो आहे.स्पर्धा या शब्दाने जणू आयुष्य व्यापून टाकले माणसाचे. तो जगतो तर आहे पण ते केवळ जिंकण्यासाठी...... जिंकणे स्वाभाविक असते प्रत्येकाला जिंकाव असं वाटतं पण धावता- धावता आयुष्यातील खरेपण आयुष्य काय असतं हे तर आपण विसरत चाललो नाही ना..? याचा विचार मात्र खरंच माणसाने करावा. मनाचे समाधान हरवून आपण भौतिक गोष्टींमधून समाधान शोधतो आहे. एक चांगलं आयुष्य जगणे म्हणजे आपल्या आयुष्यात दुसऱ्याला मदत करणं, गरजूला मदत करणे,, उपाशी असलेल्या व्यक्तीला दोन घास भाकर देणे, आपल्या आयुष्यामध्ये ज्याला आपल्याकडून गरज आहे किंवा आपण ज्याची एखाद्या खरोखर गरजू व्यक्तीच्या कामी येऊ शकतो असे कार्य करणे म्हणजे पण आयुष्यामध्ये आपण समाधान प्राप्त करू शकतो. या स्पर्धेच्या युगामध्ये जिंकण्यासाठी आपण स्वतःला इतकं विसरून गेलो आहे की आपण आपले अस्तित्व निर्माण करतो आहे , पण खरं जगणं विसरलो हे मात्र खरे. ग्रामीण भागातील मुले पुणे मुंबईला जातात, तिथे शिक्षण घेऊन त्यांची मुलं परदेशी जातात आणि इकडे त्यांच्या आई वडिलांची कशी अवस्था आहे ते मात्र कोणी बघत नाहीत. आणि पुण्या-मुंबईतल्या मुलगा ग्रामीण भागामध्ये त्यांचे आई-वडील कसे जगतात हे बघत नाही म्हणजे आपण किती बिझी झालो हे कळते. आई वडील अर्थार्जनासाठी बाहेर पडतात तेव्हा मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते आई-वडिलांना वेळ देऊ शकत नाही अस असल्यामुळे आपण जगतो तर एकमेकासाठी पण आपण आपल्या नात्यांना वेळ देत नाही ही मात्र दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. जन्मापासून सुरू झालेली ही आयुष्याची स्पर्धा एक वेळ थांबणार आहे ,सर्व माणसे सारखीच , सारखीच भावना,रक्त ही सारखेच, मग एकमेकांच्या बद्दल कशाला विरोध आहे कसल्या जातीपाती ,कशाला, भेदभाव, माणसांने फक्त माणूस म्हणून का जगू नये....?येथे बोलले जात वृत्ती मात्र फारच कमी, कारण स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे.
इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते.....

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

आपल्याला जबाबदारीचे भान असायला हवे.

आपले राष्ट्रीय सण म्हणजेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस असले की, आपण सर्वजण आनंदाने स्टेटस ठेवतो व आपल्या फेसबुक वर फोटो टाकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो. पण हेच म्हणजे आपली खरी देशभक्ती आहे का......? देशभक्ती त्या दिवसा पुरतीच मर्यादित का राहते......? आज भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आहेत पण भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले.आपल्या जीवाचे हसत हसत बलिदान दिले. त्यांच्या स्वप्नातील भारत आज उभा दिसतो का....?
74 वर्षानंतर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली तर आज ही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रगती पाहिजे तशी झाली नाही असे आपणास पहावयास मिळेल. समाजामध्ये जातीयता तेढ जातीवरून केलेल्या राजकारण पाहायला मिळेल. समाजामध्ये विविध गट पाहायला मिळतील. आजही स्त्री-पुरुषांमध्ये कमालीचा भेदभाव केला जातो. वर्णव्यवस्था अजूनही इथे आपणास पहावयास मिळेल. अजूनही भुकेने मरणारे लोक दिसतील आणि आपण म्हणतो की आपल्या देशाने प्रगती केली. खऱ्या अर्थाने देशाचे स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही आजही आपल्या समाजात ही विदारक परिस्थिती आपल्याला जबाबदारीचे भान करून देते आहे.
सहज नाही मिळाले आपल्याला हे स्वतंत्र, त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले आहेत, आणि आज आपल्या हातामध्ये सगळं काही असताना आपण वास्तवाचे भान हरवून आपण आपल्या धुंदीमध्ये आपल्या स्वार्थापायी जगतो आहे. आपल्यामध्ये देशभक्ती फक्त राष्ट्रीय सणा मध्येच का जागृत होते ती दररोज का नसते , स्वातंत्र्य दिवसांमध्ये आपण हातामध्ये मिरवणारा आपला तिरंगा प्लास्टिक्स जागोजागी पडलेल्या दुसऱ्या दिवशी दिसतो तेव्हा आपण आपली जबाबदारी म्हणून तो उचलतो का......?एखाद्या गरीब मुलाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा असेल तर आपण त्याच्या हातामध्ये वही पेन देतो का......? अशा वृत्तीचे देशभक्त काहीच अपवादाने सापडतात. एखादा अभिनेता वारला तर त्याच्या निधनाचा शोक करणारे सर्व असतात पण एखादा शेतकरी का आत्महत्या करतो? त्यावर बोलणारे मात्र कमी असतात.शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे. ज्याच्या भरवशावर आपण आपले आयुष्य चांगले जगतो. त्याच्यासाठी कधीतरी आपल्या तोंडातून काही तरी निघते का...? तो कसा जगतो...? त्याला कुठल्या परिस्थितीमधून जगावे लागते त्याच्या मुलांना उच्च शिक्षण मिळते का ....? जेव्हा त्याचे पीक बाजारामध्ये येते तेव्हा त्यांना मेहनतीने रक्तघामाने पिकवलेले पिक सगळ्यांना स्वस्त हव असत. त्याच्या पिकाला बाजार भाव लागतो का......? त्या पिकावर त्याची कितीतरी स्वप्न असतात ते सगळे पूर्ण होतात का....? आणि कसा बरा आपला शेतकरी आत्महत्या करतो यावर कुणी बोलताना दिसत नाही.एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहीत असणे आणि त्या पूर्ण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशाची प्रगती कशी होईल, आपल्या देशातल्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी आपण त्यासाठी लढले पाहिजे हे एका जागरूक नागरिकाचे काम आहे.मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आपल्या सुसंस्कृत देशांमध्ये निर्माण होतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ही समस्या कमी करण्यासाठी पावले उचलून प्रत्येक महिलेला सुरक्षा बहाल करणे.तिला सामान समजने. तेव्हाच खऱ्या अर्थाने तिला स्वतंत्र मिळते आहे असा तिला म्हणता येईल.आजचे जबाबदारी हरवलेले युवावर्ग आपले सगळे जबाबदारीचे भान विसरून सोशल मीडियामध्ये व्यस्त आहे. त्यांना आपल्या जबाबदारीचे भान येऊन आपल्या देशाचा विकास करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे यासाठी त्यांना झोपेतून उठले महत्त्वाच आहे असे मला वाटते..स्वतंत्र दिवस म्हणजे आपल्या महान वीरपुरुषांच्या त्यागाचे, बलिदानाचे स्मरण असते त्या स्मरणाचा विसर न होता आपल्या देशासाठी प्रगतीसाठी सदैव तत्पर राहणे महत्त्वाचे आहे.
सर्व तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला एखादा मुद्दा,विषय प्रश्न, अन्याय कारक वाटत असेल तो देशाच्या अहिताचा असेल तर त्यावर तुम्ही चर्चा करा, बोला, आवाज उचला देश व समाज तुमच्या मागे आहे.पण केव्हा जेव्हा तुम्ही त्यावर बोलाल तो प्रश्न सोडवला आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या देशाचा प्रगतीचा मार्ग आणखी मोकळा होईल,समाजात समानता प्रस्थापित होईल, समाजामध्ये एकता प्रस्थापित होईल, देशात अजुनही जातीवरुन भेदभाव होतो तो संपवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा संपूर्ण देशातील गरिबी निर्मूलन होईल, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल,खर्या अर्थाने स्त्रीची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होईल, अंधश्रद्धा कमी होईल,खेड्यांनाचा विकास होवुन गावे समृद्धीने नांदतील,जगचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करणारं नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास झाला असे म्हणता येईल. तेव्हा उठा आणि आपल्या देशाच्या विकासासाठी कार्य करा ही आपली जबाबदारी आहे. आपल्या देशासाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी, आपल्या पावले उचलावी लागतील.
✍अॅड. विशाखा समाधान बोरकर
(कृपया लेख नावासहितच शेयर करावा)

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

आठवण...


खूप खूप कळलाय
प्रत्येक गोष्टीत जणू मज
बाबा माझा दिसलाय
ती पुस्तकाची अलमारी
तो टेबलावरचा पेपर
जणू क्षणापूर्वी तो
बाबांनी वाचून ठेवलाय

चहाचा कप हाती घेताना
त्या गप्पा खूप आठवतात
नकळत डोळ्यांमध्ये
विरहाचे अश्रूही साठवतात
.तो चहाचा कप हाती घेत
करणार का पुन्हा गप्पा
या आभासाच्या गोष्टी
क्षणोक्षणी मनी छळतात

तुमच्या खिश्याचा पेन
जपून ठेवलाय फार मी
कधी कधी हाती घेताच
नकळत डोळे वाहतात
नकोसे वाटते आज मज
हे दुनियादारीने केलेले कौतुक
आजही तुमच्या त्या शाबासकीसाठी
मनी जणू वेध असतात

बाबांच्या एका शब्दाने
जग जिंकल्याचा भास होई
त्या प्रेमावाचून जणु
आयुष्याला अर्थ नाही
क्षितिज वाटावे कमी
असे अथांग विश्व माझे
आठवणी त्यांचा नेहमी
माझ्या सोबत राही

बुधवार, १५ जुलै, २०२०

न तयात लोभ कुठले ........



हाती येता मोबाईल मोठा
जीवन कसे व्यस्त झाले
कधी फेसबूक कधी व्हाट्सअप
तर कधी हाती इंस्टाग्राम आले

सोशियल मीडिया वर आला पुर
सगळेच जणू सेलिब्रिटी झाले
नात्यांचे झाले वाटोळे
नातेच केव्हाची काॅरंटाईन झाले

सकाळ होता सगळ्यांची
गुड मॉर्निंग चे मेसेज आले
ही मॉर्निंग गुड करण्यासाठी
आपल्याच माणसाला विसरून गेले

आहे हे पण विश्व छानच
दूर चे पाखरू जवळ आले
अनोळखी माणसासोबत जणू
आपलेच म्हणून बोलू लागले


पण हे जगत असताना
आपण वास्तव विसरून जातोय
माणूस न बोलताच निघून गेला
शेवटचं बोलायचे राहून गेले

भावना पळाल्या दूर आता
देखाव्याचे मुखवटे आले
वास्तवातून पडता-पडता
आभासाचे चेहरे बनवले

खरे जगणे हरवतोय माणूस
फक्त अस्तित्वासाठी लढतो आहे
इतरांशी स्पर्धा करता-करता
मनस्तापही पदरी आले

छान वाटतं कधी-कधी की
जग सगळ जवळ आले
पण कळलेच नाही कधी
कसे नात्यांमध्ये वैर झाले

थोडेसे सावरून पहा
या आभासी जीवनाला
मनात डोकावून पहा
आपल्याच माणसाला
मिळेल सर्व प्रश्नाचे उत्तर
कळेल शिंपल्याच्या नादात
अनमोल मोती हरवून गेले


छान वाटतात मोठे मोठे
मेसेज वर येणारे विचार
आपणही त्याच्यावर कमेंट करतो
पण खरं सांगायचं तर
त्या फिलॉसॉफीमध्ये आयुष्य विसरून गेले

त्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार
जगच खरंच जग नाही इतके भान असू दया
कधी कधी आई-वडिलांच्या
मनाच्या कोपऱ्यात जाऊन पहा
त्यांनी पाहिलेली स्वप्नांची अंकुर
दिसतील तुम्हास कोमजलेले

मृगजळ झाले सुख जणू
ह्रदयी काहूर मन अशांतले
हृदयी लागता घाव दुःखाचे
ना तयास औषध कुठले

जगता जगता जगतातच तर सगळे
थोडे वेगळे जगून पाहूया ना
असावी फक्त स्नेह आपुलकी
न तयात लोभ कुठले  

शनिवार, २० जून, २०२०

बाबा म्हणजे प्रेमाचा झरा.....


  बाबा म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आधार वाटणारा सर्वात मोठा प्रेमाचा सागर........ मुलांच्या आयुष्यामध्ये बाबांना खूप वेगळं स्थान असतं.जेव्हा मुलं आपला आधार आपला आत्मविश्वास गमावून बसतात तेव्हा बाबा तो आत्मविश्वास पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर परत आणतात. जेव्हा अख्ख जग विरोधात गेल तरी, पण बाबांचा तू पुढे जा हा शब्द कुठल्याही मुलाला प्रेरणा देत कुठल्याही प्रसंगाला पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असतो. त्यामुळे बाबा म्हणजे वरुन कितीही कड़क असले तर आतून त्यांचं काळीज फार प्रेमळ असतं. आपली काळजी करणार असतं. कधीकधी मुलांना बाबा खूप कडक वाटतात. बाबा प्रेम करत नाहीत असं वाटते. पण हे मुळात चुकीच आहे. बाबांच प्रेम हे मुलांना कधी जाणवत नाही कारण त्यांना दिसत केवळ आईचं प्रेम.आई लहानपासून मुलांना जपते खाऊ पिऊ घालते त्यांना जपते त्यांना आपल्या मायेच्या सावलीत वाढवत त्यांच्या प्रत्येक चुकांवर ती त्यांना क्षमा करते पण जेव्हा बाबांची गोष्ट येते तेव्हा मुलांना बाबांच प्रेम मात्र कळतच नाही.....मुळात बाबा आणि आई दोघेही आपल्या आयुष्याचे दोन पंख असतात. बाबा बाबा असतो ना त्याच्या मध्ये श्रीमंताची तरी येत ना.
गरीब त्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची दरी केव्हा येत नाही.... प्रत्येक बाबाच्या काळजामध्ये आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याची स्वप्ने असतात .आपल्या मुलांनी मोठे व्हावे काहीतरी बनावे ,स्वतःला सिद्ध करावे, त्यासाठी त्यांनी परिस्थितीची आव्हाने पेलावी या सगळ्या विचाराचे बाबा आपल्या मुलांना बाळकडू पाजत असतात, पण कधीकधी अपेक्षांचे ओझे वाटून मुलं त्यांच्या स्वप्नांना अधांतरी सोडतात . बाबा कधीच मुलांवर अपेक्षांचे ओझे ठेवत नसतात तर त्यामध्ये स्वप्न असतात ही बाब मुलांनी लक्षात घ्यावी. आपल्यापेक्षा त्यांनी दोन दिवस जास्त बघितलेली असतात....... आजच्या मुलांचा ट्रेड असतो बाबा काळ बदलला,या
बद्दल तुम्हाला कळत नाही. ही बाब मुळात चुकीची आहे तर बाबांना त्यांच्या अनुभवातून आजच्या काळाला अनुसरून काय पावले उद्या दृष्टीने टाकता येतं हे त्यांच्या शिवाय चांगला कोणीही ओळखत नाही..

त्यांच्या अनुभवाची वर्षी ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची कठीण परिस्थिती, स्पर्धाही दूर करत असते .कारण जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागतात तेव्हा बाबा त्यांच्या अनुभवातून आपल्याला त्यातून मार्गक्रमण कसं करावं लागतं हे आपल्या अनुभवातून शिकवत असतात. आपल्या स्वप्नांवर अंकुश ठेवून जो आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या फाटलेल्या कपड्या कडे कधी बघत नाही तो बाप असतो................ उद्या मुलांची स्वप्न उज्वल घडावी, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी, त्यांची ध्येय पूर्ण व्हावी, त्यांनी मोठ्या आकाशी झेप घ्यावी, यासाठी जो आपल्या स्वप्नांचा चुराडा करतो तो बाप असतो ........... त्याच्या हाताला घाव असताना त्याला आपल्या यशाच्या शिखरावर जाताना जो आपले घाव विसरतो आणि बेभान होऊन काम करतो तो बाप असतो......
मुलांच्या एका मागणीवर तो जीवाचा आटापिटा करत त्याची मागणी दुसऱ्या दिवशी पूर्ण करतो तो बाप असतो ..........आपले संपूर्ण आयुष्य मुलांच्या कल्याणासाठी वेचणारा बाप जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या हृदयावर घाव घालणारे मुलेही काही आहेत. ज्यामध्ये त्याने इतक्या कष्टातून आपल्या मुलांसाठी जो काही कष्टाचा मळा फुललेला असतो त्याला मुलं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं तो दिवस त्या बापासाठी त्याच्या आयुष्यात केलेल्या कामाचा झालेला अपमान वाटतो. कारण संपूर्ण आयुष्य त्याच्या मुलाचे चांगले जावे याकरिता अख्खे आयुष्य एक एक पैसा जमा करून फुलवण्याची स्वप्न पाहतो असे करूनही जेव्हा अशी मुले त्यांना असे प्रश्न विचारतात. खरे तर अशी मुले मुळात ते वडिलांच्या लायकीचे नसतात. ज्यांना आपल्या वडिलांच्या मेहनतीचे मोल नाही अशी मुले आजही आपल्या समाजामध्ये कलंक म्हणून वावरतांना दिसतात. वडिलांच प्रेम काय असतं हे त्यांना विचारा ज्यांना वडील कसे असतात हे माहीत नाही ......त्यांचे वडील जन्मताच वारले किंवा ज्यांचे वडील त्यांच्या आयुष्याची वाट अधांतरी असतानाच सोडून गेले..... त्यांना विचारा वडिलांचे प्रेम काय असतं ....त्यामुळे ज्यांचा कडे हे आहेत त्यांनी त्या बाबाचं काळीज त्यांचं प्रेम जपा त्यांना कधीच दुखवू नका ...त्यांचे आयुष्य प्रेमाने भरून टाका तुम्हालाही माहीत नाही की तुमच्या एका हसण्यासाठी त्यांनी तुमच्या साठी किती तरी त्याग केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ...... तुमच्या एका हट्टासाठी त्यांनी आपले कितीतरी स्वप्न जाळले असतील त्यांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही पण निदान त्यांना दुखवून त्यांना त्रास तरी देऊ नका ........ आई-वडील आपल्या आयुष्यातले दोन व्यक्ती आहेत जे आपल्यावर आयुष्यभर कुठलाही प्रकारे कुठलाही निस्वार्थी प्रेम करतात त्या प्रेमाची तुम्ही किंमत समजा....... आज काल आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त असलेल्या मुलांना आपल्या आई-वडिलांना ओळखायला त्यांना वाचायला त्यांना समजून घ्यायला वेळ नाही कारण जेव्हा फादर डे मदर डे असे असतात त्यामध्ये आजची पिढी ऑनलाइन शुभेच्छा देण्यासाठी बिझी असते पण घरामध्ये त्यादिवशी निदान तरी आपल्या आई-वडिलांना ग्लासभर पाणी देण्यासाठी यांच्याजवळ वेळ नसतो..बाबां व आईंना खरंतर जितकं प्रेम दिलं तितकं कमी असते. त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपल्यासाठी केलेले कष्ट इतके असतात की आपण आयुष्यभर जरी त्यांची परतफेड केली तरी आपण आपले अख्खे आयुष्य ही त्यांचे उपकाराची तिळमात्रही परतफेड करु शकत नाही. इतके आई-वडिलांचे उपकार आपल्या आयुष्यावर असतात . दोन चांगले विचार वाचून माणूस घडत नसतो, तर ते दोन विचार आत्मसात करून आपल्या आई-वडिलांना जपून आयुष्य घडत असते . बाहेरची व्यक्ती आपल्यासाठी काही करत नाही तरी आपण तिच्यासाठी किती आटापिटा करतो तीने आपले नाव चांगले काढवे यासाठी किती प्रयत्न करतो पण पण आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी आपण हे का करीत नाही केवळ समाजामध्ये नाव ,प्रतिष्ठा, इज्जत, मिळावी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी चांगलं जगाव का......? की त्यांनी आपल्या साठी आयुष्य वेचलं त्या आई-वडिलांच्या प्रेमाचं थोडं तरी मोल करून त्यांना भरभरून प्रेम द्याव, हा विचार का करू नये. तेव्हा ज्या बाबांनी आपल्याला आयुष्यभर जपले त्या बाबांचा आयुष्य आता आपण खूप सारं चांगला प्रेमाने फुलवू या त्यांच्या घावावर आपल्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मलम लावू या यामुळे त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या जखमेवर मलम लावून त्यांच्या वेदना कमी करून त्यांचे आयुष्य फुलवू या..... बाबा हा तो प्रेमाचा झरा असतो जो कधीच कधीच आटत नाही त्यामुळे या प्रेमाच्या झर्यामध्ये सर्वांनी आकंठ डुबले पाहिजे .बाबांच्या आयुष्याचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा त्यांची मुलं चांगली प्रगती करून आदर्श व्यक्ती म्हणून जगतात. आणि आपण सर्वांनी तसेच करून आपल्या आई-वडिलांना सदैव आपल्यावर गर्व वाटेल असेच वागून त्यांचे नाव लौकिक केले पाहिजे . शेवटी बाबा या शब्दावर कितीही लिहिले तरी बाबा शब्द स्वतः एक मोठविश्व आहे या मध्ये सर्वांनाच प्रेम मिळतं ,हे विश्व शांत असतं ,प्रेमळ असतं, निवांत शीतल छाया देणारा असतं ही छाया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहावी अशी प्रेमळ सावली म्हणजे बाबा नावाचं हृदय असतं........

गुरुवार, १८ जून, २०२०

जगुन पहावं थोडं आपल्यासाठी.........


आपण आयुष्य किती वर्षे जगतो याच्यापेक्षा आपण आयुष्य कसे आणि किती चांगल्या प्रकारे जगतो हे महत्त्वाचे असते. एखादा माणूस छोट्याशा आयुष्यामध्ये कधी कधी मोठे काम करून जातो तर तेच काम मोठ्या माणसाला आयुष्यभर करता येत नाही. माणूस सगळं आयुष्य हे अनुभवातून शिकत असतं अनुभवाचं पुस्तक हे जगातील सगळ्यात पुस्तकापेक्षा मोठं आहे. आपण किती पुस्तक वाचले हे कधीही महत्त्वाचं नसते, महत्वाचे असते आपण त्या पुस्तकांमधून काय घेतो ,अनुभवाचे पुस्तक वाचण्यासाठी कधीकधी आई-वडिलांच्या हृदयामध्ये झाकून पाहिले पाहिजे.जगात कोणीही करील नाही, कोणीही करणार नाही, एवढा मोठा त्याग कसा करायचा हे आई-वडिलांचे हृदय वाचल्या नंतर समजून जाते .मोठं शिक्षण घेतल्यानंतर कालपर्यंत सामान्य जीवन जगणारी मुलगा अचानक मोठे झाल्यानंतर, मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांना सामान्य वाटणाऱ्या आई वडिलांचा कमीपणा वाटायला लागतो , त्यांची साधी बोली त्यांचं राहणीमान यांनी त्यांचा जणू अपमानच होतो समाजामध्ये, अशी एक नाही तर अनेक उदाहरणे आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात . माणूस आयुष्य तर जगतो पण तो सदैव लोकांसाठी जगतो. कोण काय म्हणेल हा जणू त्याच्या प्रतिष्ठेचा विषय बनून जातो .प्रतिष्ठा जपता जपता माणसाला हव असलेल आयुष्य तो जगतो का.......? हा विचार एकदा तरी माणसाने करावा. लहान पासून सुरू झालेला आयुष्याच्या प्रवासात कधीतरी कुठेतरी थांबणार आहे आणि हे निश्चितच असते त्यामुळे इतरांचा विचार न करता आपले आयुष्य काही वेळासाठी तरी आपल्या मनाने जगून पहावे .इतरांचा विचार करता करता आपल्या लोकांना दुखवू नये.शेवटी प्रतिष्ठेच्या कोरड्या भिंतीत अडकलेल्या मनाला एक वेळ बंधनमुक्त करून पहा आणि जगा आपल्याला हवा असलेला आयुष्य निर्भिडपणे ,कुठलाही विचार न करता स्वच्छंदपणे , तेव्हा मुक्तपणे फुलुद्या मनामध्ये आयुष्याचे गीत ,आणि गात रहा आपल्या धुंदीत..........

शुक्रवार, १५ मे, २०२०

आभासी जीवन आणि वास्तव .........



माणूस स्वप्नाळू वृत्तीचा आहे त्याची खूप सारे स्वप्न असतात आयुष्यात, आणि ते पूर्ण करण्यासाठी तो दिवस-रात्र प्रयत्न करीत असतो, त्याला काहीतरी नवीन हवं असतं.आजच्या काळात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती पेक्षा वेगळा दिसण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो, आणि हा वेगळेपणा सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो. त्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळ असाव ही माणसाची वृत्ती होऊन गेली आहे.आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, घरात टीव्ही आहे ,कम्प्युटर आहे .टीव्ही मध्ये दिसणारे भव्य बंगले ,मोठ्या मोठ्या गाड्या, थाट नोकर -चाकर,या आभासी गोष्टी आपण पाहत असतो. आणि नकळत आपण त्या आभासी जगात शिरत असतो . त्या ही आपल्या जवळ असाव्या हा आपला प्रयत्न चालू राहत असतो. ही स्वप्न वृत्ती असणे चुकीचे नाही पण ही बाळगून आपल्या वास्तव जीवनातील आनंदा सोडून देणे हे मात्र चुकीचा आहे.
आणि आज होतय पण तेच . वास्तव जीवन सोडून आजचा माणूस आभासी जीवनाकडे चालून मृगजळाच्या मार्गावर धावताना दिसतो आहे.जन्माला आल्यापासून माणसाचा जीवन प्रवास चालू होतो .तो कुठलातरी रोल प्ले करीत असतो आणि हा रोल आपल्यासाठी बनवलेला असतो आणि तो रोल श्रेष्ठ आहे असे म्हणून आपण जगावे .तुमच्यासाठी तो बनवलेला रोल दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये आव्हान येत असतील तर ते आव्हाने तुमच्यापेक्षा चांगले प्रकारे निभावून कोणीही सादर करू शकत नाही. कारण तो तुमचा रोल आहे आणि तो तुम्हालाच सादर करून आयुष्याच्या रंगमंचावर आपला अस्तित्वाचा ठसा उमटवला लागेल.

सर्वांच्या आयुष्याची कहाणी ही वेगवेगळी असते .त्यामुळे आभासी जीवन बाजूला ठेवून वास्तव जीवनाचा आनंद घेऊन आपण आयुष्य जगले पाहिजे.कारण एका साधारण झोपडीमध्ये असलेला आनंद कधीकधी मोठ्या भव्य बंगल्यामध्ये पण नसतो. जिथे पैसा आहे तिथे समाधान असतेच असे नाही ,पण हे समाधान कधीकधी अर्ध्या भाकरीवर जगणाऱ्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर दिसेल. स्वप्न पाहून स्वप्नपुर्ती करणे ही वेगळे आणि आभासी जीवन जगणे हे वेगळे . स्वप्नपूर्ती करण्यासाठी माणूस रात्रदिवस मेहनत करून जिद्द चिकाटीने ते पूर्ण करून दाखवतो. पण नुसता आभासी जीवन जगणारा माणूस मात्र नुसते स्वप्न पाहून काहीच करीत नाही हे चुकीची आहे. आणि आभासी जीवन जगून वास्तव जीवनाला विसरणे म्हणजे आयुष्यातील आव्हानाला हरण्या सारखा असते. माझ्याकडे हे असावं,माझ्याकडे ते असावं ,त्याच्या कडे ते आहे ,त्याच्याकडे हे आहे, हा विचार करण्यापेक्षा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान म्हणून जगावं किंवा आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा आनंद घेऊन जिद्द ,मेहनत आणि परिश्रमाने इतरांचा उपहास न करता आपल्या आयुष्याला हवा तसा आकार द्यावा .

आयुष्याची स्पर्धा ही आपलीच आपल्या सोबत असते ,कारण ती जिंकण्यासाठी आपण आलेले आहोत. त्यामुळे आपल्या यशापयशाची तुलना कधीही कुणासोबत करू नये.आपले जीवन आपल्या पद्धतीने आनंदाने जगावे. शेवटी आभासी जीवनामध्ये आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवण्यापेक्षा वास्तव जीवनामध्ये मेहनतीने आपल्याला हवे तसे आयुष्य आनंदाने जगुन आपल्या आयुष्याला आकार द्यावा ......

शुक्रवार, ८ मे, २०२०

माझी प्रेमळ आई....



अमृताचे बोल तीचे
गाते प्रेमाची थोरवी
कल्पतरू ची सावली
माझी प्रेमळ आई............

स्पर्शाने तिच्या
दुःख दूर होई
डोळ्यात तीच्या स्वप्न
आपुलीच राही
सुखासाठी आपल्या
ती कष्ट फारच घेई
चंद्रा पेक्षा हि शितल
माझी प्रेमळ आई........

घावं लागता लेकरा
वेदना तिच्या काळजाला होई
कुरवाळत ती प्रेमाने
हलकेच जवळ घेई
घावा वर मारलेले फुंकर तिचे
औषध मोठे होई
सागराची अथांगता
माझी प्रेमळ आई........

व्यक्त होण्याआधीच
मनाला वाचून घेई
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
तिच्याकडे राहील
आपल्या वाटेवरची काटे
ती हलकेच वेचत जाई
अशी गुरूंची ही गुरु
माझी प्रेमळ आई........


सुखा दुःखात साथ देई
प्रेरणेचे बळ होई
निराश झालेल्या जिवनाला
पुन्हा ऊर्जा देई
सूर्यासारखी प्रकार शिकवण देणारी
ती कधी युगंधरा होई
आभाळाची भव्यता
माझी प्रेमळ आई.......

माझा श्वास जुळे तिच्या श्वासाशी
तिच्या हसण्याने स्पंदने
माझ्या हृदयाची वाजती
तिच्या असण्याने अर्थ
माझ्या आयुष्याला
माझेही आयुष्य मिळो तुला
माझी प्रेमळ आई........















बुधवार, ६ मे, २०२०

जगाला युद्ध नको बुद्ध हवा....



बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.
परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले. गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.

पुढे त्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला. महाज्ञानी गौतम बुद्ध ह्यांना जगातील दु:ख बघून संसारातून विरक्ती आली व त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केली.

अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. त्यांनी संपूर्ण मानवजातीला सदधम्माचा मार्ग दाखविला .
भगवान बुद्धांनी मोक्ष देण्याचे आश्वासन दिले नाही ते म्हणत मी मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही .भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण हे आहे की, पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे आणि ज्या स्वभाविक प्रवृत्तीनुसार मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया-प्रक्रिया यांना संपूर्णता समजून त्याचेवर विचार केल्याचा तो परिणाम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्या मुळे त्यांना मिळालेले इष्ट आणि अनिष्ट वळण त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय.सर्वच प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिले आहे मुक्तिदाता असल्याचे सांगितले आहे .मोक्षाचे आश्वासन न देणारे धर्मसंस्थापक केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत. त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता आता यामध्ये विभाजक रेषा काढली आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणार आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता होते.मोक्ष हा ज्याचा त्याने त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो असे त्यांचे सांगणे होते.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी संपूर्ण मानव जातीला दुःखातून मुक्त होणारा मार्ग दाखविला .भ. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व मानवजातीने पाच ही शीलाचे पालन करायला हवे .पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत.

 पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

 अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

 कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

 मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

 सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

भगवान गौतमबुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. त्यांनी दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना सांगितली. जीवन दुःखमय आहे, त्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचा नाश केला तर दुःखातून मुक्ती मिळते. यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला.बुद्ध प्रयत्नवादी होते. पूर्वजन्माच्या कर्माचे फलित म्हणजे दुःख, या पारंपरिक अंधश्रद्धेला बुद्धांनी तिलांजली दिली. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते.
ते अनित्यवादी आणि अनात्मवादी होते. घडणाऱ्या घटनांमागे शास्त्रीय कारण आहे, चमत्कार नाही. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्‍लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध. बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे, तर ज्ञानावर आधारलेले आहे.नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या :

सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.

सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.

सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.

सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.

सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.

सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.

सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.

सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

आज जगभर हिंसेने थैमान घातले आहे. विचार मान्य नसणाऱ्यांच्या हत्या करणे, प्रतिपक्ष, प्रतिराष्ट्र यांना संपविण्यासाठी जग शस्त्रसज्ज झाले आहे. तेव्हा विनाशाच्या उंबरठ्यावरील जगाला वाचवायचे असेल, तर भगवान बुद्धाच्या अहिंसेची नितांत गरज आहे. राजा प्रसेनजिताला कन्यारत्न झाल्यानंतर तो निराश झाला, तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, ‘‘राजा, मुलगी झाली म्हणून दुःख करू नकोस. मुलगीदेखील मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे.’’  मुलगीदेखील मुलाप्रमाणेच कर्तृत्ववान आणि वंशवर्धक आहे, असा बुद्ध उपदेश करतात. ते मध्यममार्गी होते.

आज संपूर्ण जग कोरोना नावाच्या भयंकर युद्धाच्या दुःखामध्ये ओढलेलंआहे.जो तो आज आपले प्राण वाचवण्यासाठी आपला आप्तस्वकीयांच्या प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे .पणे सगळेच सर्व चालू असताना कोणतीही गोष्ट नेहमीसाठी राहत नाही ती काही काही काळापुरती राहते हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे कोरोना नावाचा व्हायरस सुद्धा या जगातून लवकरच समूळ नष्ट होईल पण हे सर्व झाल्यानंतर माणसाला एक मोठा शिकवणीचा धडा मिळेल आणि जर त्याने धडा घेतला त्याला आत्मसात केला तरच पुढे माणूस हा चांगल्या पद्धतीने सन्मार्गावर जगू शकतो. कारण कोरोनाव्हायरस यायच्या आधी माणुस मोठ्या प्रगतीपथावर होतात सगळ्याच गोष्टी त्याच्या हातामध्ये होत्या पण हे सर्व असताना त्याने काय केले हे आत्मपरीक्षण करणे खूप मोठे गरजेचे आहे कारण माणूस हा मोठा प्रगतीच्या पथावर असतांना त्याने इतरांना काय दिले जगाच्या कल्याणासाठी काय दिले तो दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले तो कोणाकोणाच्या दुःखाचे कारण बनला त्यांनी स्वतः च्या स्वार्था पलीकडे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी कार्य केले का या सगळ्या प्रश्नांचा विचार करावा आणि जेव्हा कोरोना नावाचे युद्ध आपण माणूस जिंकू तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सगळेच प्रयत्न करूया कारण माणूस हा माणसासाठी आहे माणसाने चांगले कर्म करावे जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम आहे .त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलेला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मानव कल्याणासाठी कल्याणकारक मार्ग पंचशीलाचे पालन करणे , आर्यअष्टांगिक मार्ग समजून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करने भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग हा केवळ एका जातीधर्माचा नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणार्थ आहे. ज्यामधून प्रत्येक मानवाला आपल्या जीवन सुखकर करण्याचा मार्ग मिळू शकते. आजच्या जीवनात भगवान बुद्धाचा धम्म हा सगळ्यांना सन्मार्ग दाखवत आहे .संपूर्ण जगामध्ये वाढणारी हिंसा, क्रूर प्रवृत्ती, असमाधान माणसांच्या दिवसेंदिवस वाढणार्या इच्छा , सगळ्या गोष्टी विनाशाकडे घेऊन जाणारे आहेत ज्यामुळे माणसाला सगळंच मिळत तर आहे पण त्याचे स्वार्थी प्रवृत्तीने त्याचे समाधान मात्र कुठेच होताना दिसत नाहीये.बघता बघता प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आज क्रूरता आणि हिंसक वृत्तीचे दर्शन घडताना दिसत आहे त्यामुळे हे सगळे प्रवृत्ती माणसाने स्वतःच्या स्वार्थाचा पलीकडे गेल्यामुळे निर्माण झालेली आहे. माणसाला सगळंच मिळत आहे पण माणसे समाधान मात्र त्यांना कुठेतरी हरवलेला आहे माणसाची इच्छा इतक्या वाढत आहे दिवसेंदिवस त्याच्यावर त्याचे स्वतःचे तरी नियंत्रण आहे का? हा विचार त्याने करावा जेव्हा माणसाची इच्छा त्याच्या नियंत्रणात येतात माणूस सुखी राहतो."बौद्ध धर्म तीन सिध्दांताची दिक्षा देतो; प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धर्म जगातील शोषण थांबवू शकतो माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या संरक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सार्वजनिक बौद्ध धर्माचा स्वीकार करेल ".असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जगातील सध्याची संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता बौद्ध धम्म जगाला युद्ध पातळीवरून वाचवू शकते कारण कोरोणा नंतर कुठेतरी भयंकर युद्धाची लहर ऐकायला येईल या सगळ्या गोष्टी विश्वाच्या शांतीकडुन युद्धकडे नेणार्या आहेत विश्वाला युद्ध करणार्या मार्गाच्या आहेत आणि जगाला बुद्ध हवा युद्ध नको हे तत्वज्ञान समजणे संपूर्ण जगाला खूप महत्त्वाचे आहे.आणि तेव्हाच हे जग सावरू शकेल.

गुरुवार, १२ मार्च, २०२०

बाप

बाप हृदय लेकराचं
बाप अवघे आकाश
बाप श्वास जगण्याचा
बाप घरट आयुष्याचं

बाप वरून रागीट
पण त्याचं हृदय फुलाच
बाप पाहतो स्वप्नं
आपल्या उज्ज्वल भविष्याचं

बाप कष्टाचेच नाव
रातदिस ओझ फिकीरीचं
कसा चालेलं हा संसार
प्रश्न तोडते काळीज

बाप झेलतो ऊन
नसे तया कसलेच भान
बाप अस्तित्व घराचं
बाप गीता न् कुराण

बाप समजत नाही
कसा जगतो आयुष्य
त्याच्या काळजात वसे
फक्त हितच लेकराचं

बाप सागर अथांग
बाप अमृतेची ओवी
तो जळतो आयुष्य
देई प्रकाश लेकरास

बाप गरज आयुष्याची
बाप भक्कम आधार
त्याच्या नसण्याने वाटे
सुनंसुनं जगण्याचं

बुधवार, ११ मार्च, २०२०

स्वप्नांना पंख हवे....

ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. गावामध्ये जेमतेम सातवी आठवी ते दहावीचे शिक्षण असेल आणि असेल एखादी प्रगतशील गाव तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध उपलब्ध असते, पुढील शिक्षणाचा प्रश्न हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न त्यांच्या समोर येऊन उभा असतो. कारण ग्रामीण भागातील मुलं ही सामान्यता शेतकरी कुटुंबातील असतात. अत्यंत हुशार आणि मेहनतीने अभ्यास करतानाही त्यांना आजही आपले स्वप्न पूर्ण करताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. घरांमध्ये असलेली आर्थिक परिस्थिती हे सगळ्यात मुख्य समस्या होऊन बसली आहे .कारण ग्रामीण भागातील लोकांकडे खाण्याचे वांदे असतात.त्यात इतके पैसे नसतात की त्यांनी त्यांच्या मुलांना बाहेरगावी शिकवण्यासाठी पैसे देऊ शकतील, या सगळ्यामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल पाहिजे तितका विकास झालेला नाही आणि ही मानसिकता सुद्धा अजूनही जास्त प्रमाणात बदललेली आपल्याला दिसत नाही. मग असे असताना ज्या मुलींचे स्वप्न शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हायचे असेल त्यांना मात्र या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. बाहेर गावी शिक्षण म्हटल्यानंतर आई-वडिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे पैशाचा, शेतकरी कुटुंबात असणारा हा अत्यंत ज्वलंत प्रश्न हा मात्र आजही तितक्याच प्रमाणात आहे. जेमतेम बारावीपर्यंत किंवा पदवी पर्यंत या मुलींचे कसेतरी शिक्षण होते यामध्ये मुख्यता बीए वगैरे करणारे मुले मुली पुढे त्यांना कुठलाही मार्ग सापडत नाही. कारण बी ए नंतर काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो कुठेही नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर, मेडिकल, वकील या सगळ्या मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्याशिवाय आजही नोकरी मिळत नाही .या सगळ्या परिस्थितीमध्ये या मुला -मुलींचे शिक्षण मात्र अधांतरीच राहून जाते .शिक्षणाचे स्वप्न पहाणं हे आजच्या ग्रामीण भागातील मुला- मुलींसाठी अत्यंत कठीण होत चाललेल आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारचिन्ह सगळीकडे दिसत आहेत असे असतानाही एक स्त्री वर सुद्धा आज कौटुंबिक जबाबदारी आलेली आहे. जेव्हा मुल मुली शिकतील तेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि शिक्षणावरच सगळं काही करता येते , शिक्षण हे कधीही वाया जात नाही ते आपल्या कृषी क्षेत्रापासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येतो. आजही ग्रामीण भागातील शेतकरी स्त्री पुरूष हे सुशिक्षित असणे अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या शेतीच्या भरघोस उत्पादन घेण्यासाठी लावून चांगले उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात आणि या सगळ्या पद्धतीनुसार आपल्या समाजाला ,गावाला एक नवीन आदर्श देऊ शकते .अशी कितीतरी उदाहरणे आज आपल्या समाजामध्ये घडतांना दिसत आहेत हे सगळे असतानाही हा आजच्या मुला- मुलींची शैक्षणिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे तेव्हा आपल्या ग्रामीण भागातील महिला मुली आणि मागासलेल्या विभागाची प्रगति होणे आवश्यक आहे. कारण शैक्षणिक प्रगती मधूनच समाजाच्या प्रत्येक स्तरावरची प्रगती ही आपण शिक्षणाच्या बळावरच करू शकतो, कारण शिक्षण ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला- मुलींना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींना समजणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे प्रवास करताना तासन्तास बस ची वाट पाहणे स्टॅण्डवर उभे असताना नाना प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते .अशा सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यामुळे निमूटपणे सहन करीत ह्या मुली आपले शिक्षण घेत असतात. गावामध्ये उपलब्ध नसलेलं शिक्षण यामुळे या होतकरू हुशार मुला- मुलींचे स्वप्नही कधी स्वप्नच राहून जाते.ज्यांचे ध्येय मोठे आहे त्यांचे ध्येय तिथेच विरून जातात. ज्यांनी शहरी भागांमध्ये मार्ग वळला त्यांचे स्वप्न कुठेतरी अंकुरायला लागते पण या सगळ्या गोष्टी मध्ये या होतकरू आणि हुशार मुला- मुलींच नुकसान होतं.नुकसान केवळ एका मुली वा मुलाच नसून एका गावाच आहे ,समाजाचे आणि राष्ट्राचे असतं. त्यामुळे शिक्षणाला आजच्या दृष्टिकोनातून आजच्या ग्रामीण भागातील मुला मुलींची शैक्षणिक अवस्था समजून त्याच्यावर उपाय योजना काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय सुरु करुन या सगळ्या मुलाना पदवी झाल्यानंतर रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे .त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ राहता येइल. त्यांना कसल्याही प्रकारची तडजोड करून शैक्षणिक मदत करणे गरजेचे आहे .ग्रामीण भागातील शहरी भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्पेशल फक्त मुलींची बस चालू करणे, ज्यामुळे त्यांना सहज आणि कुठलाही त्रासाविना आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येईल ,ग्रामीण भागातील या समस्या अत्यंत विदारक आहेत.आपण कधीतरी प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर अंगावर काटा उभा राहतो. कारण शिक्षणाच्या बाबतीत जिथे जिथे मागासलेला भाग आहे तिथे मुलींचा बालविवाह करण्यात येतो लपून-छपून का होईना असे प्रकार सर्रास ग्रामीण भागांमध्ये पाहण्यास मिळतात हे कुठेतरी थांबले पाहिजे कायद्याने त्या बालविवाहाला बंदी आहे पण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आजही आपल्या समाजातला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न हे स्वप्न न राहता ते पूर्ण होऊन त्यांच्या स्वप्नांना भरारी घेता यावी याकरिता शासनाने गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय खोलून गावातील शिक्षणापासुन वंचित मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन आपला देश सबळ करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाची आहे.जेव्हा आपल्या देशातील गावातील प्रत्येक व्यक्ती शिकलेली असली तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल.शेवटी या या निरागस स्वप्नांना पंख मिळू द्या आणि बेधुंदपणे त्यांना आपल्या आकाशात झेप येऊ द्या..


अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर

शनिवार, ७ मार्च, २०२०

घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी.....



स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा इतिहास पाहिला तर स्त्रीजीवन हे कुठे सुरक्षित नसून असे दिसून येते . गाव शहर दिल्ली असो वा गल्ली असो तिच्यावरील अत्याचाराची कथा अजूनही संपलेली नाही. महिलांवर होणारे अत्याचार देशहितस बाधक ठरत आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे तिने केव्हाचेच सिद्ध केले आणि आजही करत आहे, पण आज देश एवढा पुढे गेल्यावर सुद्धा आईला तिच्या लहान मुलीला कोठे पाठवताना विचार करावा लागतो. देश पुढे गेला पण मानसिकता मात्र तिथेच खिळून बसलेली आहे.लहान मुली असो अथवा महिला त्यांच्या मनात एक असुरक्षेची धास्ती भरलेली असते, जेव्हा समाजात रक्षकच भक्षक होताना दिसतात. तेव्हा आपण आपले सामर्थ्य पणाला लावून आपल्या सुरक्षेसाठी सामर्थ्यवाण असले पाहिजे. स्त्री अबला नसून सबला आहे
पणती आहे तू दोन्ही अंगणातील
तू प्रतीक आहे वात्सल्याचि
उठ ही लढाई लढण्यासाठी
कोणी न परतून पाहे
तूच स्वतःसाठी क्रांती कर
तुच स्वतःची रक्षक आहे
स्त्री अथवा मुलीच्या सुरक्षेच्या जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्या घरातील व्यक्तीवर अवलंबून राहतात. परंतु नेहमीचे त्या लोकांसोबत असणार का? अन नसले तर आपली शिखर गाठण्याचे थांबून देणार का? तुमच्या हक्कावर कोणी गदा ठेवलं तुम्ही केव्हा निमूटपणे पाहण्याचे काम करणार का?असे कितीतरी प्रश्न उभे राहतात. स्त्री जीवन सुरक्षित कसे राहता येईल त्याचे सक्षमीकरण सबलीकरण करता येईल यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात असतानाही आजही आपल्या अॅसिड़ अटॅक असो किंवा बलात्कार ,विनयभंग यासारख्या मानवाला लाजिरवाण्या गोष्टी समाजामध्ये क्षणोक्षणी घडताना दिसतात. कुठेतरी कुणातरी मुलींचा कुणीतरी निष्पाप जिवांचा कुठेतरी जिव जातो. या सगळ्या कारणांमुळे आपण आपल्या देशाची प्रगती करीत आहोत का किंवा आपल्या देशाची अधोगती चालू आहे आपला देश किती पुढे चालला आहे, आपल्या देशाचे संरक्षण आपण किती प्रमाणात करत आहोत, आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाची प्रगती कुठपर्यंत आली .आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणे सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण आपण जेव्हा सुरक्षेचा मुद्दा घेऊन बसतो तेव्हा सगळेच नाना प्रकारचे आपले आपले मत मतांतर मांडतात आणि सगळं करत असताना.हे सर्व असताना स्त्रियांनी मात्र आपण सक्षम आहोत आपल्या स्वतःचे सामर्थ्य वाढवून स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. त्यांनी दाखवून दिले पाहिजे की आम्ही कुठे कमी नाही आहोत. आमच्या मनगटामध्ये स्वतःचे अस्तित्व घडवण्याचे सामर्थ्य आहे.आज देशातील कोणतेच पद नावे जिथे महिला आपले कर्तव्य बजावत नसतील आज देशाचे संरक्षणमंत्री असो अथवा राष्ट्रपती व पंतप्रधान अंतराळवीर असो प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेजर एक महिला आपल्याकर्तुत्वाच्या बडा तून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलू शकतात तर तुम्ही-आम्ही स्त्रिया मुली युवती स्वतःचे संरक्षण का करू शकत नाही? पक्षी पाखराला पंख फुटले की त्याचे पंख वाढावे यासाठी फांद्यावरून खाली ढकलतात त्यांचा मानस त्यांना इजा पोहोचण्याची नसतो तर पाखरांच्या पंखात बळ घेऊन तेव्हा उंच भरारी घेता यावी हा असतो हा पक्षाच्या आदर्श पालकानी घेतला पाहिजे त्यांनी आपल्या मुलीच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून त्यांना संरक्षणाचे धडे दिले पाहिजे आई-वडिलांनी मुलिंना चांदण्यासारखे नाहीतर प्रखर तेजस्वी सूर्याप्रमाणे बनवावे त्यांच्याकडे पाहण्यासाठी डोळे उघडून पाहण्याचे सामर्थ्य कोणात नसले पाहिजे. त्यामुळे मुलींनी आपण काहीच करू शकत नाही म्हणून हातावर हात ठेवून बसून नये तर स्वतःच्या सुरक्षेसाठी कणखर बनले पाहिजे . आजच्या काळातील विज्ञानवादि युगामध्ये समाजातील स्त्रीची भूमिका लक्षात घेता आजच्या स्त्रीची ही प्रगती आहे ही अधोगती आहे, या बद्दल मनामध्ये शंका तयार होते. कारण एकीकडे तिची वाढणारी गगनचुंबी भरारी आहे तर एकीकडे तिच्या श्वासाला आजही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मग हे सगळं चालू असताना तिला मात्र आजही आपल्या हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी युगा युगा पासूनचा जो संघर्ष चालू आहे तो आजही चालु आहे. हा संघर्ष कधीच थांबणार हा मनात सदैव छळणारा प्रश्न तिचा हा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न मनात सतत चालू असते दिल्लीतील निर्भया असो गावातील खैर्लंजली मधील निष्पाप पिडिता असो, काय चुकतंय मुलींचं त्यांच्यावर अत्याचार होऊन त्यांच्या आयुष्याला संपवून टाकण्यात येतं की त्यांच मुलगी असणं हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे का? त्यांच्या अस्तित्वावर आजही प्रश्न उत्तर असतात. त्यांच्या राहणीमानावर त्यांच्या कपड्याला त्यावर त्यांनी काय घालाव काय नाही हे ठरवलं जाते.आज समाज घडवताना स्त्रिचा खारीचा वाटा आहे पण
असे असतानाही तिच्या अस्तित्वाला आजही दुय्यम समजण्यात येते, हा केल्या जाणारा पुरुषसत्ताक समाजाचा सगळ्यात मोठा कपट प्रयत्न आहे .ज्या मुलीवर अत्याचार होतात त्यावर निषेध करणारे हात कमी असतात पण त्यांच्या कपड्यावर त्यांनी काय घालाव काय नाही असे अकलेचे तारे तोडत तिचीच अवहेलना करणारे आपल्या समाजातीला काही महाभाग आहेत.हे पाहुन आपला समाज किती पुढे गेलाय आपल्या समाजाची किती मानसिकता बदलली आपला समाज किती मानसिकता आहे बदलण्याची सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला येतो. काय ती मुलगी पुन्हा परत येईल का कुणाचे आयुष्य असे संपवून टाकले जाते. अलीकडे तर एक ट्रेड होऊन बसलाय ,कोण्या निष्पाप जिवावर अत्याचार झाला की सगळेजण हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढतात. काय होईल त्या मूक मोर्चा काढल्याने. आणखी किती मूक मोर्चे काढणार आपण मोठ्या मोठ्या मेणबत्त्या आणि जळणारे त्यावर मेणबत्त्या सारखे आणखीन किती मुलींना जळताना पाहणारा ?पण हा विचार आपण नाही तर कोण करणार? मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली मुलींना आधी सुरक्षित करा आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतातील नागरिकांनी प्रत्येक समाजातील घटकांना स्वतःचे कर्तव्य म्हणून सांभाळली तर महिला मुली कुठेही सुरक्षित असतील अस वाटतं . सुरक्षा ही कुठेही विकत मिळणारी वस्तू नसून सुरक्षाही प्रदान करावी लागत असते . मुलगी जरी सक्षम झाल्या तरी आपल्या समाजातील दृष्टिकोनही तितकाच बदलणे गरजेचे आहे . रस्त्याने जाणाऱ्या मुलींना जर तुम्ही सुरक्षेची एक भिंतीचे कवच म्हणून जर तुम्ही वावर करत असाल तर कुठलाही समाज कुठलाही मुलीमध्ये कुठल्याही समाजामध्ये कोणतीही मुलगी कुठल्याही अत्याचाराला बळी पडणार नाही.हे जर आपण केलं तर आजही आपल्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये मुली सुरक्षित होणार आणि मुलींनी सुद्धा आपले कर्तव्य माणूस स्वतःच्या संरक्षणासाठी कार्य केले पाहिजे. समाजासाठी समाजातील इतर मुलीसाठी कार्य केले पाहिजे या उच्चपदस्थ महिला आहेत त्यांनी या ग्रामीण भागातील मुलींकडेप्रामाणिकपणे लक्ष देऊन त्यांच्या हितार्थ काही करता येईल का त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही करता येईल का याच्या विचार नक्की करावा. कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला वेळोवेळी पावलोपावली न्याय मिळत गेला आणि मिळतो आहे पण हे सगळं करत असताना त्या निष्पाप जीवाचा बळी जातो कधी त्या निष्पाप जीवाला आपल्या अस्तित्व गमवावे लागते.त्यामुळे त्यांचे अस्तित्व त्यांचे पुन्हा परत येत नाही त्यामुळे महिलांनी सर्वात अधिक कायद्याचे महत्त्व आपल्या जीवनात समजून घेऊन आपल्या कायद्यात माहिती करून घेणे आपला अधिकार काय आहे, आपले कर्तव्य काय आहेत या गोष्टीचं ज्ञान हे आजच्या मुलींना असळे पाहिजे महाविद्यालयीन युवतीने आपले लक्ष आपल्या कणखर ध्येयावर ठेवुन सामर्थ्यवान घडले पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितले पाहिजे की आम्ही लेकी आहोत जिजाऊच्या ,सावित्रीच्या त्यामुळे उगाच आम्हाला कमजोर समजु नका वसा आम्हाला त्यांचा हा वसा आमच्या मना मनात रुजलेला आहे आणि हेच सामर्थ्य तुम्ही येणाऱ्या जगामध्ये रुजवावा. त्यामुळे कुठल्याही वेळेस मुलीकडे पाहतांना तयाचे डोळे लाजले पाहिजे. मुलींनी स्वतःला कणखर बनवले पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे.
यांनी स्वतःच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे स्वतःला सक्षम बनवून सिद्ध केले पाहिजे कारण स्त्री आदर्श विश्व घडू शकते. नेहमी स्त्री सक्षमीकरणावर बोलले जाते पण बोलून दाखवतात त्यांच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे असे पाहिल्‍यास शहरी भागातील महिला पुढे गेल्या पण योग्य ते मार्गदर्शन न मिळल्याने ग्रामीण महिलांमध्ये अजूनही त्या स्थितीत खितपत पडलेले आहेत .म्हणून सक्षमीकरणाचे पावले ग्रामीण भागातून करण्यासाठी सुरुवात करण्याची महत्त्वाची बाब आहे ही सक्षमीकरणाची क्रांती सगळ्यानी एकत्र येऊन करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा ही स्त्री ही खऱ्या अर्थानेआपले अस्तित्व आणखीन प्रामुख्याने सिद्ध करू शकते. शेवटी स्त्री सक्षम झाली तेव्हा देश सक्षम होईल म्हणून घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी..

अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

बाबा गेल्यावर आयुष्य सारे अंधार आहे........




हे सागरा  तुझ्यातही सामावणार नाही
एवढा मोठा   दुःखाचा सागर  माझ्या मनात आहे!
कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा  
कधी न संपणारे हे वादळ बाबा गेल्यानंतरचे आहे !
रात्र ती अमावाशेची  वाटावी किती भयावह  काळी
पण यापेक्षाही अंधारलेले दुखाने माझे मन आहे !
तीमिरात कुठे  हरवले वात्सल्य तयांचे
शोधू कुठे मी आता केवळ हा जगण्याचा  भास आहे !
बाबा बाबा म्हणणारे मन आजही मानत नाही ते गेल्याचे
आजही डोळ्यात वाहणारा आसवांचा पूर आहे!
सोप असत दुनियेला हे म्हणणं कि सावर स्वतःला पोरी
पण हे कधीच न सावरणार दुखावलेले मन आहे !
कठीण होऊन जातं आयुष्य जेव्हा आठवण बाबांची येते
पण आता स्मुती तयांच्या माझा जीवनाची नावं आहे!
सहज कळत नाही दुनियेला प्रेम बाबाचे
ज्यांच्या कडे आहे हे प्रेम  तो  सर्वात धनवान आहे!
राहावे सदैव प्रेम बाबाचे सदैव राहावी हि सावली
कारण बाबा  गेल्यावर आयुष्य सारे अंधार आहे !  
                                 अॅड विशाखा समाधान बोरकर