शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०
आयुष्याला आणखी काय मागणे...?
आयुष्यात आणखी काय मागणे असायला हवे... आपण सदैव हे ना ते मागतच राहत असतो. आयुष्याकडे मिळालेल्या संधी सारखे बघितले तर प्रत्येक संधीचं सोनं करण्याच काम हे आपलं असतं. मनात असलेला मीपणा जर सोडला आणि सगळं आपले म्हणून चाललं तर सगळं जग आपलं असतं; पण काही लोकांना मीपणा म्हणून जगण्याची सवय असते आणि त्यामुळे नाती, माणसे सगळे जण दुरावतात आणि अशी माणसे एकाएकी एकटीच पडतात. नदी सगळं काही आपल्या पोटात घेऊन निरामय झुळझुळ संथ तिच्या मार्गाने धावत वाहत राहते. सूर्य दररोज त्याच्यात वेळेवर उगवतो आणि त्याच्याच वेळेवर मावळतो.निसर्गातील प्रत्येक घटक त्याचे काम अगदी वेळोवेळी कुठलाही कंटाळा न करता पार पाडते.आपणही हा बोध, हेच तत्व, आपल्या मानवी आयुष्यामध्ये स्वीकारून आपल्या आयुष्याला योग्य ते वळण देऊन शकतो. उगाच कुणाचा हेवा तरी कश्याला...?केवळ आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची तक्रार करत बसण्यापेक्षा आहेत या गोष्टींमधून आपण काय चांगले करू शकतो याची धडपड कधीही केलेली चांगली! दोन हात, दोन पाय, सगळं काही व्यवस्थित असताना पण आपण काही नसल्याची उणीव व्यक्त करीत असाल तर ती सगळ्यात मोठी चुक आहे. कारण जगामध्ये असे लोक आहे त्यांच्याकडे या गोष्टी नसतानाही त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी होतात. हातपाय नसणारे एव्हरेस्ट सर करतात.मग आपण हातपाय असणाऱ्याने नुसतं हातावर हात ठेवून बसण्यात काय अर्थ! "We can do everything",हे वाक्य सदैव मनात ठेवून आयुष्याला जिंकलं पाहिजे. तेव्हा आयुष्य रुपी या अनमोल मोत्याला हळूच ओंजळीत जपून सगळ्यांना आनंदाने सोबत घेऊन जगण्याचा प्रयत्न करुया! आपल्या जगण्यातून,वागण्यातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट घडत असते याचा विसर कधीही होता कामा नये!आयुष्यामध्ये देणाऱ्याची भूमिका पार पाडावी त्यामुळे आपल्या आयुष्याला खरा अर्थ उरतो.शेवटी आयुष्यातील कोणत्याही प्रश्नांमध्ये गुंतल्यापेक्षा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करावा. जेव्हा विचार कराल तेव्हा प्रश्न पडतील, आणि जेव्हा प्रश्न पडतील तेव्हा उत्तरासाठी आपण स्वतःहून धडपड कराल, आणि जेव्हा स्वतःहून धडपड करीत असतो तेव्हा उत्तरेही लवकर भेटतात आणि त्याचे समाधान ही मात्र फार वेगळे असते. जेव्हा प्रश्नांची उत्तरे मिळतात तेव्हा आयुष्यातला खरा आनंद मिळतो.आपण नेहमी आयुष्याची तक्रार करत काही ना काही मागत राहतो आयुष्याला ,तेव्हा आपण आयुष्याचे रसिक कमी आणि भिकारी जास्त होऊ जातो. तेव्हा रसिकाची भूमिका घेऊन आयुष्य चांगल्या रीतीने जगूया,कारण येणारी प्रत्येक समस्या, प्रश्न ही माणसासाठी असतात माणूस सगळ्यासाठी नसतो. पण माणुस हेच सगळं विसरून समस्येला आयुष्य समजून जातो हे सुद्धा तितकेच खरं! या विळख्यातून बाहेर पडून पहा,तुम्हाला कळेल या जगाला पण तुमची गरज आहे.स्व:ताला कमी न लेखत आहे त्यात समाधान मानुन जगणे कधीही बरे!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
तुझ्या क्रूरतेचा कळसच मानवा इतका चढतो आहे जीव घेऊनी कोणाचा तो महल बांधतो आहे तुझ्या हृदयातील सांग गेली कुठे ती मानव...
-
स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा ...
-
पाहता ते घाव हाताचे काळी माती रडू लागली ओरबडलेल्या काट्याने रक्ताने ती नाहुण गेली त्या अनवाणी पायाला ती वहाण मायेची झाली बळीराजा तो लेक तिच...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
-
हे सागरा तुझ्यातही सामावणार नाही एवढा मोठा दुःखाचा सागर माझ्या मनात आहे ! कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा ...
खूपच छान, सकारात्मक आणि वास्तव आहे ...
उत्तर द्याहटवा"मी पणा", "देणाऱ्याची भूमिका" "we can do everything
" सर्वच विचार परिपक्व आहेत... "
हे विचार अनुभवातून येईपर्यंत आयुष्य संपून जाते ....
वाचन व चिंतन यातून लवकर येते हे तू दाखवून दिलं ...
All the best .. 😜