शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
तेच खरं आयुष्याचं नाव असतं
ब्रँडेड ज्वेलरी, ब्रँडेड कपडे
म्हणजेच आयुष्य नसतं
त्या झोपडीतील भाकरीत
सुख लपलेलं असतं
नको भडिमार त्या सुखाचा
नको तो कागदाचा पैसा
दु:ख वाटून घेण्यासाठी कोणी
जवळ असावं लागत असतं
ती उडणारी पाखरे ,अंगणातील फुले
क्षितिजापल्याडच त्यांच जगणे असत
नाही ती स्पर्धा कुठल्या लोभाची
नव्या उमेदीचे पंखात बळ असतं
आपणच माणसे बिघडलोय सारी
म्रुगजळाच्या मागे आपलं धावण असतं
वैभवाचे वारे आणि प्रशस्त बंगला
यातच आमचं सुख लपलेलं असतं
सुखाच्या व्याख्येने आभासी जग व्यापलं
पाषाणाचे हृदय म्हणजे ह्रदय नसतं
प्रत्येकाच्या सुखाचा विचार मनी यावा
तेच खरं आयुष्याचं नाव असतं
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
आयुष्य जीवनातील प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवत राहत ,ते किती हि चांगल्या प्रकारे जगले तरी प्रत्येक वेळी आनंद मिळत नसतो , कधी - कध...
-
सध्या परिस्थिती मध्ये दिशा भटकलेला युवा पिढीला मार्ग दाखवणारा लघुचित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या लिखाणाने सर्वांच्या हृदयावर राज्...
-
द्यायचेच कोणाला तर थोडं स्मित देऊन जा उपाशी पोटाला दोन गोड घास घेऊन जा जगणे इथे, मरणे इथे हा खेळ नाही नवा! तुझ्या असण्या...
-
बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला येणार का? माझ्या चांगल्या गुणांवर पुन्हा शाबासकी मला देणार का? रुसलेच मी कधी तर लाडोबा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा