गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

हीच खरी महामानवाला श्रद्धांजली

                                                 हीच खरी महामानवाला श्रद्धांजली
                                                  तू कोटी दिनांचा उद्धारक झाला
                                                        तूच दिले आम्हा अस्तित्व
                                                      तूच लढण्याची मशाल झाला
६ डिसेंबर १९५६ साली या दिनी  दिन दलितांचा प्राण हरवला होता ,तो दुखाचा सागर आजही तसाच दरवर्षी येतो चैत्यभूमीवर  आपल्या भिमाबाच्या भेटीसाठी ,ती उफाडणारी सागराची लाट हि पाहून थक्क होतो तो भीम  अनुयायांच्या तुफानी  लाटेला पाहून, .इथे येणारा प्रत्येक अनुयायी  बाबासाहेबांना भिमांजली दयायला येतो .अन सोबत  घेऊन जातो बाबासाहेबांच्या विचारांचे वादळ .आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन ६३ वर्षे झाली. पण आजही ते   विचारानी जिवंत आहेत  . त्यांचे विचार जगाला खूप प्रेरणा देत. भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या शतकातील एक अद्वितीय महामानव प्रकांडपंडित ,बंडखोर समाज क्रांतिकारक, विधिज्ञ ,समाजाचे मर्मज्ञ, हाडाचे पत्रकार, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू ते अनेक तेजस्वी अनमोल पैलूंचे  एक देदीप्यमान कोहिनूर होते. त्यांनी आपल्या सूर्य रुपी तेजस्वी ज्ञानाचा व प्रतिभेचा उपयोग तळागाळातील  समाजाच्या मुक्तीसाठी केला. शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा, अशी त्रिसूत्री देणाऱ्या बाबासाहेबांचे जीवन चरित्र वाचता असे निदर्शनास येते की या त्रिसूत्रीनेच या महामानवाचे संपूर्ण जीवन व्यापलेले आहे हे ते सूत्र म्हणजे युगपुरुषांच्या जीवनाचे खरे सार आहे. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की "गरज ही शोधाची जननी आहे" याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण ही काळाची गरज आहे असे ठासून सांगितले होते. म्हणून अनुभवावर आधारलेले ही शिकवण  युगायुगापासुन आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित असलेल्या व पशुहून हिन दीन असे लाचारीचे जीवन जगणाऱ्या पददलित बांधवांना या त्रिसूत्री शिकवणीची संजीवनी पाजून सन्मानित असे नवजीवन देण्याचे मौल्यवान कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेब शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणायचे, याच सूत्रावर त्यांचा जीवनाचा रथ चालला. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असे ते म्हणायचे. या अन्यायाला लढण्यासाठी पददलितांना शिका संघटित करून  न्यायासाठी त्यांनी रणशिंगे फुंकून संघर्ष केला. तमाम पशुहून हिन जगणाऱ्या   माणसांना माणसात आणले ,त्यांचे हक्क मिळवून दिले ,दुःख जन्मते अज्ञानापोटी, ज्ञान दुःख  मुक्तीसाठी  यावर निष्ठा असणारे डॉ. आंबेडकर आपल्या जीवनात अज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व देणारे होते. म्हणून ते सतत विध्यार्जनात मग्न राहिले .आपल्या लौकिक बुद्धिमत्तेवर यां ज्ञानपिपासू विद्वानाने परदेशी जाऊन अनेक पदव्या संपादन केल्या . तत्कालीन समाज व्यवस्थेचा विचार करता बाबासाहेबांनी अति प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी किती कठोर संघर्ष केला अशी कल्पना आहे चरित्र वाचले  की येते . सर्व पद्धती समाजाला जागृत करून  सुसंघटित करून करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत, जनता ,प्रबुद्ध भारत यासारखे पक्षिके ते सुरू केली .बाबासाहेबांनी सुरू केलेली चळवळ म्हणजे अवकाशाला गवसणी घेण्यासारखे होते. युगा युगा पासून अंधारलेल्या या जगामध्ये सूर्य होऊन पददलितांचे जीवन प्रकाशनारे बाबासाहेब  ज्ञानवंत ज्ञानपिपासू होते. त्यांच्या सारखे व्यक्तिमत्व क्षितिजावर ही आढळणार नाही.
 त्यांच्या संदर्भात जे जे वाचावे ऐकावे ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यापकता     कर्तुत्वाची विशाल बुद्धीची भव्यता अधिकाधिक गहन होऊन होऊन आपली मती गुंग होते. त्यांनी लढलेल्या सामाजिक सत्याग्रह चळवळ रक्ताचा थेंबही न सांडवता केवळ एका लेखणीच्या बळावर लढल्या.स्त्रीयाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा होता  डॉ.बाबासाहेबांना स्त्रियांविषयी खुप आपुलकी होती आणि त्यांच्या परिस्थितीविषयी जाण होती.म्हणुन ते म्हणतात की ‘I Measure the progress of the community by the degree of progress which woman have achieved'(मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रीयांच्या झालेल्या प्रगतीवरुन मोजतो.)इतका आधुनिक  वैश्विक विचारवंत स्त्रियांविषयी पुर्ण जगात नाही.म्हणुन बराक ओबामा म्हणतात की “डॉ.आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्य संबोधले असते.” त्यांच्यामते घराच्या विकासावरून गावाचा तर पुढे देशाचा विकास होतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष केवळ दलितांसाठी नव्हता तर संपूर्ण भारतातील समाजाच्या शुद्धीकरणासाठी होता .
बाबासाहेब आंबेडकर एकावेळी सनातन वाद्यांच्या  विरुद्ध   तसेच आपल्या समाजात परंपरेने चालत आलेल्या दोषांवर बोट ठेवून तो दोष  दूर  करताना स्व जातींशी संघर्ष करीत होते. कारण त्यांच्या मनात फार राष्ट्रभक्ती आणि मानवतेवर श्रद्धा होती. राष्ट्रापेक्षा धर्म श्रेष्ठ भासवून राजकीय स्वार्थ  साधने त्यांना शक्य होते, परंतु आंबेडकरांना हवा होता खरा खुरा मानवतावाद आणि मानवतेवर आधारलेल्या राष्ट्रवाद म्हणजे राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीआधी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांना लाख मोलाची वाटे
त्यांना संपूर्ण भारत समाजव्यवस्थेची पुनर्रचना हवी होती .म्हणून त्यांना चळवळीतील  विषमता दारिद्र्य आणि अनिती यांचा नकाराचा प्रयत्न होता .जोपर्यंत विषमताधिष्ठित समाज परिवर्तन होत नाही तोपर्यंत खऱ्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही असा व्यापक विचार त्यांच्या ठायी होता. त्यांचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारक नसून संपूर्ण भारत देशाचे उद्धारक  होते.  माणूस लोकशाहीसाठी झाला पाहिजे म्हणून त्यांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर समाजाचा पाया रचला त्यांनी संविधान लिहून  देशाला बळकट लोकशाहीप्रधान केली.
 आज संविधान आपल्या राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे . इतिहासाच्या पानावर अक्षरश हजारोंनी गर्दी केली आहे.पण गर्दीत एक नाव सुर्यासारखं ‘स्वयंप्रकाशित’ होउन सर्वांना जगण्याचा प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे वैश्विक ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय’.डॉ.बाबासाहेब आज विश्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणा बनले आहेत आज बाबासाहेबांच्या  विचारांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची  गरज आहे.आजच्या विविध मार्गाने भरकटलेल्या युवकांनी तर आधी बाबासाहेबाना वाचावे .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहीजे आहे,त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहीजे आहे,भारतातले लोक त्यांना विञानवादी पाहीजे आहेत,भारतामध्ये समता स्वातंत्र्य,बंधुत्व,आणि सामाजिक न्याय त्यांना पाहीजे आहे,स्त्रियांचा संन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे,त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मताह: समान आहेत ,देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती “लोकांनी चालवण्यापेंक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे”  असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे.

डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच ” लोकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जिवनात क्रांतिकारक बदल घडवुन आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय” अशी आहे.म्हणजे लोकांच्या पुर्णत जिवनात परिवर्तनकारी बदल घडणे हेच बाबासाहेबांच्या लोकशाहीचे ध्येय आहे .आणि आपण ते पुर्ण करायला हवे.आणि डॉ.बाबासाहेब असेही म्हणतात की “एखादा माणुस कितीही मोठा असला तर त्याच्या चरणी आपण आपले व्यक्तीस्वातंत्र्याची सुमणे उधडु नये.!”आणि पुढे ते असेही म्हणतात की ” स्वाभिमानाचा बळी देउन कोणताही माणुस कृतञता व्यक्त करु शकत नाही,शीलाचा बळी देउन कोणतीही स्त्री कृतञ राहु शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देउन  कोणतेही राष्ट्र कृतञता व्यक्त करु शकत नाही..” हा जो भयसुचक संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो वेळोवेळी आपणा सर्वांना दिशादर्शक आहे.याचा आपण सदोदित विचार करायला हवा आणि त्यांनी असेही म्हटवे आहे की ” आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा बिंदु असेपर्यत आपण आपल्या मायभुमिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे”.
खरी देशभक्ती राष्ट्रीयत्व काय? “एखाद्या भारतीय व्यक्तीला परदेशात काही झाल्यास ‘संपुर्ण देश’ पेटुन उठला पाहीजे फक्त त्याच्या धर्माचे किंवा जातीचे नव्हे..!”हेच खर्या एका राष्ट्राचे लक्षण आहे.त्यातच त्याचे रक्षण आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मताधिकाराचा(मतदान नव्हे!)वापर विचारपुर्वक करायला हवा.मतदान या शब्दात ‘दान’ असल्यामुळे आणि दान दिल्यावर काही संबध राहत नाही तसच राजकीय नेत्यांना वाटते की दान केलं म्हणजे संपलं आणि त्याच्या मतासाठी लोक पैशेही स्विकारतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी अतिशय विचारपुर्वक संदेश दिला आहे.” तुमच्या मताची किंमत तुम्ही मिठ मिरची इतकी कमी समजु नका.ज्यादिवशी त्यातील सामार्थ तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेउ पाहणार्या व्यक्तीइतके कंगाल कोणी नसेल..!”हे खरोखरच खरं आहे.एका मतामध्ये इतकी शक्ती आहे की सत्तेला ती नियंत्रित करु शकते.म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर करणे गरजेचे आहे आणि मताधिकार(Right of vote)हा केवळ डॉ.बाबासाहेबांमुळेच प्रत्येक भारतीयला मिळाला आहे.कित्येक देशामध्ये स्त्रियांना,गरीबांना,खालच्या जातीच्या लोकांना मताधिकार नव्हते आणि भारतासारख्या देशामध्ये डॉ.बाबासाहेबांनी ते इतक्या लवकर भारतीय संविधानाच्या माध्यमातुन दिले आहेत याविषयी प्रत्येक भारतीयांने बाबासाहेबांशी नेहमी कृतञ राहीले पाहीजे.

जातीवाद,दलितांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसत आहे.एखाद्या व्यक्तीला  खालच्या जातीचा आहे म्हणुन असे अमानवी कृत्य करणे लाछनास्पद आहे.उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो किंवा आणखी कोणते राज्य असो असे अन्याय अत्याचार रोज होत असतात पण ते माहीती होतातच असे नाही.डॉ.बाबासाहेबांनी म्हणुन सांगितले आहे की Castes are anti national (जाती या देशविघातक आहेत)म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी annihilation of caste लिहुन जागाचे लक्ष वेधले.आणि जाती निर्मुलन करण्यासाठीच आणि माणसाला माणुस बनण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला.आणि डॉ.बाबासाहेबांना विञानवादी धम्म पाहीजे होता.बुद्ध म्हणतात की “मी सांगतो आहे म्हणुन माझा धम्म स्विकारु नका तसेच कोणतीही गोष्ट एखादी मोठी व्यक्ती सांगत आहे किंवा ज्येष्ठ व्यक्ती सांगत आहे समाजात दिली मान आहे ती सांगत आहे म्हणुन ती गोष्ट स्विकारु नका तर ते बुद्धिच्या कसोटीवर घासुन बघा.ती तुम्हाला बुद्धिसंगत न्यायसंगत वाटत असली तरच स्विकारा अन्यथा सोडुन द्या.स्वतच्या धम्माविषयी जगात बुद्धाशिवाय कोणीही इतके विचारस्वातंत्र्य दिले नाही..!असाच विञानवाद डॉ.बाबासाहेबांना भारतीय लोकांमध्ये पाहीजे आहे .

आज चित्र पाहीले तर देशाचे दोन भाग दिसतात.एक भारत आणि दुसरा इंडिया..!भारत हा खेडेगावाला म्हणतात आणि इंडीया हे शहरी भागाला म्हणतात.आजही खेळेगावात अप्रगत आणि फक्त शहराचा विकास होत आहे.ही विषमता आपल्याला नष्ट करावी लागेल.शहराबरोबरच आपल्याला गावांचाही विकास करावा लागेल.”स्मार्ट सिटी” बरोबरच “स्मार्ट व्हीलेजही” व्हायला हवे.शेती आणि शेतकर्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकित केले होते ते आजही लागु पडते किंबहुना त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे.डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की “भारतीय शेती ही आजारी पडली आहे.शेतीसाठी शासनीने पुढाकार घ्यायला हवा.शेतकर्याने शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देउन उद्योगधंदा सुरु करायला सांगायला पाहीजे,नोकरी करायला पाहीजे आणि फक्त एकालाच शेतीत ठेवले पाहीजे.आणि  सर्वात महत्वाचं शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहीजे.त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव द्यायला हवा.नाहीतर एक दिवस असा येइल की शेतकर्याला आत्महत्या करावे लागेल… आणि जे आज मोठ्या प्रमाणात होत आहे
डॉ.बाबासाहेबांनी केलेलं भाकीत आज खरं होत आहे.शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे.यासाठी तमाम शेतकर्यांनी आणि सरकारने डॉ.बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत त्याचा अंगिकार करणे ही काळाची गरज झाली आहे.आजची इ विकृत परिस्थिती बदलणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे आणि मग हीच खरी महामानवाला श्रद्धांजली ठरेल .

                                                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                                                            रा पातुर जी अकोला

३ टिप्पण्या: