मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०
विस्तवाचा निखारा
का आयुष्यी त्याच्या
विस्तवाच निखारा
रक्ताघामाने भिजते धरणी
पदरी नापिकीचा पसारा
रात दिस डोळे त्याचे
पिकाकडे बघती
राखता पिक अनवाणी
पाया माय मातीचा सहारा
कधी फाटक्या वहनातून
फन लागे पायाला
भळभळ रक्त वाहे
नयनी आसवांच्या धारा
ते आभाळाचं लेकरू
झोक्यामध्ये रडत राही
माय वेचता फन वावरातले
लेकरा देई पहारा
उभ्या वावरात त्याच्या
रक्ताघामाच शिंपण
लेकरावाणी जपतो पिक
उनवार झेलत सारा
जपण्या पिक रात्रीला तो
जागल जाई रानी
पहाटी पहाटी डोईवर त्याच्या
इंधनाचा भारा
दिसा माग दिस जाती
घरी येई पिक
स्वागत होई पिकाचे
मनी स्वप्नांचा पसारा
लेकरा बाळा कपडेलत्ते
वही-पेन घेईन
जाताना बाजारी क्षणात
होई स्वप्नांचा चुराडा
मातीमोल भाव लागे
ढसाढसा तो रडतो
बाहेर कर्जाचा डोंगर
मन घेईल फाशी चा सहारा
पिकाचे मोती माती मोल देऊन
घरी रडत रडत येई
स्वप्नांना नाही अर्थ
आयुष्या जणू विस्तवाचा निखारा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
माणूस स्वप्नाळू वृत्तीचा आहे त्याची खूप सारे स्वप्न असतात आयुष्यात, आणि ते पूर्ण करण्यासाठी तो दिवस-रात्र प्रयत्न करीत असतो, त्याला ...
-
ज्ञानसूर्याच्या लेकरांनो आज बेभान का रे झालात माझ्या भिमबा ला वाटले का रे गटागटात ....... गावातलं लेकरू आमचं पुढारी झालय फार मोठं शिक्षण...
-
एक सांगु का बाबा, तुम्ही ना मला रोज आठवता. जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठव...
-
उघडून दार शिक्षणाचे घडवली मोठी स्त्री क्रांती स्त्री शिक्षणाचे तुम्ही प्रणेता धन्य धन्य तुम्ही क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा ...
-
का आयुष्यी त्याच्या विस्तवाच निखारा रक्ताघामाने भिजते धरणी पदरी नापिकीचा पसारा रात दिस डोळे त्याचे पिकाकडे बघती राख...
खुप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा