शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या



कधी तरी बाबाच्या मनाच्या कोपर्यात जाऊन पहा
त्या थककलेल्या चेहर्यावर प्रश्न दिसतील दहा
त्या थकलेल्या चेहर्याचे उत्तर तुम्ही शोधून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते वरुन वरुन दिसणारे रागीट बाबा
रागीट नसतात मुळीच!
ते शिकवत असतात जीवनाचे अनुभव
त्यांचे वात्सल्य म्हणजे अमृताची गोळीच!
ती गोळी वात्सल्याची कधी तरी चाखून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

पटकन रागावणारे बाबा दिसतात हो सर्वांना
कधी पाहिले का कोणी बाबांना रडतांना
त्यांच्या ओरडल्यावर कधी तरी हसुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

त्या घरात कोण त्यांना समजत बरं
ज्याला त्याला आपलाच वाटत खरं
ते अनुभवाचे पुस्तक कधी तरी वाचुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते सावली प्रेमाची,किती गार गार वारा
त्या चेहर्यावर एकांती असती आसवांच्या धारा
एकांती रडणार्या मनाला,आयुष्याचा धीर दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

कधी तरी ते उदास मन घेतले का जाणून
कधी तरी पहावं त्यांच्यासाठी जगुन
हळूच कवटाळून त्यांना कुशित तुमच्या रडू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते न रडणारे मन रडून जाईल
आयुष्यभरच्या वेदनेवर शब्दांची फुंकर होईल
ती शब्दांची फुंकर कधी तरी मारुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

ते असतात तोवर असते घराचे घरपण
त्यांच्या नसण्याने हरवते हिरवे बालपण
त्या हिरव्या सावलीत मुक्तपणे खेळुन घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


बाबा कळणे तसही नाही हो सोप!
आपल्या भाकरीसाठी त्या डोळ्याला न झोप!
उचलुन थोडं भार त्या डोळ्यांना झोप दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

आपल्या शब्दांचा नका करू किधीही प्रहार
थकलेल्या काळजावर असतो चिंतेचा भार
त्या चिंतेच्या भाराला कधितरी उतरवून दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


थकले म्हणून काय झालं,लाज कसली त्यांची
लहानपणी ही बापमाऊली प्रेमाने घास भरवयाची
असेल जरी थकेल अभिमानाने त्यांची ओळख दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


मित्राच्या बाबाच्या कारीची का रे तुम्हा ओढ
पायी वहाण नसलेला बाप नाकारतात पोरं
त्या अनवाणी पायाची लाहिलाही कधी पाहून घ्या
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या


त्या अनवाणी पायाने तुला वहाण दिली
त्या उपकाराची ना कोणी किंमत केली
आयुष्य वेचनार्या बाबांला थोड आनंदच हसू दया
न कळलेले बाबा कधी तरी जाणून घ्या

1 टिप्पणी:

  1. अप्रतिम काव्य रचना
    आई असते प्रेमाचा अथांग सागर. बाबा असतात वटवृक्षाची सावली मग मुलांना का नाही कळत आई बाबा च्या कष्टाची किंमत. आपल्या देशात वृद्ध आश्रमाची गरज का? निर्माण झाली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. कारण माणसात माणूस की होती. कुटूंबातील वयोवृद्ध व्यक्ती ची
    विशेष काळजी घेतली जायची. पण आता वयोवृद्ध व्यक्ती ना सन्मान पूर्वक वागणूक कुटूंबातील या व्यक्ती ना दिली जाते का?

    उत्तर द्याहटवा