सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

हुंदका ..............

हुंदका........................


शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होतीतिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला.

तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व... तिचे आई-बाबा आणि तिचा परिवारसुद्धा... दोघींचे अनोखे विश्व होते. सुमनचे बाबा ती दहा महिन्यांची होती तेव्हाच वारले होते. सुखवस्तू घरात तिचे लहानपण गेले होते. तिला कशाचीच कमी नव्हती. उणीव असायची ती केवळ तिच्या बाबाची. ती नेहमी तिच्या आईला विचारायची आई बाबा कसे दिसायचेते माझा खूप लाड करायचे कात्यांना माझी आठवण येत असेल काआई शाळेतील सर्वच मुली त्यांच्या बाबांसोबत येतात तेव्हा मला बाबाची खूपच आठवण येते गं... जेमतेम तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सुमनचे शब्द ऐकून मात्र तिची आई सुन्न व्हायची. ती सुमनला बाबाच्या आठवणी सांगायची. असे करता करता अनेक दिवस निघून गेले. सुमन पाचवीला शिकत होती. सुमन अभ्यासात फार हुशार होतीत्याचबरोबर ती आईला मदत करायची. तिची आई लहान मुलांना शिकवायची. त्यातून मिळणारे पैसे ती सुमनच्या शिक्षणाला लावायची. सुमन फार हळवी होती. कुणाचेही दुःख पाहून लवकरच ती भावूक व्हायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आवडीची होती सुमन. तिला निसर्गात स्वतःला विसरून बेभान व्हायला आवडायचंतर कधी ते बालमन तासनतास त्या वेड्या पाखरांचा लपंडाव पहायचे. ई... आई बघ की ते पाखरू किती उंच उडतंय... व्वा किती गं ही उंच भरारी... आई मलापण या पाखरासारखे उडावेसे वाटते. चल ना मला घेऊन कुठेतरी या जगाला विसरून या पाखरासारखं लपंडाव करायलाअसे ती आईला म्हणत होती. आई मात्र त्या कोवळ्या बालमनाचे ते निरागस प्रश्न ऐकत होती
"जाऊ रे माझ्या राजा"असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.

तिला सुमनचा एकही शब्द मोडवेना पण कालपर्यंत सुखात वाढलेल्या या पोरीला कधीतरी तिला नाही म्हणावं लागेल याचे आईला फार दुःख व्हायचे. आता तर आणखीच भलमोठं संकट येणार होतंअसा ती विचार करते न करते तर बाहेर पोस्टमन आला पत्र घेऊन. जसे पत्र हाती पडले तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती घाबरून नुसतं पाहण्याचे काम करायची. सुमन आलीतिला हलवलेआई आई म्हटले तेव्हा कुठेतरी तिला जाग आली. तिने सुमनला घट्ट पकडून आक्रोश केला. सुमा... माझ्या बाळाआता आपण कुठे जावेकुठे राहावे मला काहीच कळत नाही रे माझ्या राजा... आई सुमनला सांगत होती कारण सुमनचे बाबा गेले तेव्हापासून तिच्या काकाने त्यांना घरातून जायला भाग पाडले होते. पण खूप विनंत्या करून त्यांनी आजपर्यंत राहू दिले कारण त्या काकाने सर्व संपत्ती धोक्याने मिळवली होती. त्याला थोडाही तरस येत नव्हता सुमा आणि तिच्या आईवर... आता त्याने ते घर विकले होते. त्या घरमालकाला आता घर पाहिजे होते त्याकरिता काहीपण करून उद्या घर सोडून जाणे भागच होते. सुमनची आई खूप रडत होती... तिला काहीच कळेनाकाय करायचे ते... तिला सुमनच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझी लहान पोर घेऊन मी कुठे जाऊ... माहेरी अनाथ असलेल्या सुमनच्या आईला सुमनशिवाय कोणीच नव्हते. अगदी लहान वयात सुमनला काय करावं काही सुचेना.

आसवांच्या पुरात ती रात्र निघून गेली होती. सकाळ झाली... सुमन डोळे चोळत उठली... आई आई करून आईला हाक मारीत होती पण तिला आई मात्र कुठेच दिसत नव्हती. ती बागेत गेली जिथे तिची आई तिच्यासोबत खेळायची... तिथेही तिला आई कुठेही दिसत नव्हती. शेवटी ही आई गेली तरी कुठे... तिला काळजी वाटू लागली. ती शेवटी आईला शोधत स्वयंपाकगृहात गेली तर पाहते तर काय तिची आई झोपलेलीच होती. तिला पाहताच लहान सुमन धावतच गेली... आई आई म्हणाली. आई काही उठेना... सुमन रडत होती. त्या दिवशी तिचा काका तिच्या आईला घरातून काढून देण्याच्या आसुरी आनंदाने पाहायला आला होता. त्या घराचे मालक आणि तो गेटवर उभे होते. आता कुठे जातील ह्या मायलेकी हे पाहण्यासठी तो आला होता. तो सुमनच्या आई-बाबाचा पक्का वैरीच होता. धोक्याने त्याने त्याची संपत्ती मिळवली होतीपण सुमनच्या आईला मात्र आता काहीच संपत्तीचा लोभ नव्हतापण तिच्या काकाने सुमनच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं घर सोडून जाण्याचा आवाज असेल... त्याच आनंदासाठी तो पाहण्यासाठी ते इथे आले होते. इकडे सुमन आईला हलवून हलवून थकली. तिचा आवाज ऐकून शेजारील बाया आल्या. त्यांनी सुमनला जवळ घेतले आणि त्यांनी एकच आक्रोश केला तिला पकडून... बाळ सुमा... तुझी आई गेली... आपल्या सर्वांना सोडून... सुमाला काय करावं काही सुचेना. रडण्याचा आवाज ऐकून तो राक्षसी प्रवृत्तीचा काका आला. तो आला तर खरं पण हा सर्व क्षण पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होतीत्याच्यातील माणूस जागा झाला होता. सुमाच्या आसवांनी त्याला माणूस केले होते. त्याला हा आयुष्याचा विध्वंस पहावला नाही. तो लहान सुमनजवळ आला. त्याच्या आईचे पाय पकडून माफी मागत होता. त्याच्या बदल्याच्या वृत्तीमुळेच आज हा दिवस आला होता. बाळा... मला माफ करमी तुझी माफी मागतो. मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या आयुष्याचा गुन्हेगार आहेमी तुझ्या आईची माफी मागण्याच्या लायक नाही. बाळा पण आजपासून तूच माझं आयुष्य आणि तूच माझी खरी संपत्ती... असे म्हणून त्या दिवसापासून निरागस सुमाचे हसणे बोलणे गेले. होता केवळ हुंदका... जो फक्त ती जिवंत आहे याचा भास करून जायचा.

आई गेल्यावर तिच्या काकाचा प्राण आणि सर्वस्व होती सुमन... पण तिच्यातील जीव आईसोबत गेला होता. आज ती मुलींना पाहते तेव्हा तिच्याजवळ असतो तो केवळ हुंदका आणि हुंदका आणि फक्त हुंदका... 
                                           अॅड विशाखा समाधान बोरकर 
                                         
                          
                         
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा