Adv Vishakha Samadhan borkar

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

वर्ष नवे ध्यास नवा.................



नवीन वर्ष आले की पुन्हा चालू होते सर्वांची एकच गरबड नव्या उत्साहाने...  नवीन संकल्प आखले जातात, नवीन ध्येय ठरवले जातात जणू नव्या  जीवनाचा प्रवास सुरु होतो सगळेच काही या नव्या वर्षाला धरून खूप सकारात्मक असतात कोणी कुठे  जाण्याचे ठरवतो  तर  कोणी काही खरेदी करते
 नवीन वस्तू खरेदी केल्या जातात एकमेकांना भेट दिल्या जातात. नवीन वर्ष म्हटलं की नवे पर्वच, जणू ते आनंदाचे गाठोडे घेऊन येतो सर्वांसाठी. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक नवीन उत्साहात दिसत असतो. घर असो शाळा-कॉलेज असो सगळीकडे एकच लगबग चालू असते, नवीन सजावट करण्यात शाळकरी मुलांपासून ते थोरल्या मोठ्यांपर्यंत सर्वच गुंतलेले असतात  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. खरंतर नवीन वर्ष म्हणजे मनाला असणारा आनंद हा वाजवीच आहे कारण मानवी स्वभाव हा प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला घेऊन त्या क्षणाचा उत्साह साजरा करणार असतो मग यात नवीन वर्ष आले की नवीन संकल्प आलाच कारण हाच दिवस असतो वर्षाच्या पहिल्या दिवसापासून त्या वर्षाच्या शेवटपर्यंत कुठून तरी आपण एक ध्यास मनी बाळगून त्या दिशेने  जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांचा मार्ग वेगळा असतो हा उत्साह साजरा करण्याचा....तर काहींचा केवळ व्यर्थ पैसा खर्च करून मित्र मंडळीला पार्टी देऊन यातच आपण. खरच नवीन वर्ष खूप आनंदात साजरे केले याचे समाधान असते.वर्षाचा पहिला दिवस काही अंधश्रद्धेतून पाहणारी माणसे ही दिसतात .कारण वर्षाचा पहिला दिवस आनंदात गेला की पूर्ण वर्ष चांगले जाते अशी पण कल्पना करून जगणारे माणसे आहेत.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी    तर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून लाखो रुपये खर्च केले जातात आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पण पैश्याची उधळपट्टी होताना दिसते. नवीन वर्ष मात्र ज्यांच्याकडे  पैशाची श्रीमंती आहे  जिथे पैसा पाण्यासारखा वाहिला  जाऊ शकतो त्यांच्यासाठी असते .पण एक वर्ग असाही असतो ज्यांना नवीन वर्ष आणि गेलेल्या वर्ष यात काही फरक वाटत नाही कारण नवीन वर्षाला सुद्धा त्यांना दिवसभर पोटातील भुकेच्या  आगीसाठी   सांजेची भाकर शोधण्यातच वेळ निघून जाते तर त्या नवीन वर्षाला साजरा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्याच्या आयुष्यातील रोजच्याप्रमाणे तो ही दिवस दोन घास भाकरीसाठी दारोदारी फिरण्यात निघून जातो.एकीकडे नवीन वर्ष साजरे होत असतांना लाखो रुपयांची नासाडी होते त्याच वेळी हॉटेलच्या बाहेर उरलेल्या अन्नासाठी वाट पाहणारी गरीब मुले ,म्हातारी माणसे तर कधी शरीराने अपंग झालेली लोक ते श्रीमंताची पार्टी होण्याची वाट पाहत असतात.पण काही लोकांना त्याच्या हॉटेल समोर रोषणाई केलेली इतकी महागडी फुलांनी दिव्यांनी सजवत केलेली तिथे अश्या अंगावर मळलेले घाण कापले ,सोकलेले भुकेने चेहरे अशी माणसे त्याच्या सजावटीच्या आड येतात म्हणून त्यांना तिथून हाकलून दिल्या जाते .पण आपला हा आनंद साजरा करीत असताना थोडा वेळ काढून यांना जर दिला तर खरे नवीन  वर्षाचे स्वागत ठरते .  म्हणून तुम्हाला खरचं नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर या गरीब लोकांची भाकर म्हणून त्याच्या जवळ जाउन  थोड प्रेम द्या त्या लोकांना जे आईवडिलांच्या प्रेमापासून दुरावलेले असतात.या नवीन वर्षाला त्या सोकलेल्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांना थोड हसवून पाहा .नवीन वर्ष साजरे करण्यासाठी महागड्या वस्तू भेट देणे ,पैसा उडवणे हे आवश्यकच नसत ,या नवीन वर्षाचे स्वागत अगदी मनपासून करावे साधेपणाने सगळ्यांना सहभागी करून ,इतरांच्या चेहऱ्यावर आन्दाच्या हास्य लहरी देऊन साजरे केलेले नूतन वर्ष हि सदैव स्मरणात राहते ,अश्या छोटय छोट्या गोस्टीतून मनाला मिळणारा आनंद कधीच न मावळणारा असतो .नूतन वर्षाला कोणी खूप पुस्तके वाचण्याचा संकल्प करते ,तर कोणी लिहिण्याचा संकल्प करते ,कोणी नियमित व्यायम करण्याचा संकल्प करते ,आपल्याला सोयीस्कर वाटेल असे मनात संकल्प केले जातात . पण जसे जसे नवीन वर्षातील दिवस मागे पडू लागतात तसे तसे आप्प्ले संकल्प कमजोर पडत जातात .आणि पुन्हा आपला रोजचाच दिनक्रम चालू होतो .अलीकडे मोबाईलचा वापर फार वाढला माणूस एका घरात असून पण माणसापासून दूर गेला ,आपल्या माणसासाठी आपल्याकडे वेळ नाही ,एकीकडे जग जवळ आले म्हणतात .पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माणूस हि दूर गेला माणसापासून . निसर्गाच्या रम्य वातावरणात तो रमायला विसरला नोकरी ,व्यवसाय आणि घर यात दिवसेंदिवस गुंग झालेला  माणूस मात्र खरे जीवन विसरून आभासी जगणे स्वीकारू लागला .आयुष्यात सदैव चेहऱ्यावर ताण –तणाव घेऊन जगणाऱ्या माणसाचे वर्षाचे सुखाचे गेलेले दिवस पुन्हा आयुष्याचे ओझ होऊन जातात .   पण यावेळेस आयुष्यातून आनंद पुन्हा मिळवण्यासाठी या नूतन वर्षी असा संकल्प करूया  असा संकल्प थोडं जगूया स्वतासाठी या रम्य    निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला थोड विसरून पाहा.. फुलांचे रंग होऊन जगुण पहा ....नव वर्ष म्हणजे केवळ पैश्याची उधळपट्टी नसून नवीन संकल्प असतो नव्या स्वप्नांचा ...नवीन आयुष्यात केलेला ध्यास असतो नवी जगण्याचा...या दिवशी करून पहावे थोड जगावेगळं काही तरी,अस की ज्याचे कौतुक सर्वांनी केले पाहिजे .ज्यामुळे कोणाला तरी फायदा झाला पाहिजे.आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवीन असतो.पण मनाला भावणारा नवे पण देणारा नव्या नव्या उत्सवाचा, नव्या पर्वाचा, नव्या ध्येयाचा, नव्या प्रेरणेचा, नव्या कौतुकाचा, स्वप्नांचा आकांक्षांचा, नव्या कोवळ्या भावनांचा, म्हणजेच खर्या आयुष्याचा अश्या  नवीन वर्षाचा दिवस या दिवसाच्या निमित्ताने फुलू द्यावे  हृदयात  अनेक स्वप्न उमलू द्या कळ्यांना स्वप्नांच्या दिशेने  ..... मनामध्ये  करूया ध्यास माणूस म्हणून जगण्याचा  अंकुरुया करुणा मानवते कडे नेणारी . नव्या वर्षी केलेला  संकल्प हा केवळ एका दिवसातच नसावा क्षणाक्षणाला अंतर्मनाला प्रेरणा देवून उत्साह निर्माण करणारा असावा..तेव्हा चला करूया ध्यास नवा या नूतन वर्षाच्या निमित्ताने ...............................
                                                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                                                     रा .पातुर जि .अकोला

Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - डिसेंबर २७, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

मानवधर्म मोठा आहे....



मी जन्मलो तेव्हा नव्हते माहीत मला जाती धर्माच्या भिंती....
मी फक्त माणूस म्हणून जन्माला आलो होतो......
मी फक्त माणूस होतो
न कुठल्या जातीचा ना  कुठल्या पातीचा न एका समाजाचा.....
पण माझे नाव ठेवले गेले जातीवरून .....
माझा धर्म अस्तित्वात आला ...
मी माणसातुन दूर होऊन जातीच्या बंधनात बांधल्या गेलो ..
मी आता लहानाचा मोठा झालो....
समाजाला पाहू लागलो...
जो तो आपलीच जात श्रेष्ठ घेऊन बसला होता....
माणूसच माणसापासून दूर जात होता......
मी शाळेत गेलो तिथेही मला ही जात दिसली माझ्या टीसी वर लिहिलेली....
शाळेतून जणू ही बालमनावर पेरणी झालेली...
शाळेत केवळ ज्ञानार्थी असावे पण तिथेही ही जात मला दिसली.....
निष्पाप मनावर कोरल्या गेली....
मोठा होत गेलो समाजाच्या या जातीपातीच्या वातावरणात ....
जेव्हा वेळ आली माझ्या जातीच्या संघर्षाची तेव्हा मी पण केली दगडफेक आपल्याच माणसांवर......
दोष कोणाचा आहे माझा की या समाजाचा जो जातीचे बीज अजूनही मुळासकट उखडून टाकत नाही.....
वेळीच का दिशा नको का ह्या समाजातील युवकांना जे ह्याच जातीपातीच्या वातावरणात आयुष्य वाया घालवतात....
की त्यांची डोकी पेटवून दिली जातात...
पुरे झाले हे जगणे जातीपातीचे मी माणूस आहे ...
हीच माझी जात आणि माझी ओळख आहे...
बंद का होत नाही हा रक्तपाताचा संघर्ष .....
थांबवा ही नेहमीची जाळपोळ ...
अन्यथा माणूस हरेल आणि ही जात नावाची बिमारी जिंकेल ..
मी पाहिले, जगलो,मी ही दंगा केला पण आता माझे डोळे उघळले ....
आता मला माणूसच मोठा वाटतो कारण हा आता माझा विचार आहे ....
हाच विचार तुम्ही ही करा कारण अजून खूप पुढे जाणे आहे आपल्याला .....
गरिबिसोबत लढायचे आहे आपल्याला ....
आजही उपाशी पोटी लेकरू रडून मरते गरिबाचे ...
त्यांना दोन घास भाकर देऊन जगवायच आपल्याला.....
 नकोच हा संघर्ष आता फक्त माणूस मोठा माणसातील माणुसकी मोठी आहे .....
मानवधर्म हीच जात खरी म्हणून धावून जाऊ तिथे जिथे गरज आहे....
मिटवू हे बीज विषाचे ...
पाडून टाकू  ह्या भिंती 
 कारण मानवधर्म मोठा आहे....
मानवधर्मच मोठा आहे.... 
                          
          अॅड विशाखा समाधान बोरकर
Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - डिसेंबर १८, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

"यशाचा निर्मळ झरा......"


                               



जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते.आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे. जिद्द चिकाटीच्या सारखी जागा जगात कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही. कुठलीही प्रतिभा, कुठलीच बुद्धिमत्ता, कुठलीच विद्वत्ता ,कोणीच नाही. जिद्द चिकाटी समोर कोणीच उभी राहू शकत नाही एवढे सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे ज्याच्या बळावर माणसाने एवढे शोध  लावले एवढी प्रगती केली आणि ते यशस्वी झाले यशस्वी माणूस  मेहनतीला सोडत नाही ज्याने सोडली तो कधी यशस्वी होत नाही यशाला नेहमी प्रयत्नांची जोड असायला हवी हजारो अपयश जीवनात आले असतील तर प्रयत्नाने यशाच्या निर्मळ झरा चा शोध लागतोच
                  प्रयत्नाची ज्योत तेजस्वी मनात पेटली पाहिजे
                   अपयशाच्या आधाराला प्रकाशित केले पाहिजे
               हवा तुला तर शोध यशाचा प्रयत्न तू सोडू नको
                 आत्मविश्वासाने प्रत्येक यश हलकेच जिंकले पाहिजे
आज माणसाने केलेली प्रगती त्यांच्या आत्मविश्वासानेच केली कारण कोणत्याही कामात उतरतांना ते जमेल का माझ्याने झेपावेल का मी अपयशी ठरलो तर असे अनेक प्रश्न माणसाच्या मनात यायला लागतात आणि त्या निरर्थक प्रश्नांनी माणसाचा आत्मविश्वास कमी कमी व्हायला लागते परिणामी आत्मविश्वासाच्या आभावी माणूस प्रयत्न करण्याआधीच आपला निर्णय मागे घेतो म्हणून असे न करता कोणत्याही गोष्टीला न घाबरता आत्मविश्वासाने त्याला सामोरे गेले पाहिजे . जीवना शिखर गाठायला निघणारे मोठ्या मेहनतीने शिखर गाठायला निघतात. पहिला असलेला उत्साह त्यांचा आत्मविश्वास वाढवतो,
पण तो उत्साह नेहमीच टिकून राहात नाही. थोडा थोडा आत्मविश्वास उत्साह कमी व्हायला लागतो.पण ह्याच वेळी त्यांचा आत्मविश्वास उत्साह टिकून आहे ते आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात ते शिखराच्या टोकापर्यंत मागे वळून पाहत नाहीत त्यांच्या आत्मविश्वास त्यांचे मनोबल वाढवत राहते आणि असेच ध्येयवेडे जगातील कितीही उंच शिखर गाठण्यास यशस्वी होतात आपली महिन्यात आपल्याला यशाची फळे दाखवते म्हणून जेवढी मेहनत तेवढी फळे मधुर आणि जिथे मिळतच नसेल नुसते फळाची आशा असेल तर ती अशा निरर्थक म्हणावी लागेल इतिहासात मोठ्या शास्त्रज्ञ विद्वान यांचे आत्मचरित्र वाचले की दिसून येईल त्यांनी जगात रस्त्याला इतिहास एकाच प्रयत्नातून नव्हे तर कितीही प्रयत्न करून या अपयशाला सामोरे जाऊन जास्त झाला आहे त्यांच्या प्रयत्नांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा कधीच न खचता प्रयत्न करीत रहावे जन्माला आलेल्या पाखरू आकाशात एकदम भरारी घेत नाही तर सुरुवातीला ते उडण्यासाठी प्रयत्न करते कधी जमिनीवर पडते आणि पुन्हा नव्या उमेदीने उडण्याचा प्रयत्न करते पाखरू आपले प्रयत्न तोवर सोडत नाही जोवर तो गगनात झेप घेत नाही आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना फळ मिळते व पाखरू नव्या उमेदीने गगनात उंच उंच झेप घेते. आई वडील लहानपासून मुलांना काहीतरी बनण्याचे स्वप्न दाखवतात त्याने काहीतरी नवीन करावा हा प्रयत्न तर असतोस सोबत व आदर्श माणूस बनवावा असे त्यांचे संस्कार असतात जीवनात सर्वच आशा मावळल्या की आई-वडिलांचे प्रेम त्यांचे संस्कार आपल्याला यशाचा नवीन मार्ग दाखवतात मुलांना जिद्दीचं बालवयापासूनच मिळायला हवा म्हणजे जीवनाचा निश्चित केलेला मार्ग सरळ आणि सोपा होईल जिथे आपले शिखर आहे तिथे पोहोचण्यासाठी आपली विचारशक्ती सदैव सक्रिय ठेवली पाहिजे, कुठला ही प्रवास गाठायचा गाठायचा म्हटलं की प्रवासाची टप्पे आलेच त्याच प्रमाणे आपल्या जीवन प्रवास असते त्यामध्ये अनेक टप्पे असतात या टप्प्यातून मार्गक्रमण करून प्रवास सुखाचा आनंदाचा करावा लागतो आपल्या प्रवासाचा यशाकडे ओढत नेत असताना अनेक जण मार्ग खेचण्याचा प्रयत्न करतात पण योग्य नियोजनाचा मुळे सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरतात व मेहनत ही माणसाचा तरी पोहोचवला जातो कोणत्याही स्पर्धेत उतरताना एक निश्चित पक्का करावा की शेवटी प्रयत्नातून निर्धार मार्ग घेतला गेला नाही पाहिजे मग येणारी परिस्थिती कितीही भयानक असू परिस्थितीला पाहून आपले सामर्थ्य वाढले पाहिजे जीवनाचा स्तर उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट कुठलीच नाही माणसाची योग्यता त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोन सकारात्मक परिस्थिती बदलायला एक क्षणही लागत नाही परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्न करावेत कदाचित वाट पाहण्याचे आयुष्य निघून जाईल पण प्रयत्नाने परिस्थिती क्षणात बदलू शकेल पण हे सर्व कृतीतूनच साध्य होऊ शकते परिस्थितीला चेतावणी घटना रेस खरे ठरतात शेवटी नाण्याच्या दोन बाजू यश-अपयश हे जरी असले तरीही ह्या  दोन्ही गोष्टींमुळे खऱ्या शिखराची किंमत कळते जगात काहीतरी नवीन करून आपलं नाव या क्षितिजावर करायची असेल तर स्वप्न पहा ध्येय गाठा जिद्द चिकाटीने पेटून उठा हजारो अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका कारण कठीण दगडाखाली अपयशाचा निर्मळ झरा असतो आणि तो सहजतेने मिळत नाही माणसाला प्रयत्नाने यशाचा झरा मिळतो......
                           अॅड विशाखा समाधान बोरकर
                             रा.पातूर जी अकोला


Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - डिसेंबर १६, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

हीच खरी महामानवाला श्रद्धांजली

                                                 हीच खरी महामानवाला श्रद्धांजली
                                                  तू कोटी दिनांचा उद्धारक झाला
                                                        तूच दिले आम्हा अस्तित्व
                                                      तूच लढण्याची मशाल झाला
६ डिसेंबर १९५६ साली या दिनी  दिन दलितांचा प्राण हरवला होता ,तो दुखाचा सागर आजही तसाच दरवर्षी येतो चैत्यभूमीवर  आपल्या भिमाबाच्या भेटीसाठी ,ती उफाडणारी सागराची लाट हि पाहून थक्क होतो तो भीम  अनुयायांच्या तुफानी  लाटेला पाहून, .इथे येणारा प्रत्येक अनुयायी  बाबासाहेबांना भिमांजली दयायला येतो .अन सोबत  घेऊन जातो बाबासाहेबांच्या विचारांचे वादळ .आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन ६३ वर्षे झाली. पण आजही ते   विचारानी जिवंत आहेत  . त्यांचे विचार जगाला खूप प्रेरणा देत. भारतीय घटनेचे शिल्पकार  महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या शतकातील एक अद्वितीय महामानव प्रकांडपंडित ,बंडखोर समाज क्रांतिकारक, विधिज्ञ ,समाजाचे मर्मज्ञ, हाडाचे पत्रकार, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू ते अनेक तेजस्वी अनमोल पैलूंचे  एक देदीप्यमान कोहिनूर होते. त्यांनी आपल्या सूर्य रुपी तेजस्वी ज्ञानाचा व प्रतिभेचा उपयोग तळागाळातील  समाजाच्या मुक्तीसाठी केला. शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा, अशी त्रिसूत्री देणाऱ्या बाबासाहेबांचे जीवन चरित्र वाचता असे निदर्शनास येते की या त्रिसूत्रीनेच या महामानवाचे संपूर्ण जीवन व्यापलेले आहे हे ते सूत्र म्हणजे युगपुरुषांच्या जीवनाचे खरे सार आहे. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की "गरज ही शोधाची जननी आहे" याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण ही काळाची गरज आहे असे ठासून सांगितले होते. म्हणून अनुभवावर आधारलेले ही शिकवण  युगायुगापासुन आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित असलेल्या व पशुहून हिन दीन असे लाचारीचे जीवन जगणाऱ्या पददलित बांधवांना या त्रिसूत्री शिकवणीची संजीवनी पाजून सन्मानित असे नवजीवन देण्याचे मौल्यवान कार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेब शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणायचे, याच सूत्रावर त्यांचा जीवनाचा रथ चालला. अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असे ते म्हणायचे. या अन्यायाला लढण्यासाठी पददलितांना शिका संघटित करून  न्यायासाठी त्यांनी रणशिंगे फुंकून संघर्ष केला. तमाम पशुहून हिन जगणाऱ्या   माणसांना माणसात आणले ,त्यांचे हक्क मिळवून दिले ,दुःख जन्मते अज्ञानापोटी, ज्ञान दुःख  मुक्तीसाठी  यावर निष्ठा असणारे डॉ. आंबेडकर आपल्या जीवनात अज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व देणारे होते. म्हणून ते सतत विध्यार्जनात मग्न राहिले .आपल्या लौकिक बुद्धिमत्तेवर यां ज्ञानपिपासू विद्वानाने परदेशी जाऊन अनेक पदव्या संपादन केल्या . तत्कालीन समाज व्यवस्थेचा विचार करता बाबासाहेबांनी अति प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी किती कठोर संघर्ष केला अशी कल्पना आहे चरित्र वाचले  की येते . सर्व पद्धती समाजाला जागृत करून  सुसंघटित करून करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत, जनता ,प्रबुद्ध भारत यासारखे पक्षिके ते सुरू केली .बाबासाहेबांनी सुरू केलेली चळवळ म्हणजे अवकाशाला गवसणी घेण्यासारखे होते. युगा युगा पासून अंधारलेल्या या जगामध्ये सूर्य होऊन पददलितांचे जीवन प्रकाशनारे बाबासाहेब  ज्ञानवंत ज्ञानपिपासू होते. त्यांच्या सारखे व्यक्तिमत्व क्षितिजावर ही आढळणार नाही.
 त्यांच्या संदर्भात जे जे वाचावे ऐकावे ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यापकता     कर्तुत्वाची विशाल बुद्धीची भव्यता अधिकाधिक गहन होऊन होऊन आपली मती गुंग होते. त्यांनी लढलेल्या सामाजिक सत्याग्रह चळवळ रक्ताचा थेंबही न सांडवता केवळ एका लेखणीच्या बळावर लढल्या.स्त्रीयाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा होता  डॉ.बाबासाहेबांना स्त्रियांविषयी खुप आपुलकी होती आणि त्यांच्या परिस्थितीविषयी जाण होती.म्हणुन ते म्हणतात की ‘I Measure the progress of the community by the degree of progress which woman have achieved'(मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रीयांच्या झालेल्या प्रगतीवरुन मोजतो.)इतका आधुनिक  वैश्विक विचारवंत स्त्रियांविषयी पुर्ण जगात नाही.म्हणुन बराक ओबामा म्हणतात की “डॉ.आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्य संबोधले असते.” त्यांच्यामते घराच्या विकासावरून गावाचा तर पुढे देशाचा विकास होतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष केवळ दलितांसाठी नव्हता तर संपूर्ण भारतातील समाजाच्या शुद्धीकरणासाठी होता .
बाबासाहेब आंबेडकर एकावेळी सनातन वाद्यांच्या  विरुद्ध   तसेच आपल्या समाजात परंपरेने चालत आलेल्या दोषांवर बोट ठेवून तो दोष  दूर  करताना स्व जातींशी संघर्ष करीत होते. कारण त्यांच्या मनात फार राष्ट्रभक्ती आणि मानवतेवर श्रद्धा होती. राष्ट्रापेक्षा धर्म श्रेष्ठ भासवून राजकीय स्वार्थ  साधने त्यांना शक्य होते, परंतु आंबेडकरांना हवा होता खरा खुरा मानवतावाद आणि मानवतेवर आधारलेल्या राष्ट्रवाद म्हणजे राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीआधी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांना लाख मोलाची वाटे
त्यांना संपूर्ण भारत समाजव्यवस्थेची पुनर्रचना हवी होती .म्हणून त्यांना चळवळीतील  विषमता दारिद्र्य आणि अनिती यांचा नकाराचा प्रयत्न होता .जोपर्यंत विषमताधिष्ठित समाज परिवर्तन होत नाही तोपर्यंत खऱ्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही असा व्यापक विचार त्यांच्या ठायी होता. त्यांचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारक नसून संपूर्ण भारत देशाचे उद्धारक  होते.  माणूस लोकशाहीसाठी झाला पाहिजे म्हणून त्यांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर समाजाचा पाया रचला त्यांनी संविधान लिहून  देशाला बळकट लोकशाहीप्रधान केली.
 आज संविधान आपल्या राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे . इतिहासाच्या पानावर अक्षरश हजारोंनी गर्दी केली आहे.पण गर्दीत एक नाव सुर्यासारखं ‘स्वयंप्रकाशित’ होउन सर्वांना जगण्याचा प्रकाश देत आहे ते नाव म्हणजे वैश्विक ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय’.डॉ.बाबासाहेब आज विश्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणा बनले आहेत आज बाबासाहेबांच्या  विचारांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची  गरज आहे.आजच्या विविध मार्गाने भरकटलेल्या युवकांनी तर आधी बाबासाहेबाना वाचावे .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहीजे आहे,त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहीजे आहे,भारतातले लोक त्यांना विञानवादी पाहीजे आहेत,भारतामध्ये समता स्वातंत्र्य,बंधुत्व,आणि सामाजिक न्याय त्यांना पाहीजे आहे,स्त्रियांचा संन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे,त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मताह: समान आहेत ,देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती “लोकांनी चालवण्यापेंक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे”  असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे.

डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच ” लोकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जिवनात क्रांतिकारक बदल घडवुन आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय” अशी आहे.म्हणजे लोकांच्या पुर्णत जिवनात परिवर्तनकारी बदल घडणे हेच बाबासाहेबांच्या लोकशाहीचे ध्येय आहे .आणि आपण ते पुर्ण करायला हवे.आणि डॉ.बाबासाहेब असेही म्हणतात की “एखादा माणुस कितीही मोठा असला तर त्याच्या चरणी आपण आपले व्यक्तीस्वातंत्र्याची सुमणे उधडु नये.!”आणि पुढे ते असेही म्हणतात की ” स्वाभिमानाचा बळी देउन कोणताही माणुस कृतञता व्यक्त करु शकत नाही,शीलाचा बळी देउन कोणतीही स्त्री कृतञ राहु शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देउन  कोणतेही राष्ट्र कृतञता व्यक्त करु शकत नाही..” हा जो भयसुचक संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो वेळोवेळी आपणा सर्वांना दिशादर्शक आहे.याचा आपण सदोदित विचार करायला हवा आणि त्यांनी असेही म्हटवे आहे की ” आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा बिंदु असेपर्यत आपण आपल्या मायभुमिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे”.
खरी देशभक्ती राष्ट्रीयत्व काय? “एखाद्या भारतीय व्यक्तीला परदेशात काही झाल्यास ‘संपुर्ण देश’ पेटुन उठला पाहीजे फक्त त्याच्या धर्माचे किंवा जातीचे नव्हे..!”हेच खर्या एका राष्ट्राचे लक्षण आहे.त्यातच त्याचे रक्षण आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या मताधिकाराचा(मतदान नव्हे!)वापर विचारपुर्वक करायला हवा.मतदान या शब्दात ‘दान’ असल्यामुळे आणि दान दिल्यावर काही संबध राहत नाही तसच राजकीय नेत्यांना वाटते की दान केलं म्हणजे संपलं आणि त्याच्या मतासाठी लोक पैशेही स्विकारतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी अतिशय विचारपुर्वक संदेश दिला आहे.” तुमच्या मताची किंमत तुम्ही मिठ मिरची इतकी कमी समजु नका.ज्यादिवशी त्यातील सामार्थ तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेउ पाहणार्या व्यक्तीइतके कंगाल कोणी नसेल..!”हे खरोखरच खरं आहे.एका मतामध्ये इतकी शक्ती आहे की सत्तेला ती नियंत्रित करु शकते.म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर करणे गरजेचे आहे आणि मताधिकार(Right of vote)हा केवळ डॉ.बाबासाहेबांमुळेच प्रत्येक भारतीयला मिळाला आहे.कित्येक देशामध्ये स्त्रियांना,गरीबांना,खालच्या जातीच्या लोकांना मताधिकार नव्हते आणि भारतासारख्या देशामध्ये डॉ.बाबासाहेबांनी ते इतक्या लवकर भारतीय संविधानाच्या माध्यमातुन दिले आहेत याविषयी प्रत्येक भारतीयांने बाबासाहेबांशी नेहमी कृतञ राहीले पाहीजे.

जातीवाद,दलितांवरील अत्याचारात वाढ होतांना दिसत आहे.एखाद्या व्यक्तीला  खालच्या जातीचा आहे म्हणुन असे अमानवी कृत्य करणे लाछनास्पद आहे.उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो किंवा आणखी कोणते राज्य असो असे अन्याय अत्याचार रोज होत असतात पण ते माहीती होतातच असे नाही.डॉ.बाबासाहेबांनी म्हणुन सांगितले आहे की Castes are anti national (जाती या देशविघातक आहेत)म्हणुन डॉ.बाबासाहेबांनी annihilation of caste लिहुन जागाचे लक्ष वेधले.आणि जाती निर्मुलन करण्यासाठीच आणि माणसाला माणुस बनण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला.आणि डॉ.बाबासाहेबांना विञानवादी धम्म पाहीजे होता.बुद्ध म्हणतात की “मी सांगतो आहे म्हणुन माझा धम्म स्विकारु नका तसेच कोणतीही गोष्ट एखादी मोठी व्यक्ती सांगत आहे किंवा ज्येष्ठ व्यक्ती सांगत आहे समाजात दिली मान आहे ती सांगत आहे म्हणुन ती गोष्ट स्विकारु नका तर ते बुद्धिच्या कसोटीवर घासुन बघा.ती तुम्हाला बुद्धिसंगत न्यायसंगत वाटत असली तरच स्विकारा अन्यथा सोडुन द्या.स्वतच्या धम्माविषयी जगात बुद्धाशिवाय कोणीही इतके विचारस्वातंत्र्य दिले नाही..!असाच विञानवाद डॉ.बाबासाहेबांना भारतीय लोकांमध्ये पाहीजे आहे .

आज चित्र पाहीले तर देशाचे दोन भाग दिसतात.एक भारत आणि दुसरा इंडिया..!भारत हा खेडेगावाला म्हणतात आणि इंडीया हे शहरी भागाला म्हणतात.आजही खेळेगावात अप्रगत आणि फक्त शहराचा विकास होत आहे.ही विषमता आपल्याला नष्ट करावी लागेल.शहराबरोबरच आपल्याला गावांचाही विकास करावा लागेल.”स्मार्ट सिटी” बरोबरच “स्मार्ट व्हीलेजही” व्हायला हवे.शेती आणि शेतकर्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकित केले होते ते आजही लागु पडते किंबहुना त्याची गरज तेव्हापेक्षा जास्त आहे.डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की “भारतीय शेती ही आजारी पडली आहे.शेतीसाठी शासनीने पुढाकार घ्यायला हवा.शेतकर्याने शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देउन उद्योगधंदा सुरु करायला सांगायला पाहीजे,नोकरी करायला पाहीजे आणि फक्त एकालाच शेतीत ठेवले पाहीजे.आणि  सर्वात महत्वाचं शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहीजे.त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव द्यायला हवा.नाहीतर एक दिवस असा येइल की शेतकर्याला आत्महत्या करावे लागेल… आणि जे आज मोठ्या प्रमाणात होत आहे
डॉ.बाबासाहेबांनी केलेलं भाकीत आज खरं होत आहे.शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे.यासाठी तमाम शेतकर्यांनी आणि सरकारने डॉ.बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत त्याचा अंगिकार करणे ही काळाची गरज झाली आहे.आजची इ विकृत परिस्थिती बदलणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे आणि मग हीच खरी महामानवाला श्रद्धांजली ठरेल .

                                                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                                                            रा पातुर जी अकोला
Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - डिसेंबर ०५, २०१९ ३ टिप्पण्या:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

पुन्हा निर्भया.....


आज पुन्हा मेणबत्त्या जाळल्या जातील
झोपलेली माणसे जागे होतील
हाहा कार होईल पुन्हा तिच्यासाठी
पुन्हा हा आवाज शांत होईल
का होत असे की नकोच तिला रात्री फिरण्याचा अधिकार
कोण कुठे कसे मुखवटे घालून असेल काय तिला कल्पना
आणखी किती निर्भया होतील
कोपर्डी असो की दिल्ली
ती कुठेच सुरक्षित नाही
त्या निष्पाप जीवाचा जीव जातो
आयुष्य तिचे तिथेच थांबते
या विचाराने सर्वच मने पेटून उठतात
त्या नराधमाला फाशी द्या म्हटले जाते
न्यायालयाचे दार ठोकले मात्र जाते
 आसवे पुसत हे सर्व पाहत असते
प्रश्न तिचा तोच असतो थांबवा हा खेळ आमुचा
आणि मुळासकट करा नायनाट ह्या प्रश्नाचा
मी एकटीच नव्हे तर कितीतरी जीव जात आहेत आणि जातील
त्या जाणाऱ्या जीवाला सुरक्षित करा
बंद करा ह्या नेहमीच्या मेणबत्त्या जाळणे
काय होईल तसे करून काय त्या पुन्हा परत येतील
करा रक्षण त्या मुलीचे  ज्या या असुरक्षित जगात जगतात
वेळ येताच धावून जा स्वतःची बहीण समजून
तेव्हाच ह्या घटना बंद होतील
अन्यथा हे सत्र तर चालूच राहील पुन्हा एकदा  प्रियांका ,
कोपर्डी ,निर्भयाच्या नावाने......
                                      अॅड विशाखा समाधान बोरकर




       




Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - नोव्हेंबर २९, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

निसर्गाचे लोभस रूप..................




निसर्गाच लोभस रूप ,आणखीच डोळ्यास भोवते
जेव्हा वाऱ्यासोबत हिरवे झाड झुळूझुळ डोलते
ढग गर्जती नभामध्ये पाखरा  देइ मायेचा सहारा
भिजलेल्या धरतीवर बीज अंकुरुन फुलायला लागते

रिमझिमणारे थेंब पावसाचे पानावरी हसू पाहते
चिंब भिजलेले झाड सोनुकले वर्षाने किती आनंदते
नांगर हाकत शेतामधी तो थकून जातो पार
निवांत वेळी झाडाच्या छायेत तो हलकेच निजायला लागते

वृक्ष माय – बाप सर्वाचा उन्ह पानांवर झेलते
त्यागातच जाते जीवन त्याचे स्व;तास काय मागते
फळ - फुल त्याची देतो सर्वाना वाटूनि
लेकराची भूक भागवतांना मनोमन हसायला लागते .

आयूष्य जाते त्याचे देता – देता
हे माणसाला कधी बर कळते
वृक्षाची कत्तल करून माणूस कुऱ्हाळी
      पायावर मारते
माये  समान प्रेम झाडाचे टपटप गळतात आसवे
दिसू न देता कुणास ते चटकन पुसायला लागते

माणसाचा जन्म तयांवर शेवटी हि त्यावरच होते
शेवट पर्यन्तची साथ आपली तोच मित्र जपते  
देता निरोप शेवटचा डबडबतात त्याचे हि डोळे
आपल्या विरहाने तो हि सखा अग्नीत जळायला लागते .
                   

                     अॅड विशाखा समाधान बोरकर
                       ता. पातुर जि. अकोला
                             
                        

Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - नोव्हेंबर २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

हुंदका ..............

हुंदका........................


शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होती, तिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला.

तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व... तिचे आई-बाबा आणि तिचा परिवारसुद्धा... दोघींचे अनोखे विश्व होते. सुमनचे बाबा ती दहा महिन्यांची होती तेव्हाच वारले होते. सुखवस्तू घरात तिचे लहानपण गेले होते. तिला कशाचीच कमी नव्हती. उणीव असायची ती केवळ तिच्या बाबाची. ती नेहमी तिच्या आईला विचारायची आई बाबा कसे दिसायचे? ते माझा खूप लाड करायचे का? त्यांना माझी आठवण येत असेल का? आई शाळेतील सर्वच मुली त्यांच्या बाबांसोबत येतात तेव्हा मला बाबाची खूपच आठवण येते गं... जेमतेम तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सुमनचे शब्द ऐकून मात्र तिची आई सुन्न व्हायची. ती सुमनला बाबाच्या आठवणी सांगायची. असे करता करता अनेक दिवस निघून गेले. सुमन पाचवीला शिकत होती. सुमन अभ्यासात फार हुशार होती, त्याचबरोबर ती आईला मदत करायची. तिची आई लहान मुलांना शिकवायची. त्यातून मिळणारे पैसे ती सुमनच्या शिक्षणाला लावायची. सुमन फार हळवी होती. कुणाचेही दुःख पाहून लवकरच ती भावूक व्हायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आवडीची होती सुमन. तिला निसर्गात स्वतःला विसरून बेभान व्हायला आवडायचं, तर कधी ते बालमन तासनतास त्या वेड्या पाखरांचा लपंडाव पहायचे. ई... आई बघ की ते पाखरू किती उंच उडतंय... व्वा किती गं ही उंच भरारी... आई मलापण या पाखरासारखे उडावेसे वाटते. चल ना मला घेऊन कुठेतरी या जगाला विसरून या पाखरासारखं लपंडाव करायला, असे ती आईला म्हणत होती. आई मात्र त्या कोवळ्या बालमनाचे ते निरागस प्रश्न ऐकत होती
"जाऊ रे माझ्या राजा", असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.

तिला सुमनचा एकही शब्द मोडवेना पण कालपर्यंत सुखात वाढलेल्या या पोरीला कधीतरी तिला नाही म्हणावं लागेल याचे आईला फार दुःख व्हायचे. आता तर आणखीच भलमोठं संकट येणार होतं, असा ती विचार करते न करते तर बाहेर पोस्टमन आला पत्र घेऊन. जसे पत्र हाती पडले तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती घाबरून नुसतं पाहण्याचे काम करायची. सुमन आली, तिला हलवले, आई आई म्हटले तेव्हा कुठेतरी तिला जाग आली. तिने सुमनला घट्ट पकडून आक्रोश केला. सुमा... माझ्या बाळा, आता आपण कुठे जावे, कुठे राहावे मला काहीच कळत नाही रे माझ्या राजा... आई सुमनला सांगत होती कारण सुमनचे बाबा गेले तेव्हापासून तिच्या काकाने त्यांना घरातून जायला भाग पाडले होते. पण खूप विनंत्या करून त्यांनी आजपर्यंत राहू दिले कारण त्या काकाने सर्व संपत्ती धोक्याने मिळवली होती. त्याला थोडाही तरस येत नव्हता सुमा आणि तिच्या आईवर... आता त्याने ते घर विकले होते. त्या घरमालकाला आता घर पाहिजे होते त्याकरिता काहीपण करून उद्या घर सोडून जाणे भागच होते. सुमनची आई खूप रडत होती... तिला काहीच कळेना, काय करायचे ते... तिला सुमनच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझी लहान पोर घेऊन मी कुठे जाऊ... माहेरी अनाथ असलेल्या सुमनच्या आईला सुमनशिवाय कोणीच नव्हते. अगदी लहान वयात सुमनला काय करावं काही सुचेना.

आसवांच्या पुरात ती रात्र निघून गेली होती. सकाळ झाली... सुमन डोळे चोळत उठली... आई आई करून आईला हाक मारीत होती पण तिला आई मात्र कुठेच दिसत नव्हती. ती बागेत गेली जिथे तिची आई तिच्यासोबत खेळायची... तिथेही तिला आई कुठेही दिसत नव्हती. शेवटी ही आई गेली तरी कुठे... तिला काळजी वाटू लागली. ती शेवटी आईला शोधत स्वयंपाकगृहात गेली तर पाहते तर काय तिची आई झोपलेलीच होती. तिला पाहताच लहान सुमन धावतच गेली... आई आई म्हणाली. आई काही उठेना... सुमन रडत होती. त्या दिवशी तिचा काका तिच्या आईला घरातून काढून देण्याच्या आसुरी आनंदाने पाहायला आला होता. त्या घराचे मालक आणि तो गेटवर उभे होते. आता कुठे जातील ह्या मायलेकी हे पाहण्यासठी तो आला होता. तो सुमनच्या आई-बाबाचा पक्का वैरीच होता. धोक्याने त्याने त्याची संपत्ती मिळवली होती, पण सुमनच्या आईला मात्र आता काहीच संपत्तीचा लोभ नव्हता, पण तिच्या काकाने सुमनच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं घर सोडून जाण्याचा आवाज असेल... त्याच आनंदासाठी तो पाहण्यासाठी ते इथे आले होते. इकडे सुमन आईला हलवून हलवून थकली. तिचा आवाज ऐकून शेजारील बाया आल्या. त्यांनी सुमनला जवळ घेतले आणि त्यांनी एकच आक्रोश केला तिला पकडून... बाळ सुमा... तुझी आई गेली... आपल्या सर्वांना सोडून... सुमाला काय करावं काही सुचेना. रडण्याचा आवाज ऐकून तो राक्षसी प्रवृत्तीचा काका आला. तो आला तर खरं पण हा सर्व क्षण पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती, त्याच्यातील माणूस जागा झाला होता. सुमाच्या आसवांनी त्याला माणूस केले होते. त्याला हा आयुष्याचा विध्वंस पहावला नाही. तो लहान सुमनजवळ आला. त्याच्या आईचे पाय पकडून माफी मागत होता. त्याच्या बदल्याच्या वृत्तीमुळेच आज हा दिवस आला होता. बाळा... मला माफ कर, मी तुझी माफी मागतो. मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या आयुष्याचा गुन्हेगार आहे, मी तुझ्या आईची माफी मागण्याच्या लायक नाही. बाळा पण आजपासून तूच माझं आयुष्य आणि तूच माझी खरी संपत्ती... असे म्हणून त्या दिवसापासून निरागस सुमाचे हसणे बोलणे गेले. होता केवळ हुंदका... जो फक्त ती जिवंत आहे याचा भास करून जायचा.

आई गेल्यावर तिच्या काकाचा प्राण आणि सर्वस्व होती सुमन... पण तिच्यातील जीव आईसोबत गेला होता. आज ती मुलींना पाहते तेव्हा तिच्याजवळ असतो तो केवळ हुंदका आणि हुंदका आणि फक्त हुंदका... 
                                           अॅड विशाखा समाधान बोरकर 
                                         
                          
                         
        
Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - नोव्हेंबर २५, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

आयुष्याचे शेवटचे पान



आयुष्य जीवनातील प्रत्येक टप्प्यात काही ना काही शिकवत राहत ,ते किती हि चांगल्या प्रकारे जगले तरी प्रत्येक वेळी आनंद मिळत नसतो , कधी - कधी पदरी निराशा हि येते .आयुष्यभर इतरांसाठी जगता – जगता एक दिवस तेच त्यांना कधी परके होतात कळतच नाही . ज्या मुलांसाठी आई – वडील आयुष्य वाहुन टाकतात ते मुले त्यांना अधांतरी सोडून का जातात? समाजात नेहमीच त्या थकलेल्या चेहऱ्यावर दु;ख दिसते जीवनाचे रस्ते पार करता – करता अखेर शेवटच्या वळणावर  त्या  म्हाताऱ्या आई – वडीलांना दु;खाचे दिवस त्यांचीच मुलं दाखवतात घ्या सर्व गोष्टीने मन सुन्न पडते


         आयुष्याची वाट शेवटची
         का दु;खाची होऊन जाते
         तुटलेल्या काळजाला का
        आणखी तोडून जाते .
        संपते ती एक – एक पाने आयुष्याची
       शेवटचे पान का जीवनाचे
       आसवांनी भिजून जाते .

मुलांची स्वप्न पूर्ण करता – करता आयुष्याची  पाने कधी भरभर उडत गेली कळतच नसत .त्या पानांवर  झळकणारे सुख – दु;खाचे आसवे मात्र तसेच उमटून जातात. आज त्या भिजलेल्या डोळ्यांनी आजोबा आयुष्याची पाने उलटून पाहत होते आयुष्यभर कष्ट करून त्यांनी मुलांना मोठं घडवल होत .मुलांना त्यांची आई नसण्याची कधी उणीव त्यांनी घेऊ दिली नाही . आजोबा त्यांना कधी आई सारखे तर कधी वडील सारखे प्रेम द्यायचे , पण जेव्हा पासून ते निवृत्त झाले तेव्हा पासून जणू त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच हरवलं होत काल पर्यंन्त सुनानातवंड व मुलांना अनमोल वाटणारे त्याचे प्रेम आज नकोस वाटत होत .आता आजोबा एकटेच पडायला लागले घरात  केव्हा बाहेर फेरफटका मारावा  आणि समोरील त्यांच्या जिव्हाळयाची  बाग इतकेच मर्यादित उरून पुरलं होत त्याच आयूष्य, जेवढ प्रेम त्याच मुलावर होत तेवढेच त्या बागेवर हि घरात उदास वाटले कि ते बागेत सुखाचा श्वास घ्यायचे .त्याच असणे वा नसणे  यावर  सुध्दा त्यांना काळजी नसायची सुनेला जर चुकून पाणी मागितले तर ती चटकन उत्तर द्यायची
   ‘’घरीच तर असता तुम्हाला तेवढ हि करू नये का
    इतकच काम नसतात आमच्या मागे ‘’

असे बोलून ती निघून जायची .आजोबा मात्र नुसत बघत राहायचे. आजोबांचा प्रत्येक दिवस दु;खात उगवत असायचा व आसवांच्या पुरात डुबायचा ते सर्वासोबत प्रेमाने बोलू पहायचे व पण बदल्यात त्यांना केवळ तिरस्कारच मिळायचा .त्याच्या शेजारी एक सुखी कुटुंब राहायचे जे आजोबांवर जीवापाड प्रेम करायचं आजोबा त्यांच्या वडीलसारखे वाटायचे .त्याच्या बाळाला आजोबांचा फारच जिव्हाळा लागला होता . त्या बाळाच्या सहवासात आजोबांचे दिवस हि आनंदात जाऊ लागले हिते ,त्याच्या हसण्याने ,बोबड्या बोलाणे आजोबांच्या आयुष्यात जणू वसंत आला होता .
एकदा हे शेजारी कुटुंब परगावी गेले ,काही दिवसातच परतणार होते ,त्यांनी आजोबाना ही सोबत येण्याचा हट्ट केला पण आजोबाने  स्वताच्या घरीच राहणे पसंद होते. .ते बाळ त्याचा दूर गेल्याने त्यांना पुन्हा एकटेपणाची जाणीव झाली होती असेच विचार करीत असतांना त्यांना चक्कर आला व ते बागेत पडले संध्याकाळपर्यंत ते तसेच पडून होते .रात्रीला त्यांचा मुलगा घरी आला ..व तो आजोबांची विचारपूस करू लागला आजोबा घरी कुठेच दिसत नव्हते ,त्यांनी घाबरून त्यांची विचारपूस  केली.पण आजोबा कुठे मिळेना ते आजोबाना शोधत होते ,शेवटी बागेत जाऊन पहिले तर आजोबा बेहोष पडून होते त्यांना उचलून घरात आणले ,डॉक्टर ला दाखवले .
        ‘घरातच राहायल नको का बाबा तुमच्या मुळे किती त्रास झाला आम्हाला’अस मोठ्याने मुलगा बोलत होता
         ‘अहो त्यांना आपल्याला कसा त्रास दिल्या जाईल इतकेच माहित आहे’
सुनेने सासर्याकडे पाहत म्हटले .आजोबांच्या तब्येतीची कुणालाच काही पडले नव्हते ,ते तर त्यांना झालेल्या त्रासाप्रती आजोबांशी वाद घालत होते .आयुष्यातील झालेलं हे म्हातारपण  नावच ओझ सगळ्यांना नकोस झाल होत .आजोबा आता बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते ,जीवनात आलेलं वादळच त्यांना पुरेस होत .आजोबा त्या अंधार असलेल्या खोलीत तसेच पडून होते , रडत आसवे पुसत ..त्यांचे आसवे पुसण्यासाठी कोणीच नव्हते .हवा जोरात येत वाहत होती झाडावरची सुकलेली पण गळत  होती त्यांच्या खोली समोरील बगीचा  त्यांना दुरूनच दिसत होता  ,ती रात्र त्यांना  फारच भयाण वाटत होती ,आयुष्यतील चढ –उतार त्यांना दिसत होते ,मुलाने आपल्या जवळ यावे आपल्या सोबत दोन शब्द बोलावे प्रेमाने, अस त्यांना मनोमन वाटत होते .सकाळ झाली होती आजोबान घरातील नोकरांच्या भरोश्यावर सोडून त्यांची मुल सुना बाहेर गावी फिरायला गेली होती .इकडे आजोबा मुलाला डोळेभरून पाहण्याच्या वाटेवर होते ,आजोबा मुलाच्या य्र्ण्याची वाट पाहत होते .त्यांच्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने भरत आली  होती.त्यांच्या कडे आयुष्यची थोडीच क्षण बाकी होती .त्या पाणावलेल्या डोळ्यांना ती वाट कोरडीच वाटत होती ,बाहेर गावी गेलेले त्यांचे शेजारी कुटुंब परतून घरी आले होते .त्यांना आजोबा कुठेच दिसत नव्हते ,त्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती पडली ते धावत पडत आजोबाकडे आले ,आजोबाना मात्र तो आपलाच मुलगा वाटला ते शेजारील व्यक्तीसोबत मुलगा समजून भरभरून बोलत होते ,त्यांचे प्रेमळ बोल एकूण शेजारी गहिवरून आले होते,त्यांना वडिलासारखा वाटणारा मायेचा आधार दूर जाणार होता पण नियतीने डाव साधताच आजोबांचे एकटेपणाचे जगणे कायमचे दूर झाले होत .जगाला नकोसे वाटणारे आजोबा आज मात्र नियतीला आपलेसे वाटले होते
      दोन शब्द प्रेमाचे एवढेच त्यांना हवे होते
      दुरावलेल्या मुलांसाठी नजरेत प्रेम होते
      क्षण निसटत होते दूरदूर असे
      पाहता पाहता त्यांचे श्वास मिटले होते
आजोबा गेल्याचे माहित पडताच सर्वच रडत धावत –पडत आले होते ,पण त्या रडण्याल्या काहीच अर्थ नव्हता .त्यांच्या रडण्याला पाहून मात्र शेजार्यांनी त्यांना चांगलाच जाब दिला मुलांना मात्र आत पश्चाताप झाला होता पण त्या पश्चातापाला काहीच अर्थ नव्हता .
                  म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पान  वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये? म्हातारपण म्हणजे भिजलेल्या  पापण्याचेच का असते ? हृदयात असंख्य दुखाचे आसवे का वाहतात ?शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुर्लक्षित  करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा ..............



Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - नोव्हेंबर २३, २०१९ ८ टिप्पण्या:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

सोमवार, १७ जून, २०१९

जीवन ऋतु आनंदाचा....


जीवनॠतू आनंदाचा


जिवनॠतू कधी आनंदाचा तर कधी वादळाचा •••••••तो असतो अनंत  भावनांचा ••••••अलगद पळत सुटणारा••••••काळजात साठवलेल्या आठवणींचा •••••••••तो आणतो आयुष्यात कधी बहर सुखाचा •••••••जणु कोवळ्या पालवींचा •••••••अंकुरलेली आयुष्याची वेल बहरत राहते आलेच कधी वादळ तर झोकुन पडते आणि पुन्हा तन्मयतेने जगण्यास तत्पर होते•खरंच असच काहीच असत या जगण्याच 'कधी वाटत भरभरून जगाव •••••••पण जगता -जगता कधी ही ओंजळ खालीच होवून जाते •••••••मग खरंच रित होऊन जातं  का जिवन? ••••••   तर नव्हे क्षितिजाच्या पलीकडचे जगणे जगायला शिकले पाहीजे ••••••••उगाचं दुःखाच्या वेळी का होऊन जावे हतबल या आयुष्याला? त्याला हलकेच पेलत पुढे गेले पाहीजे; बरिच माणसे जीवनाला कंटाळलेली असतात 'त्यांच्या जीवनात जणु काहीच उरले नाही असे त्यांना वाटतं आलेली संकट तर असतातच त्यांच्या जीवनात पन त्यांच्या खालावलेला आत्मविश्वास आणखीच संकटांना ओढवून घेतो;त्या संकटातून वाट काढण्याऐवजी ते तिथेच खिळून पडतात त्यामुळे गारठलेल त्यांच आयुष्य तिथेच कायमच गारठुन जातं; मुळातच ही माणसाची भुमिका फार चुकीची आहे•
        आयुष्याची वाट कठीण
         असली तरी चालत राहीले पाहीजे
          संकटाच्या काटयांना दुर सावरले पाहीजे
          थकले जरी चालता- चालता
          तरी तिथेच खिळून बसु नका
            आणखी दोन  पाऊल चालून
             शिखर गाठले पाहिजे

उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते. कसल्याच मानवनिर्मित बंधनात न राहता. जिवन हा शब्द  निरागसपणाला आशा , थकलेल्या ऊर्जा व सुकलेल्या अबोल  चेहर्‍यावर आनंदाचे स्मित हास्य देते .
हाच जीवन हा शब्द  वेगवेगळ्या  टप्प्यावर बदलत राहते जीवन कठीण  आहे  पण सुंदर आहे.  हि सुंदरता केवळ शब्दापुरतीच मर्यादित न राहता
जगण्यात ही असली पाहिजे. जीवनॠतुच विभिन्न रूप  प्रत्येकालाच  पाहायला  मिळते  . जशी  निसर्गाची  हिरवळ जीवास भावते तसे हिरवेपण आयुष्यात बहरले पाहिजे  . फुलांची कोमलता  अफाट  असली तरी  त्यांच्या  असण्यातही त्यागाच प्रतिबिंब  आहे  .छोट्याश्या  आयुष्याला ही इतरांसाठी  वाहुन  देतात  .

जगावे  जणू  असे आयुष्य
पाकळी होऊन फुलांचे
दयावा सर्वास आनंद
अश्रू पुसुन तयांचे
जगणे  आपले का येते  नेहमी  हे
हृदयी फुलवु दयावे गीत  ममतेचे


आयुष्याचा काळ हा मर्यादीत असला तरी अनेक  रुपांनी त्याला अमर करता येते  आयुष्यात  इतरांकरिता जगले की जीवन समृद्ध होईल व इतर अनेक प्रश्न सुटतील • आपल्याकडे काहीच नाही इतरांप्रमाणेच आपण  आनंदी नाही 'असा नकारात्मक विचार करू नये•नकारात्मक विचार केला तर तो  आपल्या आयुष्यात किळ लावुन  जातो. मनाच्या  गाभाऱ्यात  सदैव आनंदाचे मोती  वेचावे.  त्यामुळे अलगदपणे  आनंदाची माळ तयार होईल. आनंद  हा चंदनाप्रमाणे सुगंधी  असतो .तो इतरांना दिला की त्याचा स्पर्शाने   आपल्याही हाताला सुंदर सुगंध येतो.  आनंदाची बाब तशीच आहे  ,ती एकट्याने सावरून न घेता सर्वांना देत जावी  त्यामुळे आनंद  वाढत  जातो. तो कधीच  संपत नाही. धकाधकीच्या जीवनात माणूस  ऐवढा व्यस्त झाला की त्याला  इतरांकरिता वेळ नाही. सदैव मनावर कसला न् कसला तान घेऊन आनंदने जगने माणूस हरवून बसतो. मानवी  मनावर वाढणारा ताण कमी केला पाहिजे. कारण हे  जीवन खूप  अनमोल आहे. हे पुन्हा येणार नाही.मानवी मन फार चंचल  असते .ते कधि या तटावर तर कधी त्या  तटावर सैरभैर होऊन धावत असते.  कधी आनंदी होऊन जल्लोष करते तर कधी दुःखाच्या सागरात पार डुबुन  जाते.असच असत आयुष्य कधी ओंजळीत सुखाची फुले टाकते ,तर कधी आसवांचा पुर ,अन् यातच आयुष्याच्या पाऊलवाटी आपण चालत राहतो.जीवन ऋतू हा फारच विलक्षण आहे. ज्यांना याचे वेध कळले तो युगंधर होऊन जातो. कारण तो आयुष्याचे गीत गात राहतो .त्याला जणु काही मर्म कळला असावा आयुष्याचा. क्षण येतात क्षण जातात पण आठवणी मात्र सदैव स्मरणात राहुन  जातात. जीवनात नेहमी एक बाब लक्षात ठेवा आपण कीती जगलो हे महत्वाचे नसते तर आपण कसे जगलो हे महत्वाचे आहे. उगाच मोठे आयुष्य मागण्यापेक्षा  जेवढे आयुष्य आहे तेवढेच चांगले जगा .       त्यामुळे जीवनातील प्रत्येक वेळेला आनंदाचा ऋतू माना . हा ऋतू सदैव हिरव्यागार अशीम शांततेचा ठेवून आनंदाचे उधाण करा तेव्हा  पसरवा पंख आपुले ,घ्या उंच उंच  भरारी  या जीवन ॠतुमध्ये.


अॅड.  विशाखा समाधान बोरकर













Adv Vishakha Samadhan borkar www.babachilek.blogspot.com - जून १७, २०१९ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)
  • धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात...!
    अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...

हा ब्लॉग शोधा

Adv Vishakha Samadhan Borkar

माझा फोटो
www.babachilek.blogspot.com
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
  • Home
  • माझ्या काळजातील बाबा

ब्लॉग संग्रहण

  • ►  2023 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2022 (5)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  जून (1)
    • ►  जानेवारी (3)
  • ►  2021 (10)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (3)
    • ►  एप्रिल (1)
  • ►  2020 (29)
    • ►  नोव्हेंबर (3)
    • ►  ऑक्टोबर (4)
    • ►  सप्टेंबर (7)
    • ►  ऑगस्ट (5)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (2)
    • ►  मे (3)
    • ►  मार्च (3)
    • ►  फेब्रुवारी (1)
  • ▼  2019 (13)
    • ▼  डिसेंबर (4)
      • वर्ष नवे ध्यास नवा.................
      • मानवधर्म मोठा आहे....
      • "यशाचा निर्मळ झरा......"
      • हीच खरी महामानवाला श्रद्धांजली
    • ►  नोव्हेंबर (4)
      • पुन्हा निर्भया.....
      • निसर्गाचे लोभस रूप..................
      • हुंदका ..............
      • आयुष्याचे शेवटचे पान
    • ►  जून (5)
      • जीवन ऋतु आनंदाचा....

गैरवर्तनाची तक्रार करा

लोड करत आहे...

Adv Vishakha Samadhan borkar

Powered By Blogger

ब्लॉग संग्रहण

  • ►  2023 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2022 (5)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  जून (1)
    • ►  जानेवारी (3)
  • ►  2021 (10)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (3)
    • ►  एप्रिल (1)
  • ►  2020 (29)
    • ►  नोव्हेंबर (3)
    • ►  ऑक्टोबर (4)
    • ►  सप्टेंबर (7)
    • ►  ऑगस्ट (5)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (2)
    • ►  मे (3)
    • ►  मार्च (3)
    • ►  फेब्रुवारी (1)
  • ▼  2019 (13)
    • ▼  डिसेंबर (4)
      • वर्ष नवे ध्यास नवा.................
      • मानवधर्म मोठा आहे....
      • "यशाचा निर्मळ झरा......"
      • हीच खरी महामानवाला श्रद्धांजली
    • ►  नोव्हेंबर (4)
      • पुन्हा निर्भया.....
      • निसर्गाचे लोभस रूप..................
      • हुंदका ..............
      • आयुष्याचे शेवटचे पान
    • ►  जून (5)
      • जीवन ऋतु आनंदाचा....
Powered By Blogger
All rights are reserved . चित्र विंडो थीम. Blogger द्वारे प्रायोजित.