शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

पुन्हा निर्भया.....


आज पुन्हा मेणबत्त्या जाळल्या जातील
झोपलेली माणसे जागे होतील
हाहा कार होईल पुन्हा तिच्यासाठी
पुन्हा हा आवाज शांत होईल
का होत असे की नकोच तिला रात्री फिरण्याचा अधिकार
कोण कुठे कसे मुखवटे घालून असेल काय तिला कल्पना
आणखी किती निर्भया होतील
कोपर्डी असो की दिल्ली
ती कुठेच सुरक्षित नाही
त्या निष्पाप जीवाचा जीव जातो
आयुष्य तिचे तिथेच थांबते
या विचाराने सर्वच मने पेटून उठतात
त्या नराधमाला फाशी द्या म्हटले जाते
न्यायालयाचे दार ठोकले मात्र जाते
 आसवे पुसत हे सर्व पाहत असते
प्रश्न तिचा तोच असतो थांबवा हा खेळ आमुचा
आणि मुळासकट करा नायनाट ह्या प्रश्नाचा
मी एकटीच नव्हे तर कितीतरी जीव जात आहेत आणि जातील
त्या जाणाऱ्या जीवाला सुरक्षित करा
बंद करा ह्या नेहमीच्या मेणबत्त्या जाळणे
काय होईल तसे करून काय त्या पुन्हा परत येतील
करा रक्षण त्या मुलीचे  ज्या या असुरक्षित जगात जगतात
वेळ येताच धावून जा स्वतःची बहीण समजून
तेव्हाच ह्या घटना बंद होतील
अन्यथा हे सत्र तर चालूच राहील पुन्हा एकदा  प्रियांका ,
कोपर्डी ,निर्भयाच्या नावाने......
                                      अॅड विशाखा समाधान बोरकर




       




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा