शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

वर्ष नवे ध्यास नवा.................



नवीन वर्ष आले की पुन्हा चालू होते सर्वांची एकच गरबड नव्या उत्साहाने...  नवीन संकल्प आखले जातात, नवीन ध्येय ठरवले जातात जणू नव्या  जीवनाचा प्रवास सुरु होतो सगळेच काही या नव्या वर्षाला धरून खूप सकारात्मक असतात कोणी कुठे  जाण्याचे ठरवतो  तर  कोणी काही खरेदी करते
 नवीन वस्तू खरेदी केल्या जातात एकमेकांना भेट दिल्या जातात. नवीन वर्ष म्हटलं की नवे पर्वच, जणू ते आनंदाचे गाठोडे घेऊन येतो सर्वांसाठी. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक नवीन उत्साहात दिसत असतो. घर असो शाळा-कॉलेज असो सगळीकडे एकच लगबग चालू असते, नवीन सजावट करण्यात शाळकरी मुलांपासून ते थोरल्या मोठ्यांपर्यंत सर्वच गुंतलेले असतात  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. खरंतर नवीन वर्ष म्हणजे मनाला असणारा आनंद हा वाजवीच आहे कारण मानवी स्वभाव हा प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला घेऊन त्या क्षणाचा उत्साह साजरा करणार असतो मग यात नवीन वर्ष आले की नवीन संकल्प आलाच कारण हाच दिवस असतो वर्षाच्या पहिल्या दिवसापासून त्या वर्षाच्या शेवटपर्यंत कुठून तरी आपण एक ध्यास मनी बाळगून त्या दिशेने  जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांचा मार्ग वेगळा असतो हा उत्साह साजरा करण्याचा....तर काहींचा केवळ व्यर्थ पैसा खर्च करून मित्र मंडळीला पार्टी देऊन यातच आपण. खरच नवीन वर्ष खूप आनंदात साजरे केले याचे समाधान असते.वर्षाचा पहिला दिवस काही अंधश्रद्धेतून पाहणारी माणसे ही दिसतात .कारण वर्षाचा पहिला दिवस आनंदात गेला की पूर्ण वर्ष चांगले जाते अशी पण कल्पना करून जगणारे माणसे आहेत.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी    तर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून लाखो रुपये खर्च केले जातात आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पण पैश्याची उधळपट्टी होताना दिसते. नवीन वर्ष मात्र ज्यांच्याकडे  पैशाची श्रीमंती आहे  जिथे पैसा पाण्यासारखा वाहिला  जाऊ शकतो त्यांच्यासाठी असते .पण एक वर्ग असाही असतो ज्यांना नवीन वर्ष आणि गेलेल्या वर्ष यात काही फरक वाटत नाही कारण नवीन वर्षाला सुद्धा त्यांना दिवसभर पोटातील भुकेच्या  आगीसाठी   सांजेची भाकर शोधण्यातच वेळ निघून जाते तर त्या नवीन वर्षाला साजरा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याच्या आयुष्यातील रोजच्याप्रमाणे तो ही दिवस दोन घास भाकरीसाठी दारोदारी फिरण्यात निघून जातो.एकीकडे नवीन वर्ष साजरे होत असतांना लाखो रुपयांची नासाडी होते त्याच वेळी हॉटेलच्या बाहेर उरलेल्या अन्नासाठी वाट पाहणारी गरीब मुले ,म्हातारी माणसे तर कधी शरीराने अपंग झालेली लोक ते श्रीमंताची पार्टी होण्याची वाट पाहत असतात.पण काही लोकांना त्याच्या हॉटेल समोर रोषणाई केलेली इतकी महागडी फुलांनी दिव्यांनी सजवत केलेली तिथे अश्या अंगावर मळलेले घाण कापले ,सोकलेले भुकेने चेहरे अशी माणसे त्याच्या सजावटीच्या आड येतात म्हणून त्यांना तिथून हाकलून दिल्या जाते .पण आपला हा आनंद साजरा करीत असताना थोडा वेळ काढून यांना जर दिला तर खरे नवीन  वर्षाचे स्वागत ठरते .  म्हणून तुम्हाला खरचं नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर या गरीब लोकांची भाकर म्हणून त्याच्या जवळ जाउन  थोड प्रेम द्या त्या लोकांना जे आईवडिलांच्या प्रेमापासून दुरावलेले असतात.या नवीन वर्षाला त्या सोकलेल्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांना थोड हसवून पाहा .नवीन वर्ष साजरे करण्यासाठी महागड्या वस्तू भेट देणे ,पैसा उडवणे हे आवश्यकच नसत ,या नवीन वर्षाचे स्वागत अगदी मनपासून करावे साधेपणाने सगळ्यांना सहभागी करून ,इतरांच्या चेहऱ्यावर आन्दाच्या हास्य लहरी देऊन साजरे केलेले नूतन वर्ष हि सदैव स्मरणात राहते ,अश्या छोटय छोट्या गोस्टीतून मनाला मिळणारा आनंद कधीच न मावळणारा असतो .नूतन वर्षाला कोणी खूप पुस्तके वाचण्याचा संकल्प करते ,तर कोणी लिहिण्याचा संकल्प करते ,कोणी नियमित व्यायम करण्याचा संकल्प करते ,आपल्याला सोयीस्कर वाटेल असे मनात संकल्प केले जातात . पण जसे जसे नवीन वर्षातील दिवस मागे पडू लागतात तसे तसे आप्प्ले संकल्प कमजोर पडत जातात .आणि पुन्हा आपला रोजचाच दिनक्रम चालू होतो .अलीकडे मोबाईलचा वापर फार वाढला माणूस एका घरात असून पण माणसापासून दूर गेला ,आपल्या माणसासाठी आपल्याकडे वेळ नाही ,एकीकडे जग जवळ आले म्हणतात .पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माणूस हि दूर गेला माणसापासून . निसर्गाच्या रम्य वातावरणात तो रमायला विसरला नोकरी ,व्यवसाय आणि घर यात दिवसेंदिवस गुंग झालेला  माणूस मात्र खरे जीवन विसरून आभासी जगणे स्वीकारू लागला .आयुष्यात सदैव चेहऱ्यावर ताण –तणाव घेऊन जगणाऱ्या माणसाचे वर्षाचे सुखाचे गेलेले दिवस पुन्हा आयुष्याचे ओझ होऊन जातात .   पण यावेळेस आयुष्यातून आनंद पुन्हा मिळवण्यासाठी या नूतन वर्षी असा संकल्प करूया  असा संकल्प थोडं जगूया स्वतासाठी या रम्य    निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला थोड विसरून पाहा.. फुलांचे रंग होऊन जगुण पहा ....नव वर्ष म्हणजे केवळ पैश्याची उधळपट्टी नसून नवीन संकल्प असतो नव्या स्वप्नांचा ...नवीन आयुष्यात केलेला ध्यास असतो नवी जगण्याचा...या दिवशी करून पहावे थोड जगावेगळं काही तरी,अस की ज्याचे कौतुक सर्वांनी केले पाहिजे .ज्यामुळे कोणाला तरी फायदा झाला पाहिजे.आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो.पण मनाला भावणारा नवे पण देणारा नव्या नव्या उत्सवाचा, नव्या पर्वाचा, नव्या ध्येयाचा, नव्या प्रेरणेचा, नव्या कौतुकाचा, स्वप्नांचा आकांक्षांचा, नव्या कोवळ्या भावनांचा, म्हणजेच खर्या आयुष्याचा अश्या  नवीन वर्षाचा दिवस या दिवसाच्या निमित्ताने फुलू द्यावे  हृदयात  अनेक स्वप्न उमलू द्या कळ्यांना स्वप्नांच्या दिशेने  ..... मनामध्ये  करूया ध्यास माणूस म्हणून जगण्याचा  अंकुरुया करुणा मानवते कडे नेणारी . नव्या वर्षी केलेला  संकल्प हा केवळ एका दिवसातच नसावा क्षणाक्षणाला अंतर्मनाला प्रेरणा देवून उत्साह निर्माण करणारा असावा..तेव्हा चला करूया ध्यास नवा या नूतन वर्षाच्या निमित्ताने ...............................
                                                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                                                     रा .पातुर जि .अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा