शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

पुन्हा निर्भया.....


आज पुन्हा मेणबत्त्या जाळल्या जातील
झोपलेली माणसे जागे होतील
हाहा कार होईल पुन्हा तिच्यासाठी
पुन्हा हा आवाज शांत होईल
का होत असे की नकोच तिला रात्री फिरण्याचा अधिकार
कोण कुठे कसे मुखवटे घालून असेल काय तिला कल्पना
आणखी किती निर्भया होतील
कोपर्डी असो की दिल्ली
ती कुठेच सुरक्षित नाही
त्या निष्पाप जीवाचा जीव जातो
आयुष्य तिचे तिथेच थांबते
या विचाराने सर्वच मने पेटून उठतात
त्या नराधमाला फाशी द्या म्हटले जाते
न्यायालयाचे दार ठोकले मात्र जाते
 आसवे पुसत हे सर्व पाहत असते
प्रश्न तिचा तोच असतो थांबवा हा खेळ आमुचा
आणि मुळासकट करा नायनाट ह्या प्रश्नाचा
मी एकटीच नव्हे तर कितीतरी जीव जात आहेत आणि जातील
त्या जाणाऱ्या जीवाला सुरक्षित करा
बंद करा ह्या नेहमीच्या मेणबत्त्या जाळणे
काय होईल तसे करून काय त्या पुन्हा परत येतील
करा रक्षण त्या मुलीचे  ज्या या असुरक्षित जगात जगतात
वेळ येताच धावून जा स्वतःची बहीण समजून
तेव्हाच ह्या घटना बंद होतील
अन्यथा हे सत्र तर चालूच राहील पुन्हा एकदा  प्रियांका ,
कोपर्डी ,निर्भयाच्या नावाने......
                                      अॅड विशाखा समाधान बोरकर




       




सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

निसर्गाचे लोभस रूप..................




निसर्गाच लोभस रूप ,आणखीच डोळ्यास भोवते
जेव्हा वाऱ्यासोबत हिरवे झाड झुळूझुळ डोलते
ढग गर्जती नभामध्ये पाखरा  देइ मायेचा सहारा
भिजलेल्या धरतीवर बीज अंकुरुन फुलायला लागते

रिमझिमणारे थेंब पावसाचे पानावरी हसू पाहते
चिंब भिजलेले झाड सोनुकले वर्षाने किती आनंदते
नांगर हाकत शेतामधी तो थकून जातो पार
निवांत वेळी झाडाच्या छायेत तो हलकेच निजायला लागते

वृक्ष माय – बाप सर्वाचा उन्ह पानांवर झेलते
त्यागातच जाते जीवन त्याचे स्व;तास काय मागते
फळ - फुल त्याची देतो सर्वाना वाटूनि
लेकराची भूक भागवतांना मनोमन हसायला लागते .

आयूष्य जाते त्याचे देता – देता
हे माणसाला कधी बर कळते
वृक्षाची कत्तल करून माणूस कुऱ्हाळी
      पायावर मारते
माये  समान प्रेम झाडाचे टपटप गळतात आसवे
दिसू न देता कुणास ते चटकन पुसायला लागते

माणसाचा जन्म तयांवर शेवटी हि त्यावरच होते
शेवट पर्यन्तची साथ आपली तोच मित्र जपते  
देता निरोप शेवटचा डबडबतात त्याचे हि डोळे
आपल्या विरहाने तो हि सखा अग्नीत जळायला लागते .
                   

                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                       ता. पातुर जि. अकोला
                             
                        

हुंदका ..............

हुंदका........................


शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होतीतिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला.

तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व... तिचे आई-बाबा आणि तिचा परिवारसुद्धा... दोघींचे अनोखे विश्व होते. सुमनचे बाबा ती दहा महिन्यांची होती तेव्हाच वारले होते. सुखवस्तू घरात तिचे लहानपण गेले होते. तिला कशाचीच कमी नव्हती. उणीव असायची ती केवळ तिच्या बाबाची. ती नेहमी तिच्या आईला विचारायची आई बाबा कसे दिसायचेते माझा खूप लाड करायचे कात्यांना माझी आठवण येत असेल काआई शाळेतील सर्वच मुली त्यांच्या बाबांसोबत येतात तेव्हा मला बाबाची खूपच आठवण येते गं... जेमतेम तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सुमनचे शब्द ऐकून मात्र तिची आई सुन्न व्हायची. ती सुमनला बाबाच्या आठवणी सांगायची. असे करता करता अनेक दिवस निघून गेले. सुमन पाचवीला शिकत होती. सुमन अभ्यासात फार हुशार होतीत्याचबरोबर ती आईला मदत करायची. तिची आई लहान मुलांना शिकवायची. त्यातून मिळणारे पैसे ती सुमनच्या शिक्षणाला लावायची. सुमन फार हळवी होती. कुणाचेही दुःख पाहून लवकरच ती भावूक व्हायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आवडीची होती सुमन. तिला निसर्गात स्वतःला विसरून बेभान व्हायला आवडायचंतर कधी ते बालमन तासनतास त्या वेड्या पाखरांचा लपंडाव पहायचे. ई... आई बघ की ते पाखरू किती उंच उडतंय... व्वा किती गं ही उंच भरारी... आई मलापण या पाखरासारखे उडावेसे वाटते. चल ना मला घेऊन कुठेतरी या जगाला विसरून या पाखरासारखं लपंडाव करायलाअसे ती आईला म्हणत होती. आई मात्र त्या कोवळ्या बालमनाचे ते निरागस प्रश्न ऐकत होती
"जाऊ रे माझ्या राजा"असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.

तिला सुमनचा एकही शब्द मोडवेना पण कालपर्यंत सुखात वाढलेल्या या पोरीला कधीतरी तिला नाही म्हणावं लागेल याचे आईला फार दुःख व्हायचे. आता तर आणखीच भलमोठं संकट येणार होतंअसा ती विचार करते न करते तर बाहेर पोस्टमन आला पत्र घेऊन. जसे पत्र हाती पडले तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती घाबरून नुसतं पाहण्याचे काम करायची. सुमन आलीतिला हलवलेआई आई म्हटले तेव्हा कुठेतरी तिला जाग आली. तिने सुमनला घट्ट पकडून आक्रोश केला. सुमा... माझ्या बाळाआता आपण कुठे जावेकुठे राहावे मला काहीच कळत नाही रे माझ्या राजा... आई सुमनला सांगत होती कारण सुमनचे बाबा गेले तेव्हापासून तिच्या काकाने त्यांना घरातून जायला भाग पाडले होते. पण खूप विनंत्या करून त्यांनी आजपर्यंत राहू दिले कारण त्या काकाने सर्व संपत्ती धोक्याने मिळवली होती. त्याला थोडाही तरस येत नव्हता सुमा आणि तिच्या आईवर... आता त्याने ते घर विकले होते. त्या घरमालकाला आता घर पाहिजे होते त्याकरिता काहीपण करून उद्या घर सोडून जाणे भागच होते. सुमनची आई खूप रडत होती... तिला काहीच कळेनाकाय करायचे ते... तिला सुमनच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझी लहान पोर घेऊन मी कुठे जाऊ... माहेरी अनाथ असलेल्या सुमनच्या आईला सुमनशिवाय कोणीच नव्हते. अगदी लहान वयात सुमनला काय करावं काही सुचेना.

आसवांच्या पुरात ती रात्र निघून गेली होती. सकाळ झाली... सुमन डोळे चोळत उठली... आई आई करून आईला हाक मारीत होती पण तिला आई मात्र कुठेच दिसत नव्हती. ती बागेत गेली जिथे तिची आई तिच्यासोबत खेळायची... तिथेही तिला आई कुठेही दिसत नव्हती. शेवटी ही आई गेली तरी कुठे... तिला काळजी वाटू लागली. ती शेवटी आईला शोधत स्वयंपाकगृहात गेली तर पाहते तर काय तिची आई झोपलेलीच होती. तिला पाहताच लहान सुमन धावतच गेली... आई आई म्हणाली. आई काही उठेना... सुमन रडत होती. त्या दिवशी तिचा काका तिच्या आईला घरातून काढून देण्याच्या आसुरी आनंदाने पाहायला आला होता. त्या घराचे मालक आणि तो गेटवर उभे होते. आता कुठे जातील ह्या मायलेकी हे पाहण्यासठी तो आला होता. तो सुमनच्या आई-बाबाचा पक्का वैरीच होता. धोक्याने त्याने त्याची संपत्ती मिळवली होतीपण सुमनच्या आईला मात्र आता काहीच संपत्तीचा लोभ नव्हतापण तिच्या काकाने सुमनच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं घर सोडून जाण्याचा आवाज असेल... त्याच आनंदासाठी तो पाहण्यासाठी ते इथे आले होते. इकडे सुमन आईला हलवून हलवून थकली. तिचा आवाज ऐकून शेजारील बाया आल्या. त्यांनी सुमनला जवळ घेतले आणि त्यांनी एकच आक्रोश केला तिला पकडून... बाळ सुमा... तुझी आई गेली... आपल्या सर्वांना सोडून... सुमाला काय करावं काही सुचेना. रडण्याचा आवाज ऐकून तो राक्षसी प्रवृत्तीचा काका आला. तो आला तर खरं पण हा सर्व क्षण पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होतीत्याच्यातील माणूस जागा झाला होता. सुमाच्या आसवांनी त्याला माणूस केले होते. त्याला हा आयुष्याचा विध्वंस पहावला नाही. तो लहान सुमनजवळ आला. त्याच्या आईचे पाय पकडून माफी मागत होता. त्याच्या बदल्याच्या वृत्तीमुळेच आज हा दिवस आला होता. बाळा... मला माफ करमी तुझी माफी मागतो. मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या आयुष्याचा गुन्हेगार आहेमी तुझ्या आईची माफी मागण्याच्या लायक नाही. बाळा पण आजपासून तूच माझं आयुष्य आणि तूच माझी खरी संपत्ती... असे म्हणून त्या दिवसापासून निरागस सुमाचे हसणे बोलणे गेले. होता केवळ हुंदका... जो फक्त ती जिवंत आहे याचा भास करून जायचा.

आई गेल्यावर तिच्या काकाचा प्राण आणि सर्वस्व होती सुमन... पण तिच्यातील जीव आईसोबत गेला होता. आज ती मुलींना पाहते तेव्हा तिच्याजवळ असतो तो केवळ हुंदका आणि हुंदका आणि फक्त हुंदका... 
                                           अॅड विशाखा समाधान बोरकर 
                                         
                          
                         
        

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

आयुष्याचे शेवटचे पान



आयुष्य जीवनातील प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवत राहत ,ते किती हि चांगल्या प्रकारे जगले तरी प्रत्येक वेळी आनंद मिळत नसतो , कधी - कधी पदरी निराशा हि येते .आयुष्यभर इतरांसाठी जगता – जगता एक दिवस तेच त्यांना कधी परके होतात कळतच नाही . ज्या मुलांसाठी आई – वडील आयुष्य वाहुन टाकतात ते मुले त्यांना अधांतरी सोडून का जातात? समाजात नेहमीच त्या थकलेल्या चेहऱ्यावर दु;ख दिसते जीवनाचे रस्ते पार करता – करता अखेर शेवटच्या वळणावर  त्या  म्हाताऱ्या आई – वडीलांना दु;खाचे दिवस त्यांचीच मुलं दाखवतात घ्या सर्व गोष्टीने मन सुन्न पडते


         आयुष्याची वाट शेवटची
         का दु;खाची होऊन जाते
         तुटलेल्या काळजाला का
        आणखी तोडून जाते .
        संपते ती एक – एक पाने आयुष्याची
       शेवटचे पान का जीवनाचे
       आसवांनी भिजून जाते .

मुलांची स्वप्न पूर्ण करता – करता आयुष्याची  पाने कधी भरभर उडत गेली कळतच नसत .त्या पानांवर  झळकणारे सुख – दु;खाचे आसवे मात्र तसेच उमटून जातात. आज त्या भिजलेल्या डोळ्यांनी आजोबा आयुष्याची पाने उलटून पाहत होते आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलांना मोठं घडवल होत .मुलांना त्यांची आई नसण्याची कधी उणीव त्यांनी घेऊ दिली नाही . आजोबा त्यांना कधी आई सारखे तर कधी वडील सारखे प्रेम द्यायचे , पण जेव्हा पासून ते निवृत्त झाले तेव्हा पासून जणू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच हरवलं होत काल पर्यंन्त सुनानातवंड व मुलांना अनमोल वाटणारे त्याचे प्रेम आज नकोस वाटत होत .आता आजोबा एकटेच पडायला लागले घरात  केव्हा बाहेर फेरफटका मारावा  आणि समोरील त्यांच्या जिव्हाळयाची  बाग इतकेच मर्यादित उरून पुरलं होत त्याच आयूष्य, जेवढ प्रेम त्याच मुलावर होत तेवढेच त्या बागेवर हि घरात उदास वाटले कि ते बागेत सुखाचा श्वास घ्यायचे .त्याच असणे वा नसणे  यावर  सुध्दा त्यांना काळजी नसायची सुनेला जर चुकून पाणी मागितले तर ती चटकन उत्तर द्यायची
   ‘’घरीच तर असता तुम्हाला तेवढ हि करू नये का
    इतकच काम नसतात आमच्या मागे ‘’

असे बोलून ती निघून जायची .आजोबा मात्र नुसत बघत राहायचे. आजोबांचा प्रत्येक दिवस दु;खात उगवत असायचा व आसवांच्या पुरात डुबायचा ते सर्वासोबत प्रेमाने बोलू पहायचे व पण बदल्यात त्यांना केवळ तिरस्कारच मिळायचा .त्याच्या शेजारी एक सुखी कुटुंब राहायचे जे आजोबांवर जीवापाड प्रेम करायचं आजोबा त्यांच्या वडीलसारखे वाटायचे .त्याच्या बाळाला आजोबांचा फारच जिव्हाळा लागला होता . त्या बाळाच्या सहवासात आजोबांचे दिवस हि आनंदात जाऊ लागले हिते ,त्याच्या हसण्याने ,बोबड्या बोलाणे आजोबांच्या आयुष्यात जणू वसंत आला होता .
एकदा हे शेजारी कुटुंब परगावी गेले ,काही दिवसातच परतणार होते ,त्यांनी आजोबाना ही सोबत येण्याचा हट्ट केला पण आजोबाने  स्वताच्या घरीच राहणे पसंद होते. .ते बाळ त्याचा दूर गेल्याने त्यांना पुन्हा एकटेपणाची जाणीव झाली होती असेच विचार करीत असतांना त्यांना चक्कर आला व ते बागेत पडले संध्याकाळपर्यंत ते तसेच पडून होते .रात्रीला त्यांचा मुलगा घरी आला ..व तो आजोबांची विचारपूस करू लागला आजोबा घरी कुठेच दिसत नव्हते ,त्यांनी घाबरून त्यांची विचारपूस  केली.पण आजोबा कुठे मिळेना ते आजोबाना शोधत होते ,शेवटी बागेत जाऊन पहिले तर आजोबा बेहोष पडून होते त्यांना उचलून घरात आणले ,डॉक्टर ला दाखवले .
        ‘घरातच राहायल नको का बाबा तुमच्या मुळे किती त्रास झाला आम्हाला’अस मोठ्याने मुलगा बोलत होता
         ‘अहो त्यांना आपल्याला कसा त्रास दिल्या जाईल इतकेच माहित आहे’
सुनेने सासर्याकडे पाहत म्हटले .आजोबांच्या तब्येतीची कुणालाच काही पडले नव्हते ,ते तर त्यांना झालेल्या त्रासाप्रती आजोबांशी वाद घालत होते .आयुष्यातील झालेलं हे म्हातारपण  नावच ओझ सगळ्यांना नकोस झाल होत .आजोबा आता बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते ,जीवनात आलेलं वादळच त्यांना पुरेस होत .आजोबा त्या अंधार असलेल्या खोलीत तसेच पडून होते , रडत आसवे पुसत ..त्यांचे आसवे पुसण्यासाठी कोणीच नव्हते .हवा जोरात येत वाहत होती झाडावरची सुकलेली पण गळत  होती त्यांच्या खोली समोरील बगीचा  त्यांना दुरूनच दिसत होता  ,ती रात्र त्यांना  फारच भयाण वाटत होती ,आयुष्यतील चढ –उतार त्यांना दिसत होते ,मुलाने आपल्या जवळ यावे आपल्या सोबत दोन शब्द बोलावे प्रेमाने, अस त्यांना मनोमन वाटत होते .सकाळ झाली होती आजोबान घरातील नोकरांच्या भरोश्यावर सोडून त्यांची मुल सुना बाहेर गावी फिरायला गेली होती .इकडे आजोबा मुलाला डोळेभरून पाहण्याच्या वाटेवर होते ,आजोबा मुलाच्या य्र्ण्याची वाट पाहत होते .त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने भरत आली  होती.त्यांच्या कडे आयुष्यची थोडीच क्षण बाकी होती .त्या पाणावलेल्या डोळ्यांना ती वाट कोरडीच वाटत होती ,बाहेर गावी गेलेले त्यांचे शेजारी कुटुंब परतून घरी आले होते .त्यांना आजोबा कुठेच दिसत नव्हते ,त्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती पडली ते धावत पडत आजोबाकडे आले ,आजोबाना मात्र तो आपलाच मुलगा वाटला ते शेजारील व्यक्तीसोबत मुलगा समजून भरभरून बोलत होते ,त्यांचे प्रेमळ बोल एकूण शेजारी गहिवरून आले होते,त्यांना वडिलासारखा वाटणारा मायेचा आधार दूर जाणार होता पण नियतीने डाव साधताच आजोबांचे एकटेपणाचे जगणे कायमचे दूर झाले होत .जगाला नकोसे वाटणारे आजोबा आज मात्र नियतीला आपलेसे वाटले होते
      दोन शब्द प्रेमाचे एवढेच त्यांना हवे होते
      दुरावलेल्या मुलांसाठी नजरेत प्रेम होते
      क्षण निसटत होते दूरदूर असे
      पाहता पाहता त्यांचे श्वास मिटले होते
आजोबा गेल्याचे माहित पडताच सर्वच रडत धावत –पडत आले होते ,पण त्या रडण्याल्या काहीच अर्थ नव्हता .त्यांच्या रडण्याला पाहून मात्र शेजार्यांनी त्यांना चांगलाच जाब दिला मुलांना मात्र आत पश्चाताप झाला होता पण त्या पश्चातापाला काहीच अर्थ नव्हता .
                  म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पान  वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये? म्हातारपण म्हणजे भिजलेल्या  पापण्याचेच का असते ? हृदयात असंख्य दुखाचे आसवे का वाहतात ?शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुर्लक्षित  करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा ..............